Wednesday, February 1, 2012

रोज न येणारी ..रोजनिशी..

          सकाळी झोपेतून जाग आल्यापासून ते अंथरुणावरून बाहेर पडेपर्यंत घरातील लोकांच्या बोलण्याचा,भांड्यांच्या आवाज येण्याची इतकी सवय झाली आहे कि एक दिवस हा आवाज झाला नाही कि अजूनही मध्यारात्रच आहे असे वाटून परत झोपावे कि काय असे वाटायला लागते.काही गोष्टींची इतकी सवय होऊन जाते कि या गोष्टी चुकीच्या कि बरोबर हा विचार करायचे कष्ट देखील घ्यावेसे वाटत नाहीत.कदाचित असू शकतीलही चुकीच्या.....
          तसेच काहीसे इथे झाले आहे...घरी आई बाबा असण्याची सवय पण अशीच काहीशी आहे.
दोन दिवस आई बाबा गावाला गेले कि कुठल्या गोष्टींना तोंड द्यावे लागते याचे प्रत्यंतर मला या आधी देखील आले आहे.पण तो अनुभव कागदोपत्री करण्याचा हा पहिलाच प्रयत्न.
    तसे पाहायला गेले तर आई बाबा गावाला जाऊन आपण घरात एकटे राहणे हि प्रचंड सामान्य आणि शुल्लक बाब आहे.पण केवळ दैनंदिन प्रवाहात अचानक  अडथळा आल्याने या गोष्टीला वेगळेच महत्व प्राप्त होते असे माझे वैयक्तिक मत आहे.
    दिवसातील २४ तासात १० तास ऑफिस,संध्याकाळचे ४ तास मित्र आणि इतर गोष्टींसाठी बाहेर आणि रात्री ७ तास झोप असे साधे समीकरण आहे. म्हणजे केवळ ३  तासांचा हिशोब लावायचा आहे.वर वर जरी हे तीनच तास मला manage करायचे आहेत असे वाटत असले तरी आई बाबा घरी असणे आणि नसणे यावर दिवसाच्या २४ तासाचा मनोर्याचा तोल सांभाळणे सर्वस्वी अवलंबून असते या निष्कर्षावर येऊन मी पोहोचलो आहे.
  परवाचीच गोष्ट आहे आई बाबा २६ जानेवारी च्या  'connected holidays' निमित्त घराबाहेर होते.मी घरी एकटाच होतो. उद्यापासून ३ दिवस आई बाबा घरात नाहीत या विचाराने झोप लागायला अवघड jaat नाही पण सकाळी आई बाबा घरात नाहीत या विचाराने अंथरूण सोडणे मात्र नक्की अवघड जाते.
              सकाळ झाली त्यामुळे उठणे क्रमप्राप्त होते.रात्री लावलेले पडदे तसेच बंद होते.त्यामुळे उठल्यावर अंथरूण आवरणे,पडदे उघडणे,पेपर,दुध आधी घरात घेणे या कामांच्या प्रत्येकी एक अश्या ६/७ आठ्या माझ्या कपाळावर डोळे उघडता क्षणीच आल्या होत्या.
नाईलाज या शब्दामागे सगळ्या आठ्या लपवून कामाला लागलो.सकाळी उठल्या उठल्या दरवाजा उघडून बाहेर जाने आणि गार दुधाची पिशवी घरात घेणे खरच नकोसे वाटते,तरी बरं ८ च वाजले होते.हि basic कामं करून दात घासायला बेसिन जवळ उभा राहिलो.आणि चहा चा प्रश्न दत्त म्हणून हजर झाला.म्हणजे दात घासून  आधी चहा करायचा आणि मग तो प्यायचा या विचारानेच कदाचित ब्रश वर आलेली जास्तीची पेस्ट बेसिन मध्ये पडली असावी....
                बेसिन आणि आसपासची सगळी कामे करून ओट्याजवळ उभा राहिलो.Gas लावला भांडे ठेवले चहा ची तयारी झाली ....चहा ठेवला.आणि बाहेर पेपर घेऊन बसलो.चहा होऊन तो कपात ओतणे या सव्वापाच मिनिटांच्या वेळेत मी सुमारे १३ वेळा gas जवळ गेलो.आणि याचे कारण असे कि एक कप चहा,त्याकडे लक्ष
देणारा मी एकटा,आणि समजा धांदरटपणामुळे चहा उतू गेला तर gas शेगडी स्वच्छ करणे,ओटा स्वच्छ करणे,काळे ठिक्कर पडलेले भांडे घासणे हि त्या धांदरटपणामुळे complimentary म्हणून मिळणारी कामे पण मलाच करावी लागणार होती.म्हणून किमान हे नक्की टाळता येईल या विश्वासाने का होईना मी ते व्यवस्थित टाळले.
              चहाची चव कशी होती हे मी इथे नमूद करणे प्रकर्षाने टाळतो.कारण कालचे फ्रीज मध्ये ठेवलेले दुध direct गरम चहात टाकले कि चव बिघडते हे माहित असूनही दुधाचे भांडे फ्रीज मधून आधी बाहेर न काढल्याने चहाची चव हा वेगळाच मुद्दा होता. पण गरम चहा तयार झाला या खुशीत मी बाकीच्या गोष्टींना दुय्यम लेखात कप  बशी आणि बिस्किट्स घेऊन hall मध्ये येऊन निवांत बसलो.पण ह्या निवांतपणा चा आनंद चहाच्या चोठ्याची विल्हेवाट आणि 'दुधाचे काम झाल्यवर झाकून परत फ्रीज मध्ये ठेव' अशी आईची बजावणी या दोन गोष्टींनी फार काळ टिकू दिला नाही.
              पेपर वाचून झाल्यावर म्हणण्यापेक्षा चहा घेऊन झाल्यावर ओटा आवरून घेतला कारण चहा ओतताना किमान २ थेंब तरी आम्ही ओट्यावर सांडतोच.आई असताना कप बशी फक्त dining table पर्यंत पोहोचवणे एवढी एकाच जबाबदारी असते.मात्र आज ओटा स्वच्छ करणे हे देखील काम होतेच. चहा हा विषय संपल्यावर बराचसा काम झाल्याच्या अविर्भावात अंघोळीला गेलो.कपडे काढले आणि अचानक डोक्यात आले कि कचर्याचा डबा बाहेर ठेवायचा राहिला आहे.आता हे काम करणे must होते कारण आत्ता जर केर बाहेर ठेवला नाही तर एकदम उद्याच द्यायचा.नाईलाजाने कपडे घातले डबा बाहेर ठेऊन आलो.
अंघोळ उरकली आणि बाहेर आलो.घड्याळाने सगळ्या सीमा ओलांडल्या होत्या.ऑफिस ला होणारा उशीर अटळ होता.कपडे घालावेच लागतात म्हणून चढवले.घरातील दरवाजे तपासून घराबाहेर पडलो.ऑफिस मध्ये उशीर झालाच होता.आणि दुष्काळात १३ वा महिना म्हणजे दुपारी घरचा डबा नसून बाहेर खावे
लागणार होते या दु:खात ऑफिस चा पूर्वार्ध उरकला.संध्याकळी बरोब्बर  ७ ला पोहोचलो.कुलूप उघडायच्या आधी रिकामा कचर्याचा डबा पण बरोबर घेतला आणि आत गेलो.७ वाजल्यामुळे घरातला अंधार बाहेरच्या अंधाराशी स्पर्धा करत होता.आधी दिवे लावले.आणि बूट काढताना पुढे करायच्या कामाची कल्पना येऊ लागली.आता फक्त माझे आवरून झाल्यावर चहा मिळणार नव्हता किव्वा खायला पण मिळणार नव्हते.एक वेळ चहा मिळाला नाही तरी चालेल पण चहा करायला लागणार हि कल्पनाच सहन होत नाही.पण पुन्हा एकदा इलाज नव्हता.पुन्हा एकदा सकाळ प्रमाणे चहा केला.Rack वर जे डबे हाताला लागतील ते तपासून पहिले आणि ज्या गोष्टी खाता येऊ शकतील अशा खाल्ल्या.शक्यतो असे पदार्थ  घेतले जे खाल्ल्याने नंतरची कामे फार करावी लागणार नाहीत.डिंकाचे लाडू घरात आहेत यावर मी ठाम होतो पण डबा न सापडल्याने डिंकाच्या लाडूची तहान मारी बिस्किटांवर भागवावी लागली.पण खरचं आहे दुध मिळत नसेल आणि टाकणे तहान भागणार असेल तर ताक प्यायला हरकत काय आहे ....
"जाऊदे तसाही बाहेरच जेवायचे आहे" असे मनात म्हणून डिंकाचा लाडू न मिळाल्याचे अपयश लपवून घराबाहेर पडलो.
            रात्री जेऊनच घरी आलो कारण घरी नेऊन खाणे  आणि नंतर आवरणे या गोष्टी कल्पनेच्या बाहेरच्या होत्या.आता घरी जाऊन फक्त झोपायचे एवढेच काम होते.मात्र हे क्षणिक समाधान कुलूप उघडताच मावळले.
रात्री ११.३० वाजता बाल्कनी मध्ये वाळत टाकलेले सगळे कपडे घडी घालून आत आणणे या विचाराने मला उगीचच झोप जरा जास्तच आली आहे असे वाटू लागली .ते काम पूर्ण केले. ज्या गोष्टी बंद करायच्या त्या गोष्टी बंद केल्या.(नळ,बटन्स,खिडक्या,दार).सरतेशेवटी उशी पांघरून घेऊन बेड वर झोपलो...आणि अशा वेळी टी.व्ही  लाऊन पाहावा याची पुसटशी देखील  इच्छा झाली नाही.
       गादीला पाठ लागली आणि दिवसाचे संपूर्ण पान डोळ्यासमोरून गेले.
दिवस नेहमीचाच होता,दिनचर्या नेहमीचीच होती फरक फक्त इतकाच होता कि आज आई बाबा घरी नव्हते. 
      आता नोकरी,शिक्षण किव्वा अन्य कुठल्याही कारणास्तव तुम्ही वेगळे रहात असाल तर अशा लोकांना या गोष्टी अतिशय बाळबोध आणि नेहमीच्या वाटत असतीलही आणि मी त्यांच्याशी संपूर्ण सहमत आहे.आणि मला त्यांचे विशेष कौतुक पण आहे.मात्र असा अनुभव कधीतरीच घेणार्यांना मात्र माझे म्हणणे पटले असावे .कदाचित कामाचे स्वरूप थोडे इकडे तिकडे होईल पण माझ्या भावना पोहोचण्यास काही तडजोड नसावी.
प्रत्येक गोष्टी बरोबर फायदे आणि काही तोटे पण येतातच पण यावेळी मात्र तोट्याचे पारडे सहज खाली जाते यात तिळमात्र शंका नाही.

         मुद्दा फक्त सवयीचा आहे...पण तो इतका प्रकर्षाने  जाणवतो  कि  नेहमचा दिवस पण नेहमीचा रहात नाही एवढे मात्र नक्की.

                                                                                                                                    हृषीकेश पांडकर
                                                                                                                                    ०१/०२/२०१२

11 comments:

  1. mast mast mast...... mala hi ahe ha anubhav

    ReplyDelete
  2. mast ahe...farch bhari.............

    ReplyDelete
  3. Pandya...100% sahamat. Trust me ya sagalya goshti roj anubhavunahi tyacha yenara kantala ha sarkhach asto...kantala yenyamadhye aaj paryant kadhihi farak padla nahiye. Ekhadi goshta sarkhi sarkhi zali ki tichi savay hote mhantat pan kantalyachi savay ajun tari zali nahiye. Rojach to jara jastach yeto ase vatte ;)

    ReplyDelete
  4. असा अनुभव प्रत्येक जण घेत असतोच. आई वडील असताना एक गोष्ट नक्की असते की एखादे काम राहिले तरी चालते पण जेव्हा तुम्ही स्वत : कर्ते असता तेव्हा मात्र ही गोष्ट खूपच जाणवते .
    कारण आता आईचा काम राहिल्यावारचा ओरडा नसतो . किंवा बाबांचे रागावणे नसते . जे चुकले ते परत नीट करत च आपला वेळ जात आसतो . मग मित्रांना घेऊन रात्री कट्ट्यावर गप्पा मारणे हे तर कधीतरीच .
    मग तुम्ही आई बाबाचे गावाला जाणे एन्जोय करा.

    ReplyDelete
  5. Seriouslly... Ask me... Aai baba ghari nasale ki kai kai karava lagata... Especially when u stay alone... U wont believe pe parava ratri 0130 hrs la flight karun alyawar chapati n anda bhurji banavali... n tevha janavala ki aj jar me ghari rahat asate tar garam garam jevayala hatat milala asata...

    ReplyDelete
  6. mast lihilay. he sagle anubhavlele aslyane khup jawalche wattay. Aai baba gavala gele ki aaplyala Independence chi janeev hote and dependency chi suddha ...

    ReplyDelete
  7. Bhari pandya..... Ata mala ya goshti rojachyach ahet so... ata tula kadachit janiv hoil ratriche jar jagran zhale tar sakali uthun kam karne kiti avghad aahe... Aso mast lihile aahes :)

    ReplyDelete
  8. सध्या सोप्या आणि अगदी योग्य शब्दात तुला जे म्हण्याचे आहे ते १०० टक्के तू समोरच्या पर्यंत पोचाव्लास..."नाईलाज या शब्दामागे सगळ्या आठ्या लपवून कामाला लागलो..... आधी चहा करायचा आणि मग तो प्यायचा या विचारानेच कदाचित ब्रश वर आलेली जास्तीची पेस्ट बेसिन मध्ये पडली असावी.....कपडे घालावेच लागतात म्हणून चढवले...." ही वाक्य कमाल आहेत...केवळ कमाल!
    सुरेख लिहिलं आहेस.

    ReplyDelete
  9. jabardast re ..

    Aawdla aahe Lekh ..

    "आता नोकरी,शिक्षण किव्वा अन्य कुठल्याही कारणास्तव तुम्ही वेगळे रहात असाल तर अशा लोकांना या गोष्टी अतिशय बाळबोध आणि नेहमीच्या वाटत असतीलही आणि मी त्यांच्याशी संपूर्ण सहमत आहे.आणि मला त्यांचे विशेष कौतुक पण आहे.मात्र असा अनुभव कधीतरीच घेणार्यांना मात्र माझे म्हणणे पटले असावे .कदाचित कामाचे स्वरूप थोडे इकडे तिकडे होईल पण माझ्या भावना पोहोचण्यास काही तडजोड नसावी.
    प्रत्येक गोष्टी बरोबर फायदे आणि काही तोटे पण येतातच पण यावेळी मात्र तोट्याचे पारडे सहज खाली जाते यात तिळमात्र शंका नाही."

    Direct Feel aala .. ekk numberr..

    ReplyDelete