Friday, March 4, 2011

६...


      मस्त  प्लेन mat  वर क्रिकेट खेळत असताना एखादा ball अचानक जास्त उडतो आणि डोक्यावरून जातो तेव्हा batsman ची जी गत होते अगदी तसेच माझे झाले जेव्हा हि व्यक्ती माझ्या संपर्कात आली.
      कायम कुठलीतरी मीटिंग सेमिनार आहे अश्या अविर्भावातील कपडे घातलेले,formal shoes etc पण min बोलल्यावर आपल्याला व्यवस्थित समजते कि हि व्यक्ती कुठेहि चालली  नाहीये..कारण हा मुलगा सदैव असाच राहतो.
      केवळ आपले मत दुसर्याला पटवून देणे यासाठीच आणि नुसते पटवून देणे नाही तर ते त्याच्या गळी उतरविणे हि गोष्ट फक्त हाच माणूस करू शकतो असा माझा याच्या संपर्कात आल्यापासूनचा ठाम समज आहे.आपण सृष्टी निर्माण केली त्यात मानवाने लोकांचे उदरभरण व्हावे यासाठी हॉटेल्स बांधली पण या प्रत्येक हॉटेल मध्ये जाऊन आपल्याला त्याची चव चाखणे हे काम अतिशय अवघड आहे असे वाटल्यामुळे आपल्यावतीने कोणीतरी प्रत्येक हॉटेल मध्ये जाऊन सर्व पदार्थांची चव घेण्यासाठी देवाने आपला एक दूत पृथ्वीवर पाठवला आहे आणि तो दूत म्हणजे हि व्यक्ती...हा माझा समज नाही ..हि माझी खात्री आहे.......
      या व्यक्तीची ओळख झाली तेव्हाचा त्याच्या बोलण्याचा tone आणि प्रचंड उपहासात्मक उद्गार यावरून त्याची image create करावी असे का कोणास ठाऊक पण कधीच वाटले नाही.एका संस्थेच्या निमित्ताने याच्याशी ओळख वाढली..प्रचंड leadership qualities,उत्कृष्ठ वक्तृत्व,इंग्लिश वरील command ( माझ्यापेक्षा चांगले इंग्लिश ज्यांचे आहे त्याला मी इंग्लिश वरील command म्हणतो  ) आणि कासट मधील पैठणी आम्हाला घरात पडदा म्हणून वापरायची आहे हे कारण दुकानदाराला सांगून पडद्याच्या भावाने विकत घेण्याची  ताकद असलेली माझ्या पाहण्यातील पहिली व्यक्ती.      सगळ्यांपेक्षा वेगळे आपले काहीतरी असावे किव्वा नेहमी काहीतरी वेगळे करून दाखवावे अशी कायम इच्छा बाळगून त्याप्रमाणे हि व्यक्ती सतत वागत असते.

प्रचंड आणि कायम उत्साहित असणे हि या माणसाच्या अस्तित्वाची ओळख आहेकारण एखाद्या ग्रुप मध्ये जर का एकाच व्यक्ती हातवारे करत बोलतीये तर मी ती व्यक्ती कोण आहे हे सहज ओळखू शकतोअर्थात या प्रचंड उत्साहाचा याला त्रास देखील होतो हे पण तितकच खरे आहे.
      कौटुंबिक जिव्हाळा या शब्दाला मराठी संस्कृतीत महत्वाचे स्थान दिले गेले आहेअसे  मी मराठीच्या पुस्तकात वाचले आहे असा माझा ठाम विश्वास आहेपण केवळ प्रात:विधी आणि रात्री याला वेळ असल्यास झोप या दोन कामांसाठी  चुकता घरी जायचे धाडस करणारा हा कौटुंबिक जीव मी रोज  अनुभवतो.
      सर्वसाधारण समाजामध्ये एखादे celeberation किव्वा कुठले निम्मित्त असेल तर लोक बाहेर हॉटेल मध्ये जेवतात पण हा माणूस काही निमीत्त आणि occasaion असेल तरी देखील घरी जेवत नाही .( इथे मी सण असा लिहायचा ठरवला होत)मला एका गोष्टीचे भयंकर आश्चर्य वाटते हा माणूस रोज बाहेरचा कसा खाऊ शकतो.बर रोज बाहेरचा ani ते हि nonveg ?? अहो मनाची नाहीतर किमान जनावरांची तरी काळजी ?? ( मनाची लाज ...जनावराची काळजी )आणि हे त्याला सांगायचा प्रयत्न केला तर आपल्याला त्याच्याबरोबर जेवायला जावे लागते .
या मुलाला मी कधीही चिडलेले पाहिलेले नाही.....फक्त हॉटेल चा waiter , एखाद्या तिकीट विक्रीला बसलेला माणूस,सिग्नल ला उभे राहिल्यावर चुकून थोडा धक्का लागलेली व्यक्ती या लोकांवर याचा का राग आहे याचे मला कधीच कोडे उलगडलेले नाही.हा माणूस प्रत्येक हॉटेल मधल्या waiter शी नीट का बोलत नाही  ?हा माणूस हॉटेल मध्ये मिळणारे पदार्थ जसे मिळतात तसे का खाऊ शकत नाही ?हे  मला प्रामाणिक पडलेले प्रश्न मी त्याला विचारायची हिम्मत कधीच करत नाही .
याला अजून तरी girlfriend नाही असे तो म्हणतो बाकीचे हसतात.बर girlfriend नाही तर मग हा रात्री १२  वाजता देखील एखाद्या busy  businessman प्रमाणे फोनवर कोणाशी बोलतो ?या मुलाची सर्वसाधारण  पणे दोन  रूपे आहेत जर तुमच्या बरोबर मुली असतील तर याचे वागणे आणि जर तुम्ही फक्त मुले असाल तर याचे वागणे या मध्ये जमीनआस्मानाचा  फरक आहे.आणि मी गेले  वर्ष या गोष्टीचा आनंद घेत आलो आहे.भरपूर ट्रीप भरपूर niteouts,प्रचंड फिरणे या माध्यमातून मी जे काही याला ओळखले आहे त्यातूनच हे लिहायचे धाडस मी करीत आहे.
कायम मदतीसाठी तयार .कोणतीही जबाबदारी अंगावर घेण्यास तयार या व्यक्तीला मी कधीही बोलावले याने मला कधीच निराश केलेले नाही आणि निराश करायची शक्यता देखील नाही.याच्या बरोबर खूप वेळा याच्याच गाडीतून फिरलो पण "अरे मला drive करायचा कंटाळा आला आहे आज प्लीज तू चालवअसे वाक्य देखील कधीच ऐकले नाही.
      क्रिकेट विषयी चर्चा करण्यात सर्वात पहिले सहभागी होणारा माझा सर्वात जवळचा पार्टनर.तेंडूलकर ची century  आणि ponting ची विकेट या दोनही गोष्टींसाठी फोन करून आपले मत कळविणारी पहिली व्यक्ती या व्यक्तीला लोकांना counselling करायला का  आवडते कोण जाणे.पण सदैव फोनवरून किव्वा प्रत्यक्ष भेटून हिला जरा समजावून आलोत्याचे   भांडण solve  केले ,त्याची जरा मारून आलो हीच वाक्य त्याच्याकडून ऐकत आलोय.
या माणसाने केलेले एक विशेष काम म्हणजे ही व्यक्ति पु. ना  प्रत्यक्ष घरी जावून भेटून आलीयेपु.च्या घराची बेल वाजवून त्यांना जावून भेटने एवढा मोठा पु.. fan माझ्या ओळखीतील पहिलाच.( मी पहिलाच लिहिले आहे एकमेव नाही)बर नुसता fan आहे असेही नाही तर पु..नचे  साहित्य मुखोड्गत आहे.आणि गाडीवर,कट्ट्यावर बसून ,होटलमधे  कुठेही ही व्यक्ति धाडधाड म्हणून  दाखवायची  तयारी राखते.
काही वेळेला एखाद्या philosophical विषयावर आपले विचार मांडण्याचा याचा प्रयत्न असतो .म्हणजे कोणतातरी विषय असतो आणि आपल्याला काय वाटते आणि हे कसे बरोबर आहे हे सांगायची त्याची धडपड कितीही झाकली तरी निदर्शनास येतेच.
एखाद्या मिठाईवाल्याच्या दुकानात किम्मत विचारता विचारता / पेढे खाऊ  शकणारा हा  इसम चार  चौघात आपल्याला  मान  खाली घालायला लावू  शकतो आणि  याची मला अनंत वेळा प्रचिती आली आहे      या व्यक्तीला मी संपूर्ण ओळखतो असे म्हणणारा  एकही माणुस मी पाहिलेला नाही किंबहुना तो  स्वताही स्वताला किती ओळखतो याची मला अजुन  शंकाच आहे.
एवढे सगले जड़ जड़ बोलूंन झाल्यावर एक गोष्ट येथे सांगावीशी वाटते की जरी चार चौघात विचारवंत वाटत असला (शक्यतो मुलींमधे किव्वा अनोळखी मुलानमध्येही ) तरी आमच्या आमच्यात या मुलासारखा बालिश आणि अश्लील व्यक्ति मी अजुन पहिली नाही किंबहुना पहाण्यात यायची  शक्यता देखिल नाही.भयंकर  शिव्या आणि शिव्यांचे customized version मी याच्याकडून ऐकले आहे.
      काही वेळा याच्या मराठीच्या अतिशय सोप्या चूका होतात (मुद्दाम करतो ?) आणि आम्ही त्यावर पोट धरून हसतो तेव्हा ही व्यक्ति देखिल तेवढ्याच जोरात हसते.
या मुलाला तुम्ही एकदातरी आपल्या (याच्या) आई ,वडिल किव्वा भावाशी बोलताना एका  ...माझी विनंती आहे.... मी wrong  number शी देखिल त्यापेक्षा अदबीने बोलतो .....
अजुन एक  सांगावेसे वाटते या  मुलाला कसलीच लाज  वाटू शकत नाही ...मी आत्तापर्यंत सुमारे ३०  pictures पाहिले आहेत याच्याबरोबर, कदाचित जास्त देखिल .पण मला आज एकही picture आठवत नाही की ज्यामधे hero ची एंट्री झाली आणि याने उभे राहून त्याचे नाव मोठ्याने  घेतले नाही. ....अशावेळी आम्ही कुठे बघायचे  ??
एखाद्या ट्रिप मध्ये  (पूर्ण  पणे मुलांचीयाला बघणे हा एक वेगळाच आनंद(मला अनुभव लिहायचे होतेअसतो.आता atleast मी तरी समाजाचे भान ठेवायला हरकत नाही आणि  त्यामुलेच पुढचे कही लिहिण्याचे मी टाळतो.      जुने किव्वा college मधील किस्से सांगत असताना अगदी आपण  त्याच्याबरोबरच होतो की काय आशा तर्हेने  तो वर्णन करतो....आणि बहुतेक त्याला हे माहित नसावे की त्याचे ठराविक १०/१२  किस्से मी  विविध लोकांबरोबर ३०-४० वेळा सहज ऐकले आहेत...
पहिल्या भेटीत आम्ही माणसे ओळखतो असे ज्यांचे स्वताहबद्दलचे  ठाम मत आहे अश्या लोकांनी याला किमान / वेळा तरी भेटावेच ...अहो म्हणजे तुम्ही याला ओळखाल असे नाही...पण तुमचा गैरसमज नक्की दूर होइल...
पण असे जरी  असले तरी या अनोळखी व्यक्तीबरोबर  घालविलेले दिवस आणि अजुन शेवटपर्यंत घालवायचे दिवस हा आनंददायी प्रवास माझा  बाकि आहे आणि  याच आनंदात माझी लेखणी बंद करायचा निर्णय मी घेतोय....

No comments:

Post a Comment