Tuesday, December 18, 2012

A Capital called 'Mumbai...'


          छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करायची आणि त्यातून निष्कर्ष काढायची सवयच लागली आहे.आणि कदाचित अशाच एका छोट्या प्रसंगातून पुढचे लिहावेसे वाटले असावे.
वास्तविक पाहता कुठलाही हिंदी चित्रपट हे एक मनोरंजनचे साधन असून ,तीन तासाच्या कालावधीनंतर त्यामध्ये विशेष रस घेण्यासारखे काहीही नसते.अर्थात त्या तीन तासामाधेही फार रस असेल याची शाश्वती देता येत नाही.पण आपण बघायचे सोडत नाही एवढे मात्र नक्की.आणि म्हणूनच परवा पिक्चर बघून झाल्यावर हे विचार मनात आले असावेत.पिक्चर कसा होता हा त्यावेळी दुय्यम मुद्दा होता.कारण कथानकाच्या पलीकडे जाऊन काही पाहता येईल का याचा जर विचार केला तर बर्याच गोष्टी माझ्या विचारांना खाद्य देवून गेल्या.

         
आजपर्यंत अनेक चित्रपट पहिले.आणि कालचा चित्रपट पाहून बाहेर आल्यावर डोक्यात विचार आला कि त्या ७० मी.मी. पडद्यावर जशी मुंबई दिसते ती प्रत्यक्षात देखील तशीच आहे का ? प्रश्न तसा सरळमार्गी वाटत असला तरी  उत्तर मात्र अजिबात सरळमार्गी नव्हते.पुण्यात राहून मी जितकी मुंबई पहिली ती या ७० मी.मी. पडद्यावरच.पण जेव्हा केव्हा मुंबई ला गेलो तेव्हा पाहिलेली,अनुभवलेली आणि हि पडद्यावरची यात जमीन आसमानचा फरक आढळला.कदाचित मग तेवढे फिरलो नसीन मुंबईत.पण मला माझे उत्तर मिळालेच नाही.आणि यापुढे देखील कधी मिळेल असे मला वाटत नाही.

         
पहाटेची वेळ CST स्टेशन,गेट वे ऑफ इंडिया आणि उडणारी कबुतरे,लोकांनी खचाखच भरलेली लोकल किव्वा मरीन ड्राईव वर बसून एकमेकांमध्ये बुडालेले प्रेमी युगुल,अतिशय अरुंद गल्ल्यांमध्ये जीवाच्या आकांताने पाळणारे गुंड आणि त्यांचा पाठलाग करणारे काही लोक...आणि या सर्व दृष्यामागे 'मुंबई एक ऐसा शेहेर ' या वाक्याने सुरु होणारा पिक्चर मुंबई शहरावरील पडदा पदोपदी उघडत असतो.आणि म्हणूनच 'मुंबई अशी आहे होय ??'या प्रश्नाने मला ग्रासले आहे.आणि मग मुंबई अशी आहे तर मी मुंबईला जावून येतो तेव्हा मी नक्की कुठे जातो ? असे वाटण्याइतपत तफावत आढळते.

          
डोंबिवली,ठाणे,दादर इथे अनुक्रमे काकू,आत्या,मावशी राहतात यापलीकडे काय असणार मुंबई अशी समजूत होणे अतिशय स्वाभाविक होते.परंतु वाढते वय आणि त्यानुरूप पाहिलेले सिनेमे भलतेच मुंबई दर्शन घडवतात.मी जी मुंबई पाहतो तशीच मुंबई आहे का ? कि पडद्यावर दिसते तशी आहे ? मुंबईत लोक एक तर मर्सिडीज,ऑडी वापरतात नाहीतर लोकल,बस वापरतात.अल्टो,झेन अश्या गाड्या नसतात का मुंबईकरांकडे ? बर आणि असतील तर त्या दिसत नाहीत का ?रात्री उशिराची मुंबई आणि भल्या पहाटेची मुंबई याच वेळा का निवडल्या जातात ?मुंबई दिवसा पहायची संधी बहुदा हि लोकं देणारच नाहीत अस दिसतंय.किव्वा दुपारी वगरे शुटींग घेणे शक्य नसते का ?
         
प्रेम,दारू,सिगरेट,रेड लाईट एरिया,दहशतवाद,डान्सबार,श्रीमंती याच गोष्टींनी भरलेली आहे का मुंबई ? मरीन ड्राईव वर फक्त कमी कपडेच घालणे बंधनकारक आहे का ? उंच अलिशान इमारतीच्या बाल्कनी मधून दिसणारी छोटी घरं अस्तित्वात नसतातच का ?जिथे मुंबईचे डबेवाले जगाच्या नकाशावर आले आहेत तिथे बॉलीवूडचे रडार त्यांना टिपण्यास कसे अपयशी ठरले ? इतक्या वेळा अतिरेकी दाखवले ..आणि मग मुंबईचे डबेवाले कॅमेऱ्याला लाजतात का?

           'Taxi No.
९२११' यानी श्रीमंती आणि गरिबी यातील दरी स्पष्ट केली.'मुंबई मेरी जान' नि मुंबई ची एकी आणि खंबीरता दाखविली.'Page ','Corporate' ने महाराष्ट्राची 'राजधानी' उघड्यावर पाडली.'Fashion' ने तर मुंबईचे कपडेच काढले.पण प्रश्न कायम राहिला...मुंबई अशीच आहे का ? रात्रीच्या जेवणानंतर लोक फक्त दारूच पितात ? मुंबईची दिवाळी कधीच दाखवली का गेली नाहीये ?गणपतीच्या मिरवणुकीत खून होतात हेच का दाखवले जाते ?बँकेत नोकरी करणारे किव्वा शिक्षक यासारखी लोकं मुंबईत राहत नाहीत का रात्री केलेल्या कृत्याची भरपाई करण्यासाठीच सकाळ होते का ? असे वाटावे अशीच परिस्थिती निर्माण होते जेव्हा, 'ये शेहेर रात मे सोता नाही हे .' हे वाक्य कानावर पडते.कारण आम्ही सिनेमात हेच पाहतो.



         
विविध बेटांनी तयार झालेल्या या मायावी नगरीला तितकेच विविध रंग देखील आहेत.आणि कदाचित हीच ओळख या मुंबापुरीची असावी.दर २ हिंदी पिक्चर नंतर जो सिनेमा प्रदास्र्हीत होतो,तो मुंबईची नव्याने ओळख करून देतो एवढे मात्र नक्की.आणि खात्री करण्यासाठी मुंबईला गेलो कि 'अरे हि मुंबई ती नाहीच'असा अनुभव येतो.आणि माझ्या मुळ प्रश्नावर मी पुन्हा येउन अडकतो.मुंबई आहे तरी कशी ??
          
गल्लीमधील क्रिकेट आणि जिन्याखालचा जुगार नाहीतर मोठ्या हॉटेल मधील कसिनो किव्वा रेस कोर्स वरील घोडे या दोनच खेळाच्या सीमा का दाखवल्या जातात ? महाराष्ट्राची राजधानी डोक्यात ठेवून कबड्डी किव्वा उंच उडीची स्पर्धा दाखवावी असे कोणाला का वाटू शकत नाही ? जितक्या वेळा मरीन ड्राईव डोळ्यासमोर येतो अगदी तितक्या नाही पण किमान एक दोन वेळा वानखेडे,शिवाजी पार्क या गोष्टी कॅमेर्यात का येत नाहीत ? मुंबई मध्ये 'Common Man 'हि कल्पनाच अस्तित्वात नाही का ? 'Wednesday' मध्ये 'Common Man' दाखवला पण तो देखील गुन्हेगारीच्या पर्शाभूमीवरच.सरळमार्गी जीवन जगणारा 'Common Man' हा एकतर सिनेमाचा विषय होऊ शकत नाही किव्वा त्याचे अस्तित्वच नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे का ?

         
एकतर मधमाशांच्या पोळ्याला माश्या लटकतात त्याप्रमाणे लोकलला लटकलेली लोक दाखवतात.कुठल्याही पिक्चर मध्ये असे दृश्य दिसले नाहीये कि,डब्ब्यात अजिबात गर्दी नाहीये,सगळ्यांना बसायला व्यवस्थित जागा आहे.स्टेशन आले कि लोक शिस्तीत खाली उतरत आहेत वगरे.म्हणजे सिनेमा 'Based On True Story' जरी असेल तरी मुंबईच्या काही भागात कमी गर्दी असलेली एखादी लोकल नक्की असू शकेल.आणि कायम मरणाची गर्दीच दाखविण्यापेक्षा एकदा आम्हालाही सुखद धक्का द्यायला काय हरकत आहे ?
          
अर्थात वरील सर्व गोष्टींमध्ये हिंदी सिनेमाला दोष देण्याचा किव्वा मुंबई वर टीका करण्याचा अजिबात हेतू नाहीये.कारण मुंबई ला अनंत नावे दिली असतील पण नाव ठेवायची हिम्मत नाही झाली.पण वस्तुस्थिती अशी आहे की समजा एखाद्या व्यक्तीने प्रत्यक्षात मुंबई कधीच पहिली नसेल आणि फक्त सिनेमांमधून पहिली असेल तर त्याची मुंबई बद्दलची प्रतिमा अशीच होईल का ? किव्वा असे उगीचच वाटते कि मुंबई फक्त अशीच नाहीये.त्यामुळे न बघता अशी प्रतिमा करून घेणे चुकीचे आहे.आणि म्हणूनच मी माझा प्रश्न तसाच भिजत ठेवला आहे.

         
म्हणजे पु.लं च्या पुस्तकात अनुभवलेली मुंबई आणि नजीकच्या चित्रपटांनी पडद्यावर आणलेली मुंबई यात नावाखेरीज काहीच साम्य आढळत नाही.अर्थात कालानुरूप होणारे बदल जरी ग्राह्य धरले तरी किमान बांधणी तरी कायम असायला हरकत नव्हती.'Most Adaptable City' असे ज्याचे वर्णन करता येईल अश्या मुंबईने इतक्या नवीन गोष्टी 'Adapt' केल्या आहेत कि मुंबईची खरी ओळख काय ? या प्रश्नाची उत्तरे बदलत असल्याचे प्रकर्षाने जाणवते.'ये हे मुंबई मेरी जान' म्हणणारे नक्की कुठल्या मुंबई बद्दल म्हणतायेत हेच काळात नाहीये.किव्वा कदाचित याच बदलणाऱ्या मुंबई बद्दल असेल.

          
एवढा मुंबई बद्दल बोललोय खर,पण याचा अर्थ असा नाहीये कि हिंदी चित्रपटाचे सादरीकरण चुकीचे आहे,किव्वा मुंबई बद्दल द्वेष आहे. इच्छा फक्त एव्हढीच होती आणि आहे की जितक्या आपुलकीने आपण झगमगाटातील मुंबई दाखवतो तितक्याच प्रेमाने मुंबईची खरी ओळख देखील समोर आली पाहिजे.कारण मुंबई म्हणजे फक्त राजकारण,गुन्हेगारी,वाढीव श्रीमंती,किव्वा फक्त अगदी सिग्नल वरचे भिकारी यावरच मर्यादित नाहीये.मुंबईची ओळख टिकवणाऱ्या अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या कदाचित अजून पडद्यावर आलेल्याच नाहीये किव्वा फार कमी प्रमाणात आल्या आहेत.
         
हरकत नाही कारण प्रत्येक वेळी मुंबई ला गेल्यावर येणारा मुंबई बद्दलचा अनुभव बदलतच राहतो.आणि मग पुढे पाहिलेल्या चित्रपटात दाखविलेल्या मुंबईशी मी त्याची नकळत तुलना करतो.हे कदाचित असेच चालू राहील.कारण दिवसागणिक चित्रपटविश्व बदलते आणि मुंबई देखील.पण एक दिवस असा यावा कि प्रत्यक्षातील मुंबई पडद्यावर उतरावी आणि हीच ती मुंबई जी मी पहिली आहे असे चित्रपटगृहातून बाहेर पडताना वाटावे हे माझे एक स्वप्न आहे.
         
आणि एव्हढे असून देखील मुंबई बद्दलचा आदर आणि कुतूहल प्रत्येक वेळी वाढतच जाते.कारण तुलना करण्याने माझ्या कल्पनेतील मुंबई बदलेल असे वाटत नाही.कारण तीच खरी मुंबई आहे.कोकण चा कॅलिफोर्निया करण्याची गरज नाही..आणि मुंबईचे झालेले शांघाय हे कुठलातरी चित्रपट मला दाखवेलच.

          
आणि या संपूर्ण विचारांती मी अशा निर्णयावर पोहोचलो आहे की तीन तासाच्या रिळामधून दाखवलेली आणि सदैव रुळावर धावणारी मुंबई या दोन्ही गोष्टींचा अनुभव घेणे या सारखे समाधान नाही...आणि म्हणूनच इथुन पुढे हेच समाधान घेण्यासाठी कदाचित मी ती रीळातील मुंबई हायला जात राहीनच....




                                                                                                                     हृषिकेश पांडकर
                                                                                                                     -१२-२०१२

6 comments:

  1. Rilatali mumbai ani rulawar dhawnari mumbai.....LEKHNITUN uttam mandaliyes re pandya......LEKANITLI MUMBAI...:):) good...keep it up... :)

    ReplyDelete
  2. This will help us to understand what exact Mumbai is. Nice one hrishi...

    ReplyDelete
  3. Hrishi,
    Nice article one more time....

    But, tula suddha photo tak-tana marine drive cha ch takava vatala??
    Shivaji park cha ka nahi???

    :)

    ReplyDelete
  4. Hrishi,

    Khupach chan Article...keep it up

    Ganesh

    ReplyDelete
  5. seriously..khup tafaavat aste...showcasing extremes each time seems to be most filmy way...adhal madhal kahi asat ki nahi asa prashna padto..ani te sagal tujya lekhat aalay...tyamule nidaan ashi mumbai wachaayla tari milalee!!! ek number!!

    ReplyDelete
  6. Nice Article...Me pan tuzya sarkhi thodfarach pahili ahe mumbai...

    ReplyDelete