काही लोकं इतकी अनपेक्षित भेटतात...आणि त्यानंतर ती आपल्याशी इतकी समरस होऊन जातात कि एखाद्या परक्या व्यक्तीला असे वाटावे कि लहान पणापासून एकत्रच वाढले आहेत.
असेच काहीसे माझे आणि या व्यक्तीचे आहे. आमच्या एका सहलीला हा मुलगा आला होता, वय्यक्तिक ओळख झाल्यावर आम्ही सगळे सहलीचा ठिकाणी असलेल्या नदीकाठी पाण्यात खेळत होतो.हा मुलगा थोडा लांब एका दगडावर शांत बसून होता. म्हणजे इतका serious बसला होता कि मलाच कसेतरी झाले आणि मी त्याच्या शेजारी जाऊन बसलो.मग २/३ मिनिटात आमची बोलायला सुरुवात झाली.नावापासून शिक्षण, आवडी या प्राथमिक गप्पा झाल्यावर साधारण अंदाज आला होता. पण हेच प्राथमिक शिक्षण पुढे उच्चशिक्षणापर्यंत जाईल अशी खात्री तेव्हा नव्हती.
थोड्याश्या ओळखीनंतर असा लक्षात आला कि हि व्यक्ती इतकी साचेबद्ध आहे कि एखाद्या दिवाळीत फटके नाही उडवले तर routine बदलले म्हणून आजारी पडतील कि काय अशी भीती वाटावी.साचेबद्धता असली तरी कोणत्याही गोष्टीत मागे नाही.व्यवस्थित शिक्षण,आपल्याला झेपेल तेवढीच मजा, घरच्यांबरोबर थोडा जास्तच सहवास. आई,वडिलांचा शब्द शेवटचा मग भले घराबाहेर पडल्यावर "काय कटकट आहे आईची" , " आईच्चा काय त्रास आहे " असे उद्गार येत असतातच.पण त्यांच्या शब्दाबाहेर नाही. अहो आणि मी स्वतः अनुभव घेतला आहे.कारण घरी ये...असा आईचा फोन आल्यावर ताडकन उठून गाडीवर बसून निघणारी पहिली व्यक्ती हि आहे.
मी एकदा त्याच्या office मध्ये बसलो होतो...दुपारची वेळ होती...आमची ओळख हि तशी २/३ महिन्याचीच...त्याला सहज बोलता बोलता विचारले कि...काय रे तुझा साधारण दिनक्रम काय असतो...?तेव्हा "तुला वाढदिवसाला काय हवे ?" असे समजा एका लहान बाळाला विचारले तर तो ज्या उत्साहात सांगायला सुरुवात करेल त्याच उत्साहात याने मला त्याची दिनचर्या सांगितली, सकाळी उठून व्यायाम,प्राणायाम,आवरणे,मग घराखाली लगेच येऊन office....दुपारी जेवायला घरी, अर्धा तास नित्त्याची झोप,संध्याकाळी चहा,मग office बंद केल्यावर आईबाबांबरोबर काही नसेल तर आमच्यासारख्या मित्रांबरोबर बाहेर फिरणे,आणि इकडचे जग तिकडे झाले तरी चालेल पण बरोब्बर ९ वाजता हा मुलगा जेवायला घरी हजर.तेव्हा विचार आला कि अरे इतके ठरलेले जीवन जगण्यात कुठली मजा हा अनुभवतो..पण अशीच ओळख वाढत गेली आणि वहीची पाने उलटावीत तश्या याच्या आवडी निवडी आणि सवयी उलगडत गेल्या..स्वतःचे office, हाताखाली काम करणारी ४/५ मुले या गोष्टीचे सुरुवातीला प्रचंड अप्रूप वाटायचे.पण या व्यक्तीकडे पहिले न कि या गोष्टी याच्यासाठी अतिशय योग्य आहेत याची खात्री पटली.कामाच्या वेळी काम आणि मजेच्या वेळी मजा ( काही वेळा काम पण ) असा याचा स्वभाव ..प्रचंड प्रक्टीकॅल अप्रोच म्हणजे काय असते हे मला याला भेटल्यावर सुरुवातीला समजले.एखादा business करण्यासाठी जे गुण लागतात ते याच्यात संपूर्णपणे भरले आहेत.
पण असा विचार केल्यानंतर अचानक असे वाटायला लागायचे कि अरे हा मुलगा कोणत्याही व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवतो आणि याला विश्वासात घेणे अजिबात अवघड नाही..अर्थात हाच गुण त्याला चांगल्या आणि वाईट अश्या दोनही बाजूने अनुभवास आला.
मी सर्वात महत्वाची गोष्ट याच्याकडून शिकलो ती म्हणजे आपल्याकडे जे काही आहे ते १००% समोरच्याला देणे.मग त्याच्यात याने कधीच हात आखडता घेतला नाही.पण याला अट एकाच होती कि समोरची व्यक्ती याला पटली पाहिजे.अन्यथा त्या व्यक्तीचा तोंडावर अपमान करायला देखील याने कधी मागे पुढे पहिले नाही.प्रचंड स्पष्टवक्तेपणा इथे मी पहिल्यांदा अनुभवला.अर्थात स्पष्टवक्तेपणा आणि परिस्थिती चा विचार न करता आपले मत मांडणे याचा हिशोब याला कधीच जमला नाही आणि यामुळेच तोंडावर पडायची वेळ आलेली देखील मी पहिली.आपल्याकडील काही गोष्टी दुसर्याला ऐकविणे किव्वा दाखविणे या बाबतीत याच्या इतका उत्साही माणूस मी अजून पहिला नाहीये.अरे थांब तुला एक मजा दाखवतो....अरे थांब तुला सांगतो असा म्हणून आपल्याकडे जे आहे ते सगळा सांगून टाकणारा आणि तेही फार ओळख नसताना ...अशी व्यक्ती भेटली यातच मी समाधानी आहे.
दुसर्याला मदत करणे हे व्यसनही असू शकते हे मला याला भेटल्यावर समजले.याचे office माझ्यासाठी सदैव उघडेच आहे. मी कधीही याच्या office मध्ये गेलो कि कायम हसून स्वागत झाले.पण जेव्हा याला खरच काम होते तेव्हा त्याने मला सांगितले कि आपण नंतर भेटू बाहेर बस please...sorry...
प्रचंड मित्रपरिवार आणि खूप ओळखी हि या माणसाची अजून एक ओळख.कोणतेही काम निघाले न कि हा कायम म्हणतो कि थांब मी अमुक याला विचारतो तो हे काम करेल.याचा बरोबर बोलत असताना असे नेहमी जाणवते कि जे विचार आहेत ते योग्य शब्दात मांडणे, समोरच्याला आपला मुद्दा पटवून देणे आणि मगच पुढचा मुद्दा. (भले ते चुकीचे असेल )प्रचंड gossiping करणे हा त्याचा गुण चांगला आहे कि नाही हे मला माहित नाही कारण माझ्याविषयी gossip करण्यासारखे काही आहे असे मला वाटत नाही.पण हा जे काही मला सांगतो त्याचा मी नक्कीच आनंद घेत आलो आहे आणि राहिनही.उगीचच रिकाम्या वेळात लोकांना फोन करून उलट सुलट चर्चा करणे हा त्याचा छंद असावा असे मी मानत आलो आहे.
मला या माणसाची अजून एक गोष्ट आश्चर्यकारक वाटते ती म्हणजे भरपूर नातेवाईक...कायम आत्याकडे जेवायला चाललोय,मावशी ला घेऊन जेवायला जायचे आहे,आजोबाना घेऊन जायचा आहे या कारणांचा मला वीट आला आहे.पण अजून हा मुलगा थकला नाहीये.
मला अजून एका गोष्टीचे भयंकर नवल वाटते हा मुलगा australian cricket team ला प्रचंड support करतो.पण एवढा मात्र नक्की कि हा मुलगा autralian team विरोधी चर्चेत पण भाग घेतो... पण लगेच विषय बदलतो.या मुलाला cricket matches (aus) वर bet लावायची काय हौस आहे त्यालाच माहित..आधी त्याने पैसे कमावले देखील असतील पण सध्या याच्या team ने त्याची साथ सोडली आहे.आणि या काळात त्याची होणारी मानसिक तळमळ मी अनेकदा अनुभविली आहे..आणि हो मी या मानसिकतेचा मनमुराद आनंद घेतो.पण आमचे आराध्यदैवत एकच असल्यामुळे कुठल्याही match ची चर्चा येथे येऊन विसावते.त्यामुळे याच्याशी भांडायचा संबंधाच आला नाही...Australia हरल्यावर लोकांच्या शिव्या खावून बारीक झालेला याचा चेहरा मी बरेच वेळा अनुभवला आहे.( मी आनंदी आहे ...चेहरा बारीक झाला म्हणून नाही हो...पण का याचे उत्तर तोच तुम्हाला सांगेल )आणि हो Futball या खेळला soccer आणि संडास ला shitt अश्या गोंडस नावाने हाक मारणारी माझ्या उभ्या आयुष्यातील हि पहिली व्यक्ती असेल.
Office मधील पोर काम करत नाहीत हे trigonometry चे गणित solve न झालेल्या मुलासारखे येऊन जेव्हा तो हे आम्हाला सांगतो तेव्हा हाच का तो त्यांचा बॉस असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.या माणसा सारखा बॉस प्रत्येक employee ला मिळो हि आमच्या common देवाकडे bat जोडून प्रार्थना.लग्नाच्या मुली पाहणे हे जयहिंद मध्ये window shopping केल्यासारखे पाहणारा हा मुलगा आता मात्र या shopping मधून बाहेर पडला आहे.
हल्ली leather ball वर cricket खेळणारे माझे मित्र फार कमी राहिले आहेत आणि त्यातीलच हा एक.जो दर रविवारी न चुकता
क्रिकेट खेळायला जातो आणि तेवढेच न चुकता प्रत्येक match चा score सांगतो.काही picture मध्ये पहिले होते कि एखादे पात्र नेहमी वेगवेगळ्या situation ला वेगवेगळ्या picture मधले dialouge मारत असते.अगदी तसेच हे पात्र देखील कोणत्याही वेळेस picture मधले dialouge मारत असते आणि या पेक्षा दुखदायक बाब म्हणजे त्या dialouge नंतर त्याचा आलेला प्रश्न "संग बारा कुठला movie ?". खरं सांगायचे तर मला याचे उत्तर कधीच जमलेले नाही.आणि मी शक्यतो ओळखीचे ३/४ picture आलटून पालटून सांगतो..दरवेळी
रानडेचा चहा,वैशालीतील SPDP,Ind -Aus Cricket चर्चा,Riefl shooting,सचिन रमेश तेंडूलकर,रात्रीचा Juice (Plain) आणि बेडेकर चहा या गोष्टींच्या साक्षीने आजवर वाढलेल्या आमच्या ओळखीला( मी ओळखच म्हणतो कारण आम्हाला अजून खूप काही करायचं ) पुन्हा एकदा cheers......कारण या मुलाने माझ्यासमोर बसला असताना कधीच साधा पाण्याचा ग्लास देखील CHEERS न करता प्यायलेला नाही...
No comments:
Post a Comment