अगदी परवाचीच गोष्ट...दुपारची वेळ होती..रविवार चा दिवस... जेवण करून घरचे जरा पहुडले होते..घरात निरव शांतता पसरली होती.. माझेही घरच्यांच्या सुदैवाने जेवण झाले होते ... (त्यांच्याबरोबर)..साधारण १०-१५ मिनिटे इकडे तिकडे चुळबुळ केल्यावर असे लक्षात आले कि सध्या रात्री कानटोपी शिवाय फिरणे त्रासदायक आहे. आणि मग माळ्यावर असलेल्या bags मधून कान टोपी काढण्याची सावध धडपड सुरु केली. कितीही शांतपणे काम करण्याचा माझा तो बिचारा प्रयत्न bagवर ठेवलेल्या कोलाज च्या फ्रेमने क्षणार्धात फोल ठरवला .... काच तर फुटलीच पण आत असलेल्या कोलाज चे सगळे तुकडे माझ्या संपूर्ण बेडरूमभर झाले ... आणि आईची ची चिडचिड पुसटशी कानावर आली..." एक दुपारची झोप मिळते ती पण शांतपणे होईल असे वाटत नाही .. ..झोपल्यावरच कसं सुचत रे तुम्हाला ..." यातले शेवटचे ४ शब्द स्पष्ट ऐकू आले ..आणि मग पुन्हा एकदा शांतता ....मी अजूनही स्टुलावरच उभा होतो . आणि खोलीभर विखुरलेल्या त्या कोलाजच्या तुकड्यांवर नजर गेली....५०० तुकड्यापासून बनविलेले सचिन तेंडूलकरच्या चेहेर्याचे ते कोलाज होते ..विखुरलेल्या तुकड्यांवरून नजर सरकत होती आणि अचानक विचार डोकावला .यातला एक जरी तुकडा हरवला .तर आता हे कोलाज कधीच पूर्ण होऊ शकणार नाही ...आणि मी पटापट सगळे तुकडे गोळा केले ...५०० भरले ..कोलाज तयार केले .आणि भिंतीला टेकवून ठेवले .काचा उचलल्या .हात धुतले आणि गादीवर येऊन बसलो .आणि शेजारी असलेला मोबाईल vibrate झाला ...... ....... Calling ... फोन उचलला ....बोलून झाले ...आणि सुई टोचल्यावर बोटातून रक्त यावे त्याप्रमाणे मनातून विचार आला .जर हे फोन करणारे तुकडे ( तुकडे म्हणायला जीभ तर सोडाच पण मन देखील धजावत नाहीये ) नसले असते तर माझ्या आयुष्याचे कोलाज पण अपूर्णच राहिले असते .अजूनही आयुष्याचे कोलाज पूर्ण आहे असे म्हणत नाही ...पण आज पर्यंत जे तुकडे बसवले आहेत त्यामुळे जी छटा तयार झाली आहे ती तरी मनाला संपूर्ण समाधन देणारीच आहे ....आणि म्हणूनच आज जीवनाचे कोलाज घडविण्यात मोठा वाटा उचलणाऱ्या या विविध रंगी, ढंगी, तुकड्यांचा अतिशय जवळून घेतलेला आनंद ...
ûûû
Kolaaj...Tuzya likhanacha kolajahi diwasendiwas wegweglya chatanchya sundar tukadyani bharat chalalay he nakki...asach chan lihit raha...!
ReplyDelete