आईला !!!! ..कोण आहे ही ...अशी पहिली reaction होती माझी....जेव्हा मी हिला माझ्या एका मैत्रिणीच्या घरी पाहीले......अर्चिस च्या दुकानात ठेवलेला teddy bear आठवला....कदाचित दिवसातील काहीवेळ त्या teaddy bear च्या कपाळावर तरी आठ्या येऊ शकतील पण माझ्या पाहण्यात या मुलीच्या चेहऱ्यावरील हास्य आत्ता पर्यंत एकदाही कमी झालेले नाही...हास्य नव्हते हे म्हणण्याची मी हिम्मत देखील करत नाही.जर तुम्ही हिच्या बरोबर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी असाल तर हिच्या वागण्याने तुमची मान आपसूक खाली जाईल..मोट्ठ्याने हसणे वेडी वाकडी तोंडे करणे या कारणामुळे बाकीचे लोक आपल्याकडे पाहतात पण या मुलीला त्याचा तसूभरदेखील फरक पडत नाही.पण आता मात्र मला याची लाज वाटत नाही.सवय झाली असा म्हणू शकता पण सवयीपेक्षा देखील तिला थांबवायची इच्छा अजिबात होत नाही...आणि मी त्याच्या १०० टक्के आनंद घेतो.हि मुलगी बोलते,लाजते का हसते हे ओळखण्यातच माझे पाहीले २/३ महिने गेले पण नंतर मी असे ठरवले कि ही मुलगी फक्त हसते. आणि तेच खरय.म्हणजे ही मुलगी घरात आहे कि नाही हे तिच्या चपला पाहून ठरविण्याच्या आधीच तिचे हसणे तिची हजेरी देऊन गेलेले असते .
एक असाच प्रसंग आठवला म्हणून सांगतो..एकदा आम्ही चौघजण वैशाली मध्ये गेलो
..हि पण होतीच (अर्थात)..तेव्हा आमच्या शेजारी बसलेल्या एका कुटुंबाने Onion उत्तपा मागितला होता आणि waiter तो घेऊन आला.पण त्यांच्या टेबल वर आधीच्या डिशेस तश्याच होत्या म्हणून त्या तिथून नेई पर्यंत त्याने ती onion उत्तप्याची डिश आमच्या टेबल वर ठेवली.तर
या मुलीने त्या onion उत्तप्याचा एक छोटा तुकडा त्याच्याच सांबारात बुडवून खाल्ला. आता या वेळी आमची काय गत झाली हे संगे न लागो.त्यानंतरचा संपूर्ण वेळ आम्ही कुत्र्यासारखे हसत होतो.आणि तेव्हा हि मुलगी काहीही करू शकते याचा पुन:प्रत्यय आला.पण एवढे होऊन देखील माझ्या हिच्या ओळखीत हिचा एकदाही राग आला नाही आणि येण्याची शक्यता देखील वाटत नाही.
हि ग्रुप मध्ये असताना काहीतरी वेड्यासारखा वागते किव्वा बोलते आणि हळूच सगळ्यांकडे बघते आणि याची खात्री करून घेते कि कोणाकोणाला समजले आहे आणि कोणाला नाही.आणि अर्थातच हे सगळ्यांना समजलेले असते तेव्हा सर्वात जास्त मोट्ठ्याने परत हीच हसते.
मला या मुलीची अजून एक गोष्ट आश्चर्यकारक वाटते ती म्हणजे हिची गाण्याची आवड.असेच एकदा मी हिच्या mobile मधील गाण्याची लिस्ट पाहत होतो आणि लक्षात आले कि काहीतरी भलतीच गाणी हिला आवडतात.पण ती याच्यावर आनंदी आहे.आणि नुसती आनंदी नाही तर एखादे नवीन गाणे आले तर ती आवर्जून आम्हाला "अरे माझ्याकडे नवीन song आलंय..bluetooth ऑन कर " हे तिचे वाक्य असते .
BMCC,कोलाज ,रूपाली,वैशाली,टेकडी,Trak ,पर्वती अशा अनेक ठिकाणी आम्ही एकत्र गेलो आणि प्रत्येक वेळी हिच्या स्वभावाची नवीन बाजू समजत गेली ..समजत गेली म्हणजे मी समजून घेत गेलो.या मुलीच्या बाबतीत एका कुतूहलापोटी एक विचार मनात आला कि हि मुलगी कोणत्याच कामाला कधीच नाही का म्हणत नाही?.आत्ता पर्यंत माझ्यासमोर हिला लोकांनी जी जी कामे सांगितली आहेत त्यापैकी एकही कामाला तिने नकार दिलेला माझ्या स्मरणात नाही.भले ते काम तिला जमले नसेलही कादाचीत पण "ठीक ए ना ..मग आपल्याला काय करता येईल....कस करायचा" असे काहीतरी वाक्य innocently बोलून या मुलीने मला पदोपदी जिंकून घेतले आहे.का कोणास ठावूक पण या मुलीवर चिडावेसे असे कधीच वाटले नाही...आणि समजा कधी असे वाटले तर हिला बघूनच आपल्या रागाचा विषय कट होतो. अर्थात रागवायची वेळ येणे देखील अवघड आहे म्हणा.आणि हे फक्त माझ्याच बाबतीत आहे असेही नाही पण हिच्याशी रागावून न बोलणारा व्यक्ती औषधालाही सापडणार नाही याची मी खात्री देऊ शकतो.
समाजसेवा कोणी करावी असा प्रश्न विचारला तर मी सर्वात पहिले या मुलीचे नाव घेईन.प्रचंड मदत करण्याची तयारी आणि इच्छा...आणि कोणत्याही level ला जाऊन मदत करणे हा ठायी भाव.
'मराठी' हा शब्द देखील म्हणताना चुकणारी हि मुलगी.बोलताना थोडे इकडे तिकडे होतेच पण याची तिला कधीच लाज वाटलेली नाही..मराठी बोलण्याची आणि लिखाणाची आम्ही तिची पदोपदी थट्टा करतो ..पण आता ती तशी बोलली नाही तर थोडा चुकल्यासारखा वाटत.पण आपली चूक कुठे झाली हे विचारायला ती कधीच विसरली नाही.आणि तिला बरोबर शब्द काय आहे हे सांगेपर्यंत ती मला विचारत राहते.
तिचे type केलेले messeges तुम्ही पहिले नसतील तर एकदा जरूर पहा...बोलत असताना "R" गाळायचा आणि लिहित असताना कुठेही "H" लावायचा या गोष्टी ती मुद्दाम करते का ? ..असे वाटण्याइतपत मी चकित आहे.
मी आत्ता पर्यंत बर्यच वेळा हिच्याबरोबर हॉटेल्स मध्ये गेलो आहे.(याचा अर्थ मी मुलींबरोबर वरचेवर हॉटेल मध्ये जातो असे घेण्याची गरज नाहीये).पण या मुलीने "सध्या diet चालू आहे त्यामुळे मी काही घेणार नाही पण तुम्ही घ्या" एवढे एकाच वाक्य सांगितले आहे.हि मुलगी न चुकता संध्याकाळी ७ वाजता जेवते..आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवतो.
प्रचंड creativity ..मग अगदी invitation card बनवायचे असो किव्वा paper bags बनवायच्या असो .मी करते,माझ्याकडे आहे,मी विकत घेऊन येईन सगळा हिलाच करायचा असता.दुसर्याला त्रास होईल म्हणून स्वतः त्रास करून घेणे किव्वा त्रास झाला तरी चालेल अशी समजूत करून घेणे हे कोणत्या प्रकारचे वागणे आहे हे मला अजूनही कळत नाही.पण दुसर्यांच्या मदतीसाठी कायम तयार असलेली हि मुलगी पहिली कि हिला कोणतेही काम सांगायची इच्छाच होत नाही एवढे मात्र नक्की.
एवढा सगळा असून देखील हे काम मी केले आहे असे सांगायला तिला कसली लाज वाटते मला अजून समजलेले नाही.कायम स्वतःला कमी लेखून स्वतःच्या कमचे क्रेडीट दुसर्याला देण्यात कोणती धन्यता हिने मानली आहे हे काही मी अजून समजून घेऊ शकलो नाही.एखाद्या कामासाठी टाळ्या वाजवायला सदैव तयार पण स्वतासाठी टाळ्या वाजवून घेणे हिला का कधीच जमले नसावे.
हिचे घर म्हणजे जणू आमच्या ग्रुपचे headoffceसच आहे.कोणतेही काम असेल तर आम्ही हिच्या घरी जमतो.पण हिच्या घरी असताना मी एकदाही चहा बुडवला नाहीये.यांचे कुटुंब फक्त हसण्यासाठी भूतलावर आले आहे याची मला खात्री आहे.
हिच्या इंग्लिश शब्दांचा उच्चार हा आमच्या हसण्याचा एक भाग आहे....या मुलीची बहुतेक अशी समजूत असावी कि कोणत्याही शब्दातील "R" चा उच्चार करायचा नसतो.अर्थात सगळे शब्द इथे लिहिणे अशक्य आहे.पण तुम्हाला हिला भेटायची संधी मिळाली तर हि संधी देखील सोडू नका.अरे...उद्यापासून सगळीकडे सायकल वापरणार असे म्हणून बाजारातून नवीन सायकल विकत घेतली आठवडाभर देखील वापरली नसणार यात शंका नाही.पण याचा अर्थ असा नाही कि व्यायामाकडे दुर्लक्ष आहे.
आम्ही सकाळी trak वर चालायला जायचो तेव्हा १० min आधी येऊन २ फेर्या जास्त मारण्याकडे हिचा कल असतो. म्हणजे माझा पगार १०००० रु. ने वाढला याचा आनंद मला जितका तितकाच किव्वा त्यापेक्षा थोडा जास्त आनंद माझे १ किलो ने वजन कमी झाले हे सांगताना स्पष्टपणे दिसतो.
समाजसेवेची आवड आहे पण कुटुंबातील लोकांविषयीचे प्रेमही प्रचंड आहे.प्रत्येक गोष्टीत बहिण भावाचे नाव आई बाबांचा संदर्भ हा ठरलेलाच असतो.माझे daddy ,माझी mummy या शब्दाने सुरु झालेले वाक्य या गोष्टींची साक्ष देते.
एखादी गोष्ट आधी खूप वर्णन करून सांगितलेली असते मात्र तीच गोष्ट ती पुन्हा याच उत्साहात सांगते आणि आपण ती संपूर्ण ऐकून घेतल्यावर तिला समजते कि आपण हे आधी सांगून झाले आहे. तेव्हा भयंकर हसून विचारते "तुला माहिती होत? ना....मग सांगितला का नाहीस "...आणि केवळ हे वाक्य ऐकण्यासाठीच मी तिला मध्ये थांबवत नाही.
आपल्या कॉलेज च्या मित्रांबद्दल सांगताना कुठला उत्साह उसना घेऊन येते काय माहित.कायम माझा ग्रुप..आम्ही असे करतो....आम्ही इथे जातो....हे सांगण्यात तिला स्वतःला जो आनंद मिळतो त्याची मोजदाद मला ठेवता येऊ शकलीच नाही.नाचण्याची प्रचंड आवड म्हणजे चार चौघात नाचायला मी थोडा मागे पडतो पण तो पर्यंत हिचे निम्मे नाचून झालेले असते.इतके enthusiasm हिने कुठून मिळवले आहे ते आता हे लिहून झाल्यावर सविस्तर विचारणार आहे मी....तो पर्यंत तुम्हाला जमला तर हिला एकदा भेटून घ्या...जन्म तर तुम्ही घेतला आहेच पण तुम्ही हिला भेटला नसाल तर जगण्यात मजा नाही एवढे मी नक्की सांगू शकतो....
Kon ahe te hi sangun taka...mhanaje bhetata yeyil na....by the way dusaryala itake samjun ghenyachi kala ani wel donhi goshti tichya nashibane tuzyajawal hotya....!
ReplyDelete