मुलीने माझ्याशी येऊन बोलावे आणि आमची ओळख व्हावी या सारख्या गोष्टींवर माझा अजून विश्वास नाही.पण मी एखाद्या मुलीशी बोलावे आणि मग आमची ओळख होईल अशी अपेक्षा ( स्वप्न ) मी अजूनही बाळगू शकतो. या मुलीशी माझी ओळख तशीच काहीशी..प्रथमतः पाहिल्यावर कोणीही म्हणेल कि मुलगी प्रचंड शिष्ठ आहे आणि फार काही बोलत असेल असे वाटत नाही.आणि अगदी तशीच reaction माझी पण होती.आपण जेवढे विचारू तेवढेच ती बोलेल.स्वताहून बोलणे तर नाहीच पण आपल्यापेक्षा २ शब्द जास्त बोलायचे कष्ट देखील हिने घेतले नाहीत.पण हि गोष्ट झाली आमच्या ओळखी नंतर केवळ १० ते १५ दिवस. आणि नंतर हीच का ती मुलगी असे वाटावे इतपत हिच्यातील बदल समोर आला.पुढे अनेक कारणांनी भेट होत गेली आणि मग एक एक समजत गेले कि ज्या मुलीला शिष्ठ समजण्याची चूक आपल्याकडून झाली आहे ते एक वेगळेच रसायन आहे.गणपतीचे decoration ते दुसर्यांच्या घराचे decoration या दोन्ही गोष्टी एकाच उत्साहात करू शकणारी हि व्यक्ती इतका उत्साह आणि इतकी energy कुठून आणू शकते याचा मला अजून पत्ता लागलेला नाहीये. अश्या बरयाच गोष्टी आहेत ज्यामुळे हि मुलगी आपल्या ओळखीची आहे याचा मला अभिमान वाटतो.प्रचंड कल्पकता,नवीन शिकण्याची आवड, नेहमी काहीतरी वेगळे करण्याची इच्छा या तिच्या गोष्टींचे मला नेहमीच अप्रूप वाटत आले आहे.बर भरपूर रिकामा वेळ आहे असेही नाही.स्वतःची नोकरी सांभाळून त्यानंतर स्वताचे वेगळे काम सांभाळून, ग्रुप च्या ट्रीप, लोकांचे वाढदिवस मग हे बाकीचे उद्योग करण्यासाठी वेळ आणि ताकद कुठून येते?हा मला कायम पडलेला प्रश्न आहे.
केवळ Interior ला आहे आणि autocad येते एवढेच मला हिच्याबद्दल माहित होते.पण आता मला समजत आहे कि या गोष्टींशिवाय अश्या अनेक गोष्टी हि मुलगी सोयीस्कर पणे करू शकते.एखादे गावातले काम असेल तर आम्ही direct हिला सांगतो. म्हणजे "अरे इथे काम आहे का, हि आहेच हि करेल आरामात" इतके म्हणण्या इतकी सवयीची हि कशी काय होऊ शकते हेच कोडे मला अजून उलगडलेले नाही.
पण हिने आम्हाला कधीच निराश केले नाही प्रत्येक वेळी "मी करते" मला जमेल.हे माझ्या ओळखीचे आहेत तिथे मी विचारून बघते अशीच उत्तरे आम्हाला मिळत आली आहेत. बर फक्त creativity आणि बाहेरचीच कामा जास्त करते अशातलाही भाग नाही घरी गेल्यावर पुणे-३० ला लाजवेल असे अगत्य देखील मी अनुभवलेले आहे.कितीही पहाटे आणि कितीही रात्री हिच्याकडे चहा मिळेल याची खात्रीच झाली आहे.लोक घर सजवण्यासाठी काय काय करतात हे हिचे घर बघून समजते.हिचे अजून एक स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गोष्टीत काहीतरी कमी काढायची आणि सारख्या तक्रारी करायच्या.म्हणजे हे असेच काय आहे,हे तसेच काय आहे असे शब्द तर कायम स्वरूपी हिच्या तोंडात आहेत.
एखादी गोष्ट हिला पटली नाही न तर direct तोंडावर सांगणार.आणि आवडली तर appreciate पण लगेच करणार.हि गोष्ट इथे सांगायचा मुद्दा एवढाच कि तोंडावर नाराजी व्यक्त करणे हे appreciate करण्यापेक्षा अवघड असते.मी नाराजी अनुभवली आहे.माझ्यावर आणि माझ्यासमोर इतरांवर देखील.कारण स्वताच्या मनासारखा झाला नाही तर जे काही बोलायचा आहे ते हिच्या चेहेर्यावरूनच समजते.लगेच कपाळावर आठ्या हजर.प्रचंड प्रक्टीकॅल, पण emotional पण म्हणजे हिच्या ओळखीतल्या सर्वांनाच या दोनही बाजू माहित असतील याची मी खात्री देत नाही पण मी हिच्या दोन्ही बाजू पहिल्या आहेत हि माझ्या दृष्टीने मी जमेची बाजू धरतो.
एक प्रसंग आठवतो गणपतीच्या वेळेस आम्ही एका संस्थेसाठी गणपतीचे decoration करत होतो.सगळी तयारी हिच्याच घरी करत होतो तेव्हा रात्री ३ वाजता मला कंटाळा आला पण हि मुलगी तेवढ्याच उत्साहाने अजून काय करता येईल याचा विचार करत होती.प्रश्न ३ वाजण्याचा नाहीये पण काहीतरी वेगळे आणि नवीन करता येईल का या एकाच गोष्टीचा ध्यास घेऊन काम करणारी हि मुलगी एकदम काहीतरी वेगळी आहे असे वाटू लागले.बर एवढे करून तिला दुसर्या दिवशी ऑफिस होते आणि तरी देखील अजून काही गोष्टी लागणार असतील तर मी त्या आणते असे म्हणायला ती कमी पडली नाही.आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हिच्या घरच्या गणपतीची आरास देखील हीच करते.पण त्यात देखील काहीतरी वेगळेपण कसे आणता येईल याचा विचार तिने केला होता.
या मुलीचे एक मी नेहमी observe करत आलो आहे हि मुलगी जेव्हा जेव्हा भेटते तेव्हा प्रत्येक वेळा हिला लगेच कुठेतरी जायचे असतेच.म्हणजे असे फार कमी वेळा झाले आहे कि हि आलीये आणि म्हणालीये चला मी आता आहे बराच वेळ.किव्वा मला इथून पुढे काही काम नाहीये.Either हिला कोणाला तरी भेटायला जायचे असेते किव्वा लगेच घरी जायचे असते.कायम कसली घाई लागलेली असते काही माहित नाही.हिचे आणि आईचे फोने वरचे बोलणे ऐकले तर विश्वास बसणार नाही कि हीच मुलगी आहे कि जी आई हॉस्पिटल मध्ये असताना रात्री आई बरोबर जागी होती.म्हणजे मला कळलच नाहीये कि हि एकटी मुलगी आई बाबांचा एवढा कसा करू शकते.आणि ते करून या सगळ्या बाकीच्या गोष्टी कश्या करू शकते.
कोणाकडे चहा घ्यायला जायचे असेल तर त्यासाठी कॅमेरा नेण्याची गरज काय आहे ?हा प्रश्न मला तेव्हा पडला जेव्हा हि मुलगी माझ्याकडे चहा घ्यायला कॅमेरा घेऊन आली होती.पण खरच नुसता कॅमेरा घेऊन फिरते असा नाही फोटो पहिले आहेत,so तिच्या कलेमध्ये अजून एक line add करायची संधी मिळाली.
काही मुली अशा असतात कि यांना मुली म्हणून घ्यायला आवडत नसावे त्यातील हि एक मुलगी आहे.अर्थात हिला मुलगी म्हणून घ्यायला आवडते पण मला हिला मुलगी म्हणणे तितके रास्त वाटत नाही. म्हणजे एखाद्या दुपारी कॅप,goggle,मनगटात band लावलेला,मानेवर कसलातरी tatoo काढलेला अशा अवस्थेत तुम्हाला चहा घेताना एखादी मुलगी दिसली तर तुमचे मत देखील माझ्यासारखेच होईल.समजा तुम्हाला या मुलीचे हिंदी संभाषण चोरून ऐकायला मिळाले तर चान्स घालवू नका.कारण कोणत्याही काचवाला,रंगवाला,carpenter या लोकांशी हिला हिंदीमधून बोलताना ऐकले कि तुम्हाला आपोआपच स्वतःच्या हिंदीवरील प्रभुत्वाची जाणीव होईल.
मला हिची एक गोष्ट पटलेली नाहीये.हिला जेव्हा लवकर जायचे असते तेव्हा ती नेहमी सांगते कि मी आत्ता जाते आणि थोड्यावेळाने परत येते मग भेटूच.आणि थोड्यावेळाने direct फोन करून सांगते कि आता परत बाहेर पडणे अवघड आहे.म्हणजे पहिल्या पहिल्या वेळेस जरा पटले होते कि खरेच असेल पण आता direct हसायला येते .आणि कदाचित तिलादेखील हे माहित असावे.पुणे ३० मधून अशी संगत लाभावी असे खूप कमी वेळा होते.. संगत अशीच टिकावी हि जरी मला माझी जबाबदारी वाटत असली तरी या साठी वेगळे कष्ट घ्यावे लागतील असे मला वाटत नाही कारण अजून अनेक गणपती,अनेक ट्रीप आणि अनेक वाढदिवस शिल्लक आहेत....आणि हिच्या मानेवरचा tatoo जरी कपाळवर गेला तरी बाकीच्या गोष्टी जागच्या जागी राहतील याची खात्री आहे....
फारच छान ...मानेवरचा टाटू कपाळावर ...छान कल्पकता आहे. शेवट आवडला
ReplyDeleteBut who is she?
ReplyDelete