Tuesday, March 8, 2011

४...



काही लोकं एकदा भेटतात ...पण पुन्हा भेटल्यावर ओळखू   येण्याइतपत दुरावली जातील याची हमी देता येईल इतकी अनोळखी देखील वाटतात ...अशीच काहीशी गत झाली होती... भयंकर अपयश आलेल्या engginering  च्या दीड वर्षातील सुरुवातीचा हा दिवस.... संपूर्ण नवीन मुलांच्या वर्गात बसण्याचा अनुभव काही वेगळाच असतो ..आणि हा दिवस पण त्याला अपवाद नव्हता ...केवळ सुंदर मुली शोधण्यात सारा वेळ खर्ची पडतो ...आणि हवे तसे फ्लोटर्स मिळाले नाही किव्वा आवडलेले फ्लोटर्स आपल्या आवाक्यातले नाहीत अशा वेळी होणारा चेहरा पुन्हा एकदा आपणच अनुभवतो ...अशी काहीशी गत होती .साधारण  आठवडे असेच गेले....बर्यापैकी  मराठी ,त्यात आपल्या पुण्याचे ,आपल्या घराजवळील असतील तर फारच छान अश्या पांढरपेश्या विचाराने या मुलाशी ओळख झाली असावी... ओळख नाही म्हणता  येणार .पण हल्ली  थियेटर मध्ये असलेल्या toilet मध्ये देखील लोकं अनोळखी माणसाला स्कोअर विचारतात...हा तर माझ्या वर्गात होता ....असच काहीसे वाटून मी तेव्हा  याच्या बोललो असीन...
 नंतर Submission पूर्ण करता यावे यासाठी  मिनिटावर राहत असलेल्या याच्याकडे अर्धातास  पत्ता  शोधत  फिरलो आणि त्याच्या घरी गेलो...च्यायला काय काय करावे लागते..असा चेहरा करून मी त्याच्या घरी गेलो....आणि च्यायला रविवारी कसली कटकट असा चेहरा करून त्याने मला आत  घेतले...त्याला सांगितले  हे बघ मला हे drawing जमत नाहीये तर तुझे drawing शीट आज मला दे....मी कॉपी करतो..उद्या आणतो कॉलेजला...पण नाही..समोर  बसलेली व्यक्ती मला म्हणाली..अरे..शीट नको नेउस..रफ पेपरवर काढून घे इथे बसून..शीट खराब झाले तर madam ओरडतील...म्हणजे थोडक्यात..ज्या वेळी लक्ष  द्यायचे त्या वेळी दिले नाही...आणि आता आयते शीट कॉपी करायला आला ..अशा आशयाचे ते भाव सहजच समोर आले..ठीक आहे एवढे म्हणून भरभर कॉपी केली आणि घरी आलो...त्या दिवसापासून ते मी engginering  सोडले त्या दिवसापर्यंत एकदाही त्याच्याशी शब्दांची देवाणघेवाण झाल्याचे स्मरणात नाही.आणि तसे होण्याची शक्यता  देखील नव्हती . तेव्हाही आणि त्या नंतरही....



अर्थात आपल्या शक्यतेची काळजी घेणारा जो आहे त्याला कदाचित वेगळेच डोक्यात असावे ...

हीच व्यक्ती  वर्षांनी एका  theater  मध्ये भेटली..माझ्या बरोबर असलेल्याच तो जवळचा मित्र असल्याने त्यानी त्याला shakehand केले आणि माझ्या pant ला खिसे नसल्याने मी  देखील....

नंतर बी.कॉमचा आरामदायी प्रवास अनुभवत असताना दुर्गा या छोट्याश्या कॉफी हाउस चे व्यसन लागले मी माझ्या मित्रांबरोबर जायचो...आणि माझ्या बरोबर  असलेल्यांचा मित्र या  नात्याने तो  देखील तिथे यायचा ....  वर्षापूर्वी एका वर्गात असून  बोललेलो आम्ही खुर्चीला खुर्ची लाऊन बसू लागलो..सुरुवातीचे दिवस शैक्षणिक,  बौद्धिक . पातळ्या ओळखण्यात गेला..
कोणकोणत्या विषयांवर बोललो हे लिहिणे येथे अवघड आहे.....कारण technolgy जरी प्रगत असली तरी मानवी शक्तीला मर्यादा आहेत ...

दुर्गातील ओळख वाढली ..अगदी मैत्रीचा अर्थ काय आहे वगरे समजले असे म्हणत नाही ..पण यालाच मैत्री म्हणत असावे असे वाटू  लागले ..भेटणे ..बाहेर  खाणे ..या  गोष्टी नित्याच्या झाल्या होत्या...दुर्गा बरोबर...जुसची टपरी (झेस्ट वाली )../  manchaow सूप ...त्याच्याच घराबाहेरचा   पायऱ्यांचा  तो कट्टा...या गोष्टी आपल्याश्या  वाटत होत्या....
काही गोष्टी मित्र करतो म्हणून आपण करतो...म्हणजे मी करतो....पण मला पटते म्हणून मी करणार मग भले बाकीचे सहमत नसतील..असा egoistic स्वभाव  अनेकदा अडवा आला ...
पण म्हणून "निघताना मिस कॉल " या मेसेजला मी कधीच मुकलो नाही..
कोकणातील समुद्राला कंटाळा येईल इतक्या वेळा आम्ही एकत्र कोकणात गेलो...पण कोकणात आता नको जायला अशा अर्थाचा एकही शब्द या कवी मनातून  ऐकलेले नाहीत...
ट्रीपला फोटो काढतात पण फोटो काढण्यासाठी ट्रीपला ला जाता येऊ शकते याची प्रचीती हि याच्यामुळेच आली...आज पर्यंत सूर्यास्त म्हणल्यावर समोर येणारा फोटो ...आता याच्यामुळे वेगळ्या तर्हेने काढायला शिकलो ...ट्रीप ची व्याख्या redifine केली याने...पूर्वी  ट्रीप म्हणजे / मंदिरे,/ museums,/ zoos ...हॉटेल मध्ये  खाणे....याखेरीज वेगळे काही केल्याचे आठवणित नव्हते....पण हि व्यक्ती आली आणि ट्रीप चा प्रवास सोडाच पण जीवनाचा प्रवास देखील वेगळ्या वाटेचा सुरु झाला ...

 देवाच्या दर्शनाला गेल्यावर तुम्ही आत जा मी बाहेर थांबतो...असे म्हणणारी पहिली आणि एकमेव व्यक्ती माझ्या पाहण्यात आली....

 हे  पण खूप मर्यादेत होता असा म्हणीन कारण ...कारण अजून दीड वर्षांनी एका छोट्या group ला कुतूहलापोटी दोघेही एकत्र join झालो ..आणि  मग एका वेगळ्या  पर्वाला सुरुवात झाली ...

 काहीतरी वेगळा करण्याची इच्छा ,आणि  ते  करण्यासाठी सगळ्यांच्या विरोधात जायची तयारी...या दुधारी वागण्याने माझ्या आयुष्यात चांगले वाईट असे दोनही अनुभव मी  घेत आहे ....
नवीन group ,नवीन लोक  यांच्यात प्रचंड मिक्स होऊन गप्पा मारत बसला आहे असा याचा स्वभाव कधीच पाहण्यात आला नाही ...पण नेहमीच्या आणि ओळखीच्या  लोकांमध्ये बसून एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची पिसे काढणे याचे हजार नमुने इथे बघायला मिळाले ...

 याचा वागण्यातील चढ उतार पचवून घेताना त्रास पण झाला ..पण म्हणून याला टाळणे कधीच जमले नाही ..आणि असे होईल याची शक्यता आहे असेही वाटायचा  काही चान्स नाही .....
आपल्याला एखादी गोष्ट पटली नाही तर आपण ती करू नये अश्या मार्गाने चालणे प्रत्येक वेळीच योग्य असते असे नाही .पण हे मी  त्याला कधीच सांगू शकलो  नाही ...
वाचनाची आवड....त्यामुळे लिहिण्याची कल्पकता ..या कायमच  जमेच्या बाजू  ठरत आल्या आहेत..
नवीन group जॉईन केला...ओळखी वाढल्या..पर्यायाने नवीन आणि वेगवेगळे स्वभाव एकत्र अनुभवत असताना आलेली मजा किव्वा त्या स्वभावाचे विश्लेषण  करण्यात गेलेला आमचा वेळ याची मोजदाद  ठेवावी असे कधीच वाटले नाही.
आणि हा .आता बर्यापैकी मोठा group झाला..तर  एखाद्याच्या वाढदिवसाला काहीतरी वेगळे करू हि सर्वसाधारण कल्पना डोक्यात आली...पण , "अरे मला  एक  सुचलंय / मला एक idea आली आहेया वाक्याने सुरुवात करून याने एक नवीनच पायंडा पाडला.कारण केक कापणे आणि उगीच shkehand करणे यापलीकडे कधीही  गेलेले वाढदिवस आज अनेक तऱ्हेने साजरे झाले आणि कायमच्या आठवणीतील झाले .

Sarcasm चा मुक्तहस्ते (मुक्तकंठानेवापर...या पेक्षा कधीतरी नॉर्मल बोलणे यामुळे चांगले वाईट असे दोन्ही अनुभव घेत आलो.अर्थात याच्या sarcasm चा  वापर फार वेळा माझ्यावर झाला नसला तरी आता sarcasm म्हणजे काय हे ओळखण्याइतपत मी  पात्र झालो आहे.

 घरातूनच समाजसेवेचे बाळकडू मिळाले...असे घोटीव आणि बोथट झालेले वाक्य वापरून नवीन paragraph ची सुरुवात करावी असे वाटणार्यातील मी नाही...आणि ज्या  माणसाविषयी लिहितोय त्या माणसाने तर असे असलेले वाचूही नये...पण खरच प्रामाणिक पणे समाजसेवा करावी या एका आशेने एक group जॉईन केला .त्याने ...
आज त्या group च्या निमित्ताने भेटणे होतेच ..पण या माणसाला भेटण्यासाठी निमित्तांची गरज भासावी हि कल्पनाच करवत नाही .
मला  वैचारिक मते मांडता येत नाही पण दुसर्यांनी मांडलेली  मते ऐकून घेण्याइतपत  सामंजस्य पण माझ्यात आहे असे मी समजतो . त्यामुळे  अशी बरीच  वैचारिक  मते मी याच्याकडून ऐकत आलो .
 आता मला  सांगा प्रभात रोड वरून जाताना दिसणारा bunglow ...याविषयी कोणीतरी काढलेले उद्गार तुम्ही ऐकले आहेत काय ? नक्कीच नाही...पण याच बंगल्याविषयी आणि तेथे राहणे या कल्पनेविषयी रोज बोलण्याची तयारी असलेली हि व्यक्ती कल्पना विलासाच्या बाबतीत कुठल्या थराला  जाऊ शकते याचा  छोटासा प्रत्यय मला कायम येतो..एवढेच नाही पण वैशाली,रुपाली ,गुडलक  या  आणि अश्या सर्व जागांवर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर आपली मत मांडणारा एकमेव जीव असा  उल्लेख करणे अयोग्य ठरणार नाही

 मराठी सिनेमा ,चांगले लेखक ,उत्कृष्ट  कवी ,संगीत  आणि  सुंदर स्त्रिया यांविषयी कायम आस्था आणि आदर असलेली हि व्यक्ती माझ्या आयुष्याचा अविभाज्य  घटक ठरलेली आहे .
आमच्यातील ओळख आता मैत्रीत बदलू लागली आहे ...असे म्हणायला मला त्याचा परवानगी ची गरज नाही.

 मयुरेश्वर आणि रानडे च्या चहावर जितका विश्वास आहे त्याच विश्वासाने सांगतो कि ..बुद्धिबळ खेळण्यात पारंगत असलेल्या या व्यक्तीने प्यादाच्या सरळ चाली पेक्षा घोड्याची तिरकस चालच अधिक वेळा खेळली आहे.....जीवनातही....

No comments:

Post a Comment