Thursday, January 17, 2019

चॅलेंजेस

 आज पासून दहा वर्षांपूर्वीचा काळ म्हणजे सोशल मीडिया या गोंडस नावाखाली वैयक्तिक राग,लोभ,मोह,मद आणि मत्सराचे ऑर्कुट नावाच्या व्यासपीठावरून बेमालूमपणे उधळण करण्याचे दिवस.डिजिटल कॅमेरा आणि ऑर्कुट या द्वयीने माजववले तांडव.कालांतराने ऑर्कुट लोप पावत गेले आणि मग त्याची जागा फेसबुक,इंस्टाग्राम किव्वा ट्विटर यासारख्यांनी घेतली.

IceBucket,Mannequin,Plank या आणि अशा अनेक चॅलेंजेस नंतर नव्याने येऊ घातलेले फेसबुक आणि इंस्टाग्राम वरचे 10YearChallnge.यात करायचे काहीच नाहीये फक्त स्वतःचा १० वर्षांपूर्वीचा आणि आत्ताचा फोटो एकत्र टाकायचा आहे.त्या मधेही लोकांनी 'Shinning brightly','Age Is Just A Number','Feeling Younger' किव्वा 'From Thinner To Fatter','Hotness Into 10' वगरे गोष्टी लिहून एक वेगळीच मजा आणली आहे.

काहींनी आधी जुने फोटो बघितले त्यात आपली पोझ कशी आहे त्या प्रमाणे आता एक नवीन फोटो काढून तो टाकलाय,काहींनी १० वर्षाचा मूळ मुद्दा बाजूला ठेऊन साधारण जुना वाटणारा पण चांगला आलेला फोटो सरळ लावून दिलाय,काहींनी तर challenge असा हॅशटॅग टाकून फक्त एकचं फोटो टाकलाय तर काहींनी दोन पूर्णपणे वेगळेच फोटो सुद्धा टाकण्याचे धाडस दाखवले आहे.काहीजणांनी त्यातही कल्पकता दाखवता विनोद निर्माण करायचा प्रयत्न केला आहे.एकूण काय तर तुम्ही ते आव्हान स्वीकारा अथवा स्वीकारू नका पण मनोरंजन होईल याची पूर्ण जबाबदारी या सोशल मिडीयानी चोख बजावलेली आहे.

काही गोष्टीत सहभागी न होता देखील जास्त आनंद मिळवता येतो हा त्यातलाच प्रकार.१० वर्षांपूर्वी आणि आत्ता मी कसा होतो किव्वा मी कशी होते हे लोकांना दाखवणे यात चॅलेंज देखील असू शकते हे मला आज नव्याने समजले.बरं १० वर्षांपूर्वी ऑर्कुट सारख्या गोष्टी असल्याने तेव्हाही खंडीभर फोटो आपण आधी टाकून झालेले आहेतच मग पुन्हा हि तफावत दाखवण्यात आव्हान ते कसले ? असो जो पर्यंत हा मजेशीर प्रकार फुकट उपभोगता येतोय तो पर्यंत तक्रार करण्यात काहीच अर्थ नाही.लोक त्यांचे कसेही फोटो टाकतील आपल्या तीर्थरुपांच काय जातंय..निरीक्षणातूनही बऱ्याच गोष्टी नव्याने कळतात आणि शिकायला मिळतात त्यातलाच काहीसा हा प्रकार नाही का 🙂

#10YearChallange #चायलेंजतरमगउचलेंज

हृषिकेश पांडकर

१७.०१.२०१९

 

No comments:

Post a Comment