Thursday, May 17, 2012

The game...where both sides of the ground are known as OFF sides

      
                     जिथे पेनल्टी म्हणून शूटआऊट केले जाते....अश्या खेळाबद्दल...

      "उद्या आमची match आहे" असे कोणी म्हणाले तर भारताची कुठल्याही खेळाची,IPL मधील आवडत्या टीमची , स्वतः एखादा खेळ खेळत असाल तर त्याची यापैकी एखादी match असेल असे वाटणे अगदीच साहजिक आहे.पण "आमची" match या नावाखाली Chelsea , Liverpool ,Arsenal ,Manchester United यांच्या matches पाहणे अथवा संबोधणे हि माझ्या मित्रांची आवड आहे.सोलापूर,सातारा,सांगली म्हणावे तसे हे लोक Chelsea , Arsenal , Liverpool म्हणतात.  

            मला अजून हे कोडे उलगडलेले नाहीये कि ९० मिनिटे चालू असलेला खेळ ०-० असा बरोबरीत सुटला तरी या खेळाबद्दल बोलण्यासारखे इतके काय असू शकते ? बर ते जाऊदे ४५-४५ मिनिटांचे दोन डाव त्यानंतर एक्स्ट्रा टाईम आणि तरीही एखादी टीम जिंकेल याची शाश्वती नाही याची जाणीव असून देखील पहाटे २ ते ४ या वेळात उत्साहात सामना बघणारे माझे मित्र थोर आहेत.बर मला अजून एक समजलेले नाहीये कि जर हा खेळ इतका प्रचंड लोकप्रिय आहे मग गल्लोगल्ली खेळताना का दिसत नाहीत ? आणि गल्लोगल्ली तर सोडाच पण १०० कोटी लोकांच्या आमच्या देशातून असे ११ लोक येऊ शकत नाहीत का कि ज्यांना आम्ही हा खेळ खेळताना (मध्यरात्री ) टीव्ही वर पाहू शकू

         या खेळाविषयीची माझी माहिती अगदीच नगण्य आहे . पण माझ्या मित्रांचे या खेळाविषयीचे  प्रेम पाहून असे वाटते कि यांच्याकडे त्यांच्या स्वतःच्या बायकोवर करायला प्रेम शिल्लक राहील कि नाही.एखाद्या खेळाची चर्चा,तो खेळ खेळणार्यांची चर्चा इथपर्यंत ठीक वाटत होते.पण टीम च्या manager बद्दल देखील चर्चा मी पहिल्यांदा ऐकली.माझी या खेलाविशायीची जवळीक Jersy  घालण्याच्या पलीकडे गेलेली नाही.पण लोक रात्री २ वाजता उठून match बघणे, jersy , shorts आणि टोप्या विकत आणून घालणे यासारख्या गोष्टी आवडीने करतात.

          समजा १० मुले ग्राउंडवर खेळत असतील तर मी १००% खात्रीने सांगू शकतो कि त्यांच्यातील प्रत्येक मुलगा नक्की कुठल्यातरी international खेळाडू सारखा खेळत असतोच.म्हणजे तो मुलगा कसा खेळतो याचे कोणालाही काही नसते पण तो कोणासारखा खेळतो हे सांगून त्याचा अपमान अथवा सम्मान करण्याची इथली परंपरा आहे.Play Maker ,Center forward , Crosses  या सारखे शब्द वाक्यातील स्वल्प्विरामासारखे वापरले जातात.तुम्ही कसेही खेळा तुमच्यासारखा खेळणारा एकतरी प्लेयर कुठल्यातरी देशाकडून अथवा क्लब कडून खेळत असणारच. 

          परवाचीच गोष्ट आम्ही ४/५ जण उभे होतो, एक म्हणाला XXX आता तुमचा नाही राहिला. तो आता आमच्याकडे आला आहे.त्यामुळे या वेळेस EPL आमचं.अरे या वाक्यावरून मला काहीच संदर्भ लागला नाही.पण जेव्हा समजला तेव्हा टेनिसचा ball या कोर्टातून त्या कोर्टात जावा तसे हे  प्लेयर्स या टीम मधून त्या टीम मध्ये जातात हे मात्र लक्षात आले.  

          २२  लोक एका ball च्या मागे धावतात आणि आमच्या देशातील लोक यांच्या मागे.             
       क्रिकेट हा खेळण्याचा विषय नसून बोलण्याचा विषय आहे.असं पु लंच  म्हणणं आहे.पु लं आत्ता असले असते तर वरच्या ओळीत अजून एका खेळाची भर पडली असती.आणि "फक्तहा शब्द अजून add झाला असता.आता कुठे add झाला असता हे तुम्हीच ठरावा.

      पण मला या खेळाविषयी आवडीची अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे खेळाडूंची नावे,म्हणजे लिहायचे नाव वेगळे...वाचायचे नाव वेगळे.....आणि गप्पा मारताना म्हणायचे नाव वेगळे असे त्याचे ढोबळमानाने वर्गीकरण केले जाते. या टीम्स मधील प्लेयर्स काळे कि गोरे हे मी कधी पहिले नाहीये.पण नाव घेतल्यावर हा माणूस स्ट्रायकर आहे,याचे short Passes भारी आहेत,हा solo आहे या गोष्टी आता मी सुभाषितासारख्या म्हणून दाखवू शकतो.

 या खेळाच्या matches कधीच संपत नसाव्यात. कोणत्यातरी सिझन नंतर कोणतातरी असतोच.किव्वा अगदीच काही नसेल तर कोणाच्या तरी राहिलेल्या second leg च्या matches चालूच असतात
               पण एकाच वेळी एकाच टीम च्या दोन matches नसतात हे ऐकून मला सुसह्य वाटतंय.जर तुम्ही या खेळाचे points table कधी पहिले असेलतर ते समजावून घेण्यासाठी क्लास लावावा लागेल असे मला नेहमी वाटते.कारण win आणि loss या पेक्षा draw मुळे मिळालेले points जास्त असतात.पण खरच म्हणजे ज्याचे point table समजावून घेणे जर इतके अवघड असेल तर खेळणे किती अवघड असेल

           मला माझ्या मित्रांची अजून एक गोष्ट फार आवडते ती म्हणजे ही  लोक चेहरा न बघता प्लेयर्स ची नाव  सांगून वाक्य चालू करतात आणि मग कोण कुठला प्लेयर हे ठरवेपर्यंत ball त्या प्लेयर कडून गेलेला असतो.दुसर्या टीमच्या प्लेयर केलेली ऑफ साइड माझे मित्र रेफ्री च्या आधी ओळखतात.प्लेयर्सच्या bidding च्या किमती माझे मित्र कोथिंबिरीच्या गड्डीच्या किमती सारख्या घेत असतात."काल रात्री मी संपूर्ण match पहिली" या वाक्यापेक्षा " काल final स्कोर काय झाला ? " हे वाक्य मी जास्त वेळा ऐकले आहे. Match पाहणारे आणि संपूर्ण match पाहणारे यांची वजाबाकी केली तर पुन्हा तुम्हाला match पाहणार्यांचीच संख्या मिळण्याची भीती जास्त आहे.

     
आईशपथ सांगतो २-० असा स्कोअर दिसत असेल तर कुठल्या टीम ने किती गोल केले हे मी आत्ता आत्ता पर्यंत चुकायचो

       माझ्या मते हा खेळ खेळता येणे यापेक्षाही ह्या खेळाबद्दल माहिती असणे आणि ती माहिती चार चौघात घडाघडा म्हणून दाखवता येणे हे जास्त प्रतिष्ठेचे असावे.हा खेळ पाहत असताना Commentator चे काम काय आहे हे समाजाने थोडे अवघड आहे, कारण खेळाबद्दल बोलायचे सोडून हे लोक पाहणार्यांची उत्सुकता वाढवणे याचा जास्त प्रयत्न करताना दिसतात.

        EPL मध्ये समजा मी चुकून एखाद्या अमेरिकन टीम चे नाव घेतले तर "काय बावळट आहे "   अस म्हणायला देखील मला माझे मित्र कमी करणार नाहीत याची मला खात्री आहे.पण का कोण जाणे ती चर्चा ऐकण्यात जेवढी मजा आहे तेवढी मजा बहुदा खेळाडूंना खेळताना देखील येत नसावी.
        International खेळाडू खेळताना जसे कपडे वापरतात तसे आपणही घालावेत असा विचार बहुदा ह्या खेळाकडे बघूनच आला असावा. कारण अंतर्वस्त्रे सोडून बाकी सर्व प्रकारचे कपडे उपलब्ध आहेत आणि लोक  ते घालतात.आणि एकाच tournament मध्ये आपल्या  ground वर खेळायचे कपडे वेगळे आणि दुसर्याच्या ground वर खेळायचे कपडे वेगळे ?? Fashion show  बरा...

                       माझे या खेळाशी काहीही वाकडे नाही किव्वा हा खेळ मला आवडत नाही अशातलाही भाग नाही म्हणजे मी या खेळला कधीही नावे ही ठेवलेली नाहीत.वरील गोष्टी लिहिण्यामागे कुठलीही नकारात्मक भावना  नाही.पण प्रत्येक वेळी पाण्यात उतरून पोहण्यापेक्षा काठावर बसून मजा पाहण्यात देखील एक वेगळीच मजा आहे
                 Ball ला लाथ मारायला जमले नसले तरी...या खेळला लाथ मारायची हिम्मत नाही 

     सगळे खेळ मैदानावरच उतरून शिकावे लागतात असे नाही.काही खेळ उभ्या उभ्या पण शिकता येतात. अहो हे तर काहीच नाही...आमच्याकडे लोक बोलता बोलता शिकतात ...  


                        

        
                                                                                                      हृषिकेश पांडकर
                                                                                                      १७-०५-२०१२