प्रश्न ७ वा.अ) पत्रलेखन गुण – ८
।। श्री ।।
प्रति,
सचिन रमेश तेंडूलकर
भारत
भारत
पत्र लिहिण्यास कारण की ,
...तुझ्या चाहत्यांची निराशा लपत नाही,समालोचकांचे खोचक बोलणे आता ऐकवत नाही,पत्रकारांची टीका असह्य होते,तुझा तिरस्कार करणार्यांचा असुरी आनंद पाहवत नाही आणि मुख्य म्हणजे मला इतक्या मोठ्या कालावधीसाठी गप्प बसणे जमतही नाही...
गेली तीस वर्ष तुझ्या कीट मधून तुझ्याबरोबर हिंडते आहे.किट मध्ये आडवे पडण्यापेक्षा तुझ्या हातात तलवारी सारखे मी स्वतःला ऐटीत मिरवले.मेहनत,चिकाटी,प्रयत्न या बरोबरच यश,समृद्धी,प्रसिद्धी,अपेक्षा,इच्छापुर्ति आणि अपेक्षाभंग देखील मुबलक अनुभवला.यशाच्या सर्वोच्च उंचीवर विराजमान होण्याचा मान मिळालेला पाहून सर्वत्जास्त आनंद जर कोणाला झाला असेल तर ती मी होते आणि कायम राहीनच.कारण या यशात तुझ्या बरोबर मी कायम होते.आणि अर्थात दुखाच्या प्रसंगात देखील.
समोर आलेल्या चेंडूला छातीवर झेलायची सवय असलेल्या मला हल्ली हल्ली थोबाडीत मारावी तसे हे कडेला चाटून जातात.कधी कधी तर जवळून जाऊन हुलकावणी देतात.अपयशाची सवय नाही..आणि सवय लावायची इच्छाही नाही.इतक्या वर्षात राजाच्या थाटात क्रिकेट जगताचा अनभिषिक्त सम्राट म्हणून गाजलेला तू टीकाकारांचा चेष्टेचा विषय होणे याहून मोठे दुर्दैव नसावे.टीकाकार बोलत राहतीलच पण ज्या प्रेमापोटी लोकांनी तुला आपलेसे केले त्या प्रेमाला कुठेतरी धक्का लेगेल कि काय अशी उगीचच भीती वाटते...
तुझ्या मनात काय चालू आहे याची मला कल्पना नाही.पण अपयशाची चिंता आणि त्याचे बनलेले राजकारण,समाजकारण,आणि अर्थकारण याची कल्पना कदाचित तुलाही नसेल.
कधी थांबावे हे तुला सांगणे न लागो.पण लोकांनी थांब म्हणण्याची वेळ अस्वस्थ करते.'नव्या लोकांना जागा करून द्या' या वाक्यापाठीमागे नको नको ते ऐकून घ्यायची वेळ येऊ नये.तुझ्याविना क्रिकेट पाहणे अथवा न पाहणे हा त्यांचा वय्यक्तिक प्रश्न आहे.पण मान खाली घालून पँव्हेलियनकडे परतताना तुला पाहणे माझ्याने शक्य होईल असे मला वाटत नाही.
कधी थांबावे हे तुला सांगणे न लागो.पण लोकांनी थांब म्हणण्याची वेळ अस्वस्थ करते.'नव्या लोकांना जागा करून द्या' या वाक्यापाठीमागे नको नको ते ऐकून घ्यायची वेळ येऊ नये.तुझ्याविना क्रिकेट पाहणे अथवा न पाहणे हा त्यांचा वय्यक्तिक प्रश्न आहे.पण मान खाली घालून पँव्हेलियनकडे परतताना तुला पाहणे माझ्याने शक्य होईल असे मला वाटत नाही.
लोकांच्या अपेक्षांचे ओझे तुला विचारून वाढत नाही...आणि तूच उंचावलेल्या अपेक्षांची विल्हेवाट लावणे कदाचित तुला सद्य परिस्थितीत अवघड जात असावे असे वाटते.कारण खेळत असलेले शरीर बॅंटरीवर चालत नाही.टीव्ही समोर पाय वर करून बघणार्यांना तुझ्याकडून अपेक्षा ठेवायला काय जातंय म्हणा.देवाचा दर्जा देऊन मनोरंजनाचा प्रसाद मागणे हि खूप सोपी गोष्ट असते अरे.पण हे मनोरंजन पुरवताना होणारी झीज टीव्ही वर दाखवत नाही किव्वा दिसतही नसेल कदाचित आणि हेच तुझं दुर्दैव आहे.
संदेशवहनाचे सगळेच मार्ग तुझ्याच चर्चेने ब्लॉक झालेले आहेत.उलट सुलट चर्चांनी उच्छाद मांडला आहे.आणि याचे उत्तर फक्त तुझ्याचकडे आहे.
संदेशवहनाचे सगळेच मार्ग तुझ्याच चर्चेने ब्लॉक झालेले आहेत.उलट सुलट चर्चांनी उच्छाद मांडला आहे.आणि याचे उत्तर फक्त तुझ्याचकडे आहे.
इतकी वर्ष लोकांनी तुझ्याकडून अपेक्षा ठेवल्या पण आज माझी तुझ्याकडून एकच अपेक्षा आहे...अशा वेळी थांबायचं निर्णय घे कि जेव्हा तू स्वतःहा निर्णयावर ठाम असशील...आणि अशा उंचीवर निर्णय घे कि आजवर गाठलेल्या उंचीला खोल समाधान मिळेल.
तलवारीला म्यान कधी करावे हे योद्ध्यानेच ठरवावे...कारण स्वतःवरील विश्वास मोजायला भोवतालची फुटपट्ट्या कामी येत नसतात...मात्र धारातीर्थी होऊन खाली पडण्यापेक्षा विजयाच्या आनंदात म्यान करणे केव्हाही सुखावहच..
आज्ञाधारक
- तुझीच बँट १०, कीट - टीम इंडिया
भारत
- हृषिकेश पांडकर
२९.११.२०१२
kalpna apratim!!!
ReplyDelete7.9 out of 8
ReplyDeletev nice...
ReplyDeletei like... :)
ReplyDeletemala pahilyanda vatla ki ekhadi mulgi sachin chi fan ahe ani ti letter lihite ahe... ani nantar "Tuzich Bat" vacahala... :) Photo pan ekdam khallas ahe re... perfect situation ahe ani pose pan... lekh mast as usaual...
ReplyDeleteKay ata bagh tuch kay te ... (he mi tula nahi ...ter tyachi bat tyala mhantiy ;))
ReplyDeletelekhan uttam zale ahe ... as usual. Nusta ithe lihun fayda nahi...tyala pathav
१०, कीट - टीम इंडिया
ReplyDeleteभारत !!!
Kalpna laii ved! aani ha address 10,Janpath cha sadarbha deto. 10, Japath mhanje bhartatla sarvochha padachi rahaychi jaaga!
sexy! aavadlay.
आजवर गाठलेल्या उंचीला खोल समाधान मिळेल.
ReplyDeleteek no...
Naadch...
ReplyDeleteClassic!!!
ReplyDeleteTouching...
great.......!!!!!!!!!
ReplyDeleteतलवारीला म्यान कधी करावे हे योद्ध्यानेच ठरवावे...कारण स्वतःवरील विश्वास मोजायला भोवतालची फुटपट्ट्या कामी येत नसतात...मात्र धारातीर्थी होऊन खाली पडण्यापेक्षा विजयाच्या आनंदात म्यान करणे केव्हाही सुखावहच..
ReplyDeletejyada bhari zalay....sachin chi bat hi jya zadapsun keli asel tya zadalahi dhanyta watat asel....khup mast re pandya as usual....sachin tyachi talwar myan karel tevha karel pan tu tuzi lekhni kadhihi myan karu nakos re......apratim....:)
kamaaal!!!!
ReplyDeletezakas HP.....:)
ReplyDelete