Thursday, March 3, 2011

७...



      आपण बरं....आपल घर बर..अभ्यास बरा..नोकरी बरी..असा इतका सरळ आणि प्रामाणिक  विचार करणारी मुला कशी असतात असा प्रश्न मला गेल्या दीड वर्षापासून पडला नाही.कारण अशी व्यक्ती माझ्या  आयुष्यात आहे.
पण हि व्यक्ती जरी वरच्या वर्णनाला चपखल बसली असेल तरी त्यापेक्षाही बरच काही मी याच्याबद्दल अनुभवलंय.प्रचंड सरळमार्गी आणि साचेबद्ध शिक्षण.यातून पुढे मिळालेली नोकरी.छोटे typical त्रिकोणी कुटुंब.संध्याकाळी  ला जेवण.या गोष्टी वाचल्या कि असे वाटेल कि पुढे या मुलामध्ये काही वाचण्यासारखे आहे का ?पण या पेक्षा अजून तो काय करतो हे पाहण्याच्या उत्सुकतेपोटी मी अजून साधारण हा जन्म त्याच्याबरोबर घालवायचा निर्णय दीड वर्षापूर्वीच घेतला आहे.
कोणत्याही गोष्टीचा पराकोटीचा आनंद आणि कोणत्याही गोष्टीचे प्रचंड दुख झालेले मी आजतागायत याला पाहिलेले नाही.

      आमची ओळख व्हावी असे कोणतेही  कारण माझ्याजवळ नाही.पण आता हीच ओळख टिकावी यासाठी भरपूर कारण यांनी तयार करून ठेवली आहेत.मला अजून देखील आठवत नाही आमची पहिल्यांदा ओळख कशी आणि का झाली.केवळ मित्रांचा   मित्र या अतिशय प्राथमिक ओळखीवर आमचा प्रवास सुरु झाला होता.पुढे एका समाजसेवी संस्थेच्या निम्मित्ताने जवळून ओळख झाली.त्यानंतर बाहेर जेवणे,ट्रिप,niteout या गोष्टींमुळे याला मी जास्त समजू शकलो.
लहानपणापासून शिस्तीत अभ्यास,सरळ वागणे,मानवेल असा देवधर्म,घरच्यांशी जवळीक या सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित भरल्या आहेत.

      आणि आता याच गोष्टीचे अनेक फायदे याला होतायेत असे मला नेहमी वाटत आले आहे.
मी याला भेटलो तेव्हा याचे शिक्षणच चालू होते.अगदी दोन वर्षापूर्वीची गोष्टमला अजून आठवतंय आम्ही दोघे आमच्या घराखाली थांबलो होतोअर्थात कोणाची तरी वाट बघत ) तर सहज अभ्यास आणि career या गोष्टीचा विषय निघाला.मी आपला भराभर सांगून मोकळा झालो.आता याची पाळी होती आणि मला वाटला कि /  मिनिटात काय काय करतो हे  सांगेल  आणि विषयांतर होईल.पण  या मुलाने सुमारे पाऊण तास मी Bcom कसा झालो हे  सांगण्यात  घालवला आणि मी CS कसा होतोय हे  सांगण्यात पुढचा अर्धा तास गेला.आणि एवढे करून आम्ही ज्याची वात पाहत होतो तो आमचा  मित्र आलाच नाही.त्या दिवशी परत घरी जाताना असा विचार मनात आला कि अरे हा मुलगा मला एवढा का सांगत होता.वास्तविक पाहता आमची ओळख काहीच नव्हती.
मात्र याचा अर्थ असा नाही कि हा कोणाच्यातही बेमालूम मिसळून  जाईल.प्रथम  परिस्थिती आणि लोकांचा अंदाज घेऊनच याची पुढची पाऊले ठरतात.

      त्यानंतर आम्ही नेहमीच भेटत आलोय.आणि याचे नवीन स्वभाव गुण समजत गेले.
कोणाला वेळ दिली असेल तर आपण  ती कधीच पाळायची नाही असे अगदी ठरवूनच हा मुलगा वागतो.आणि आपल्यामुळे इतरांना थांबावे लागते किव्वा अगदी ताटकळत उभे राहावे लागते याचा त्याच्यावर काडीमात्र फरक पडत नाही.आणि आपल्याला उशीर झाला आहे याचे तसूभरदेखील दुख  याच्या चेहऱ्यावर उमटत नाही.उलट समजा कोणी याला उशिरा येण्याचे कारण विचारले तर तो उशिरा येण्याचे व्यवस्थित explanation देण्याची ताकद राखतो.आम्ही शक्यतो माझ्या एका  मित्राकडे आधी भेटतो आणि तिथून पुढे मग एकत्र जातो.तर नेहमी प्रमाणे हा मुलगा उशिरा येतो.आणि त्याला वाटेत असताना फोन करून विचारले कुठे आहेस तर तो प्रत्येक वेळी एकाच ठिकाणाचे नाव घेतो.असे का हे त्याला विचारण्याइतपत मी धीट नाही.

      या मुलाला स्वतः च्या बाबतीत घडलेल्या गोष्टी सांगायची काय हौस ahe काय माहित.आम्ही जेव्हा जेव्हा दोघाच असतो तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी याने मला फक्त त्याच्या स्वतःच्या बाबतीतल्या गोष्टी सांगितल्या आहेत.आणि समजा हा काही सांगत असताना आपण बोर होऊन  विषय बदलायचा प्रयतन केला तरी हा मुलगा फिरून व्यवस्थितपणे पुन्हा त्याच मुद्द्यावर येऊन बोलतो.इतक्या दिवसाच्या ओळखीत मी एक  अनुभवले ते म्हणजे office,प्रेम,खेळ आणि जुने शाळा कॉलेज चे दिवस या खेरीज ह्या मुलाने माझ्याशी कधीच संवाद साधलेला नाही.

      अर्थात यात वाईट असे काही नाही.कारण वरील पैकी एका विषयावर बोलायला यांनी एकदा सुरुवात केली कि आम्ही बोलायचे थांबे पर्यंत तो याच विषयावर बोलतो.मला या  मुलाला खूप वेळा सांगायची इच्छा होते कि बाबा रे तू आत्ता जी गोष्ट सांगत आहेस ती गोष्ट तू मला या आधी बरयाच वेळा सांगितली  आहेस तर आता प्लीज सांगू  नकोस.पण ज्या उत्साहात तो ती गोष्ट सांगत असतो त्या उत्साहावर विरजण घालायला माझी जीभ कधीच रेटली  नाही.आणि या पुढे देखील रेटणार नाही.

या मुलाचे एक स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे जी गोष्ट हा मुलगा ठरवतो ती त्याने नेहमीच करून दाखवली आहे.( अर्थात सकाळी टेकडीवर जाणे हि गोष्ट याला अपवाद आहे ).समजा याला एखादा शर्ट घ्यायचा आहे  आणि याच्याबरोबर जायला कोणीच नसेल तर हा मुलगा एकटा जाऊन दुकानातून शर्ट विकत घेतोपण काहीही झाले तरी ते काम  तो अपूर्ण सोडत नाही.आणि त्याची हीच गोष्ट मला नेहमी आवडत आली आहेशिक्षण,नोकरी या बाबतीत  प्रचंड sincerely काम आणि विचार करणारी माझ्या पाहण्यातील हि एकमेव व्यक्ती.      माझ्या जवळच्या मित्रानमध्ये भरपूर शिकलेल्या मित्रांपैकी हा एकपण हे शिक्षण कमी आहे म्हणून कि काय याने आता पुढील शिक्षण सुरु केले आहेआणि आता एवढे मित्र असताना संध्याकाळी अभ्यास कसा होणार असा  बाळबोध विचार माझ्या मनात आला खरा पण याने आधीच जाहीर केले होते कि मला आता काही दिवस संध्याकाळी यायला जमणार नाही.एकदम परीक्षा झाल्यावर भेटू.एवढे धाडसी निर्णय हा मुलगा इतक्या सहज सहजी  कसे घेऊ शकतो याचे मला राहून राहून आश्चर्य वाटते.

      हा मुलगा घरातून निघताना बरेच प्लान्स ठरवून बाहेर पडतो कि काय अशी मला एक शंका आहे.कारण आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा कायम याच्याकडे पुढचे प्लान्स तयार असतात."अरे तुमचा आत्ता काही खप नसेल तर मी जरा माझ्या college च्या मित्रांना भेटून येतोआत्ता तुम्ही घरी चालला असाल तर मी जरा माझ्या गावातल्या मैत्रिणीला भेटून घेतो." हि वाक्य तर आता आमची पाठ झाली आहेत.college च्या मित्रांना भेटतो हे म्हणजे  छत्री दुरुस्त करणे या कामासारखे तो आम्हाला  सांगतोम्हणजे "आता वेळ आहे तर भेटून घेतो त्यांना."आपल्याला ज्या गोष्टी पटतात त्याच फक्त करायच्या ज्या पटत नाहीत त्या बद्दल एक अवाक्षर देखील काढायचे नाही किव्वा त्या गोष्टीला विरोध  देखील करायचा नाही अशी एक प्रामाणिक आणि निरुपद्रवी वृत्ती .

      या मुलाचा मूड कुठ्ल्याक्षणी बदलेल याचा नेम  नाही. म्हणजे इतक्यावेळ प्रचंड timepass करत असलेला हा मुलगा suddenly उठून "चला मी निघतो " असे म्हणून घरी सुद्धा जाऊ शकतो.आणि असे झाले देखील आहे.पण याचा अर्थ हा  मुलगा मूडी आहे असे देखील मला म्हणायचे नाही.या मुलाची एक गोष्ट मला सर्वात जास्त आश्चर्यकारक वाटते ती म्हणजे आत्तापर्यंत एकही दिवस असा गेला नाहीये कि आम्ही एकत्र कुठेतरी गेलो आहे आणि याला याच्या ओळखीची  एकही व्यक्ती भेटली नाहीये .कायम याला कोणीतरी ओळखीचे भेटतेच.आणि मग हा त्याला जाऊन भेटणार हि गोष्टी तर आता इतक्या नित्त्याच्या झाली आहे कि याला कोणी भेटले नाही तर आम्ही आश्चर्य व्यक्त करतो.याला मी जेव्हा जेव्हा बघितले आहे तेव्हा हा  मुलगा कुठल्यातरी विचारात कायम  गढलेला असतो.कुठला विचार करत असतो हे त्याचे त्यालाच माहित पण प्रत्येक वेळी हा मुलगा कायम तंद्री लावून बसलेला असतो.

      प्रचंड  सरळमार्गी मुलगा इतक्या सहजतेने इतका जवळचा कसा झाला हा प्रश्न मला कधीच पडला नाही.या व्यक्तीकडून ज्या गोष्टी शिकण्यासारखा आहेत त्या तर मी शिकत आहेच पण अजूनही बरयाच गोष्टी शिकणे आणि पाहणे अजून बाकी आहे एवढे मात्र नक्की...साखरपुड्यातील जेवणात एकाच वेळेस दोन icecreams  घेऊन बसणाऱ्या याला "अरे  इथली icecreams संपणार नाहीत किव्वा आपल्याला घाई पण नाहीये त्यामुळे एका वेळी एक आणलास तरी चालेलअसे सांगायची माझी तेव्हाही हिम्मत झाली नाही आणि इथून पुढे देखील होणार नाही...


Þ Þ Þ

 "कुठे  तंद्री लागली आहे..?" असा प्रश्न कानावर आला आणि खडबडून जागा झालो....समोर आई कोलाज घेऊन उभी होती...आणि म्हणाली....."नशीब फक्त काचच फुटली आहे...एखादा तुकडा हरवला असता तर संपूर्ण चित्र वाया गेले असते....
माझ्याकडे बोलायला काहीच नव्हते....मी फक्त  हसलो...

2 comments: