Saturday, March 12, 2011

कोलाज…




अगदी परवाचीच गोष्ट...दुपारची वेळ होती..रविवार चा दिवस... जेवण करून घरचे जरा पहुडले होते..घरात निरव शांतता पसरली होती.. माझेही घरच्यांच्या सुदैवाने  जेवण झाले होते ... (त्यांच्याबरोबर)..साधारण १०-१५ मिनिटे इकडे तिकडे चुळबुळ केल्यावर असे लक्षात आले कि सध्या रात्री कानटोपी शिवाय फिरणे त्रासदायक आहेआणि मग माळ्यावर असलेल्या bags मधून कान टोपी काढण्याची सावध धडपड सुरु केलीकितीही शांतपणे काम करण्याचा माझा तो बिचारा प्रयत्न bagवर  ठेवलेल्या कोलाज च्या फ्रेमने क्षणार्धात फोल ठरवला .... काच तर फुटलीच पण आत असलेल्या कोलाज चे सगळे तुकडे माझ्या संपूर्ण बेडरूमभर झाले ... आणि आईची ची चिडचिड पुसटशी कानावर आली..." एक दुपारची झोप मिळते ती पण शांतपणे होईल असे वाटत नाही .. ..झोपल्यावरच  कसं  सुचत रे तुम्हाला ..." यातले शेवटचे  शब्द स्पष्ट ऐकू आले ..आणि मग पुन्हा एकदा शांतता ....मी अजूनही स्टुलावरच उभा होतो . आणि खोलीभर विखुरलेल्या त्या कोलाजच्या तुकड्यांवर नजर  गेली....५०० तुकड्यापासून बनविलेले सचिन तेंडूलकरच्या चेहेर्याचे ते कोलाज होते ..विखुरलेल्या तुकड्यांवरून नजर सरकत होती आणि अचानक विचार  डोकावला .यातला एक जरी तुकडा हरवला .तर आता हे कोलाज कधीच पूर्ण होऊ शकणार नाही ...आणि मी पटापट सगळे तुकडे गोळा केले ...५०० भरले ..कोलाज तयार  केले .आणि भिंतीला टेकवून ठेवले .काचा उचलल्या .हात धुतले आणि गादीवर येऊन बसलो .आणि शेजारी असलेला मोबाईल vibrate झाला ...... ....... Calling  ... फोन  उचलला ....बोलून झाले ...आणि सुई टोचल्यावर बोटातून रक्त यावे त्याप्रमाणे मनातून विचार आला .जर हे फोन करणारे तुकडे ( तुकडे म्हणायला जीभ तर सोडाच पण मन देखील धजावत नाहीये ) नसले असते तर माझ्या आयुष्याचे कोलाज पण अपूर्णच राहिले असते .अजूनही आयुष्याचे कोलाज  पूर्ण  आहे असे म्हणत नाही ...पण आज पर्यंत जे तुकडे बसवले आहेत त्यामुळे जी छटा  तयार झाली आहे ती तरी मनाला संपूर्ण समाधन देणारीच आहे ....आणि म्हणूनच आज जीवनाचे कोलाज  घडविण्यात  मोठा वाटा उचलणाऱ्या या विविध रंगी,  ढंगी,  तुकड्यांचा  अतिशय  जवळून  घेतलेला  आनंद ...  




ûûû

Friday, March 11, 2011

१...


खाकी चड्डीस्वच्छ half shirt  , दोन बंद असलेले दप्तर आणि गळ्यात घातलेले जानवे shirt वरून जाणवत आहे .शाळा सुटल्यावर पेरू च्या गाडीवर हमखास  दिसणारा गोंडस मुलगा... हे त्याचेच वर्णन असावे असा समाज माझा  वर्षापूर्वी नक्की झाला..

ती  संध्याकाळ अजूनही तेवढीच आठवतीये जेवढी तिथे बसून अनुभवत होतो .आम्ही / जण एका टेबल वर बसलो तो शेजारच्या टेबल वर १२ /१३ मुला  अशक्य  गोंगाट  करीत होती...आणि या group चा हा म्होरक्याच आहे असे पदोपदी वाटावे असे याचे वागणे म्हणू शकतो किव्वा असणे.
टाळ्या देत मोठ मोठ्यांदा बोलणेवाक्यात  पूर्णविरामाऐवजी शिवी देतात अशी समजूत असल्यासारखे लोभस बोलणे या गोष्टी पाहून आपसूकच या व्यक्ती कडे  तेव्हाच आकर्षित झालो आणि आजच्या दिवसापर्यंत हे आकर्षण वाढतच आहे .

त्या संध्याकाळी प्रथम पहिले .आणि नंतर रोज पाहत होतो...हळू हळू एकमेकांकडे बघून हसायचो....कधी कधी बोलायचा योग देखील आला...आणि आता  बोलायचे  नसेल तरच योग यावा लागतो...
काही लोक क्षणार्धात आपलस करून घेतात असे ऐकले होते पण प्रत्येक गोष्टीची प्रचीती येतेच आणि आली देखील .ओळख व्हायला कारण लागते किव्वा  कोणत्यातरी प्रसंगामुळे एखाद्या व्यक्तीची ओळख होते असे शक्यतो होते .पण या व्यक्तीची ओळख होण्यासाठी कोणतेच कारण नव्हतेकोणता प्रसंग देखील नव्हता .
बोलता बोलता असे समाजात गेले कि वय तर सारखे आहे पण आवडी निवडी,  सवयी यांची देखील सोबत आहे आणि  याच  2/  शब्दांच्या  आधारावर  सुरु  झालेला  आमचा  तिथून  पुढचा  प्रवास  अजून  चालू  शकेल ..मरेपर्यंत ...
शाळा कॉलेज सर्वसाधारण  मित्र  देखील  आपले  नेहमीचेच ..पण  का  कोण  जाणे  या  व्यक्तीने  मनात  कायमचे  घर  केले .
काही  लोकांचा  प्रचंड  राग  येतो ..पण  अतिशय  वेगाने  तो  कमी  होतो  याच  पठडीतील  व्यक्ती .
अनंत कारणांनी याचा राग येतो....पण  हा  राग  फार  वेळ  टिकवणे  मला  जमलेच  नाही .

प्रचंड आवडी निवडी  जपणारा हा इसम .पायातल्या  चपलेपासून फेकून मारायच्या चपलेपर्यंत आपली आवड जपतो.
Typical कोकणस्थ कार्टी असतात  त्यांच्यातलाच हा एक असावा .
रोजची भेट आणि भरपूर फिरणे याच्या आधारावर त्याचे अनेक पैलू पाहता आले .

बोलण्याची एक वेगळीच लकब हा एक अतिशय प्रभावी आणि वैशिष्ट्यपूर्ण गुण घेऊन जन्माला आलेला मुलगा .
मला फोटोग्राफी करायची आहे ..मला बेक्कार ट्रेक्स करायचे आहेत....मला अशक्य भारी football खेळता आले  पाहिजे...मला खूप भारी पोरगी मिळायला हवी अश्या  अनेक इच्छांचे ओझे बिनादिक्कात वाहणाऱ्या या मुलाला माझा सलाम .या गोष्टींची इच्छा बाळगणारे वेगवेगळे लोक मी पहिले पण सगळ्याच इच्छा बाळगणारा एकाच तरुण मी आज पहिल्यांदा पहिलावास्तविक पाहता ज्या पद्धतीने तो या वरील गोष्टी सद्यस्थितीत  करतो ते पाहता याहून जास्त तो काय करू शकणार आहे याचा विचार करण्यात माझा  पुढचा वेळ घालवायची माझी अजिबात इच्छा  नाहीये .
प्रचंड हट्टी स्वभाव आणि भयंकर मनमानी वागणे.कोणतीही गोष्ट आपल्याला हवी त्या पद्धतीने करणे हा याचा ठायीभाव.
अतिशय कौटुंबिक मुलगा.ज्या नियामित्तेने प्रत्येक शनिवारी शनीला जाणार त्याच ( किव्वा त्यापेक्षा थोडा जास्त )  नियमित पणे दारू पिणारा माझ्या पाहण्यातील  एकमेव व्यक्ती .
संगीताची आवड,खेळातील जाण,निसर्गाशी जवळीक,एवढे असून देखील कायम नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा असलेले हे पात्र नेहमची १०  डोक्यांमधून उठून  दिसते एवढे मात्र नक्की .
आपल्या मनासारखे झाले नाही कि रुसून बसणे किव्वा रागराग करणे हि हट्टीपणाची लक्षणं अजूनही याच्यात स्पष्ट दिसतात .
एखाद्याला आपल्या सोयीनुसार आणि गोड शब्दात वळवणे मी  याच्याकडूनच शिकायचा प्रयत्न करतोय .
पाऊस पडत असताना समजा याला भरपूर वेळ असेल तर आपण   व्हीलर नि जाऊन कशी मजा करू  शकतो आणि पाऊस पडत  असताना  याला  कंटाळा  आला  असेल गाडी  देखील available  असेल तर या पावसात कश्या पद्धतीने bore होईल या दोन गोष्टी आपल्या गळी उतरविण्याचे काम हा माणूस अगदी निर्विघ्न पणे करत आला आहे.....

एक प्रसंग सांगावासा वाटत आहे एकदा असेच / मित्र  आम्ही  S.M जोशी  bridge  वर बसलो होतो .या पोराला प्रचंड झोप आली होती .आणि त्वरित घरी जायचे  होते .पण आम्हाला सगळ्यांना अजून थोडावेळ थांबायचे होते.तेवढ्यात समोरून एक पोलीस जीप pass झाली .हा मुलगा आहे तसा उठला आणि आम्हाला म्हणाला  "चल  बाबा पोलीस गांड मारतात रात्रीचे  " तसं पहायला गेलं तर हि गोष्ट आम्हाला माहित आहे ..पण आम्ही अजून १० min सहज  थांबू  शकलो  असतो .आणि  हे  त्यालाही माहित होते कि पोलीस लगेच हाकलत नाहीत .पण त्याला लगेच निघायचे होते त्यामुळे पोलीस हे कारण देऊन त्याने आम्हाला तिथून घरी नेले .आणि  त्याच्या झोपेपायी आमच्या गप्पा स्वप्नातच राहिल्या .

याला जेव्हा जेव्हा घ्यायला जावे लागले आहे तेव्हा तेव्हा ह्या मुलाने खाली यायला वेळ लावला .पण एक गोष्ट आहे....याची वाट पाहताना येणारा राग हा तो समोरून  आला कि का नाहीसा होतो हे कोडेच मला अजून उलगडलेले नाही .
का कोण जाणे कायम असे वाटते कि ह्या मुलाने कधी मोठेच होऊ नये .पण याचा अर्थ असा नाही कि maturity level कमी आहे .प्रचंड mature आहे  फक्त हि  maturity त्याच्याबरोबर मुली असतील तर अधिक प्रभावी पणे निदर्शनास येते .
ह्या माणसाला तुम्ही "असे का केले , आला का नाहीस , फोन का केला नाहीलवकर घरी का चाललास " असे प्रश्न विचारण्याची हिम्मत करू नका .कारण सांगतो ह्या माणसाकडे या प्रश्नांची उत्तरं आधीपासून आणि व्यवस्थित तयार आहेत नुसती तयार नाहीत .पण ती उत्तरे तो आपल्यावर लादण्यात कायम यशस्वी ठरणार यात  दुमत नाही .
आई ओरडेल किव्वा घरी काम आहेत हे अतिशय सरळमार्गी कारण देऊन घरी जाऊ शकणारा एकमेव व्यक्ती माझ्या पाहण्यात आहे क्लास च्या नावाखाली picture पाहणे ..College च्या  नावाखाली  carrom खेळणे ...Submission   किव्वा  project करण्यासाठी niteout करणे...या  गोष्टी  यथासांग पार पाडणारा हा  नातेवाईकांकडे बार्शी ,भाऊबीज ,केळवणं त्याच  उत्साहाने  attain करतो .
एका दिवसात  वेगळ्या मुलींना हॉटेल मध्ये भेटण्याची ताकद असलेला माझ्या पाहण्यातील आणि जवळची हि एकमेव व्यक्ती आहे .आणि एवढे असून देखील  स्वतःची बहिण जर दुसर्या मुलाबरोबर उभी असेल तर तिला तंबी द्यायला तो विसरत नाही .
सचिन तेंडूलकर आउट झाला या गोष्टीसाठी आई,बहिण या लोकांना जबाबदार  ठरवून त्यांच्याशी भांडायची तयरी असलेली हि व्यक्ती .पण जेव्हा आम्ही सगळे  एकत्र match पाहतो तेव्हा हा आमच्याबरोबर कधीच येत नाही कारण सगळ्यांबरोबर पहिली तर सचिन लवकर आउट होतो असा बापडा समज आहे याचा .
आणि जेवढी excitment cricket मध्ये तेवढीच किव्वा त्यापेक्षा जास्त football मध्ये आहे .मी याचा खेळ प्रत्यक्ष फार कमी पहिला आहे .पण याच्या बोलण्यावरून  मी असा निष्कर्ष काढला आहे कि हा पोरगा जिभेने जास्त खेळत असावा .... 

प्रचंड आळस....कुठेही जायचे असेल आणि याला गाडी चालवायचा कंटाळा आला असेल ( अर्थात /१० वेळा  याला  कंटाळा असतोच ) तर याला कायम घ्यायला जावे लागते .आणि समजा आपल्याला घ्यायला जमले नाही तर तो "ठीक आहे मग मी नाही येत " असे सांगून येण्याच्या आशेवर व्यवस्थित  पांघरून घालू शकतो .  
समाजसेवेची आवड नाही म्हणत पण जाण तर नक्की आहेयाच्या बरोबर राहून मी खूप काही शिकलो छोट्या छोट्या गोष्टींमधून बरेचसे शिकायला मिळाले .
खूप एकत्र फिरलो भरपूर हसलो पण याच्या बरोबर भांडायचा योग ( ?) कधीच आला नाही ..आणि नाहीच येणार .
आमच्याच असा नाही पण अनोळखी लोकांमध्ये देखील तेवढ्याच ओळखीने बोलताना मी याला पहिले आहे .कोणत्याही group मध्येपाण्यात साखर मिसळावी त्या  सहजतेने हा मिसळू शकतो .आणि यामुळेच भरपूर मित्रपरिवार आपल्यासोबत अतिशय व्यवस्थित caacacacacacacasaca carry करतो आहे .

हा मुलगा पुढे काय करेल हे आत्ता सांगता येईल इतके सोपे नाही पण तो कितीही मोठा झाला तरी खालून हाक मारल्यावर खाली यायला लागणारा वेळ लवकर व घरी  जाण्यासाठी kivva    येण्यासाठी देण्यात येणारी कारण यात काही फरक पडेल असे मला वाटत नाही ....

याला एकदा operation च्या निमित्ताने admit केले होते.पण त्याला भेटायला गेलो याचा अर्थ तुम्ही घ्याल कि शांतपणे गेलो  शब्द बोलले आणि आलो .तर ते  मुळीच नाही .आम्ही तिथे गेलो कारण आमच्या रेगुलर member आज तिकडे होता....म्हणून आम्हाला आमचा कट्टा तिथे हलवणे क्रमप्राप्त होते....या व्यक्तीला माझ्या जीवनातून वजा करणे मला शक्य होणारच नाही...पण तो  माझ्या आयुष्यात नसेल याचा साधा विचार देखील मी करू शकत नाही ...