Tuesday, June 21, 2016

भटकंती नागझिऱ्याची



        जंगलाचे वर्णन या आधी केलं असलं तरी नाविन्य कमी होत नाही.पण या वर्णनाबरोबरच थोडं माहितीपर लिहावे असा विचार मनात आला. आणि म्हणूनच निव्वळ वर्णनाव्यतिरिक्त काही छायाचित्रांसोबत माहिती जोडण्याचा हा छोटासा प्रयत्न केला.या पाच दिवसात अनेक पक्षी आणि प्राणी पाहायला मिळाले.फोटो काढणे हा एक भाग पण त्याबद्दल माहिती करून घेणे हा अजून एक हेतू घेऊन जंगलातून फिरलात तर नव्याने जंगल पहिल्याचा आनंद नक्की घेऊ शकाल.नागझिरा,बोर आणि उमरेड या मध्य भारतातल्या जंगलातला हा प्रवास एकत्रच अनुभवूयात.



Black naped monarch  ( नीलमणी )


        नागझिर्यात शिरायच्या आधी जंगलाच्या दाराबाहेर असलेल्या एका छोट्या घरात दुपारच्या जेवणासाठी थांबलो होतो.जेवण झाल्यावर मागच्या बाजूला हात धुवायला गेलो.बाजूला साचलेल्या पाण्यात दुपारची गरमी शमवायला छोटे पक्षी येरझार्या घालत होते आणि तेव्हा हि मोनार्कची मादी पाण्यावर उतरली.अतिशय नाजूक पक्षी.शांतपणे दोन थेंब प्यायला आणि निघून गेला.'नीलमणी' हे नाव सार्थ करणारा तो प्रसन्न निळा रंग नक्कीच सुखावून जातो.यांच्यातील नराला मात्र डोक्यावर काळे निशाण असते आणि म्हणूनच कदाचित 'Black Naped Monark' हे नाव याला देण्यात आले आहे.

*The black-naped monarch or black-naped blue flycatcher (Hypothymis azurea) is a slim and agile passerine bird belonging to the family of monarch flycatchers. They are sexually dimorphic with males having a distinctive black patch on the back of the head and a narrow black half collar ("necklace") while the female is duller and lacks the black markings.







Grey headed Fish Eagle. (करड्या डोक्याचा मत्स्यगरुड )


        पक्षांच्या अन्नसाखळीत सर्वोच्च पदावर स्थित असलेल्या गरुड कुटुंबाचा हा सदस्य.पानांच्या दाटीवाटीत आपला पसारा सांभाळून आटोपशीर बसलेला गरुड शोधून तो पाहणे या सारखा विजयी आनंद नाही.अर्थात पाठ  दाखवत असलं तरी सौंदर्य हरपल्याचा मागमूसही नाहीये.उलट उतरत्या उन्हाची तिरीप मस्तकी घेऊन राजासारखा विराजमान झालाय.

*The grey-headed fish eagle (Ichthyophaga ichthyaetus) is a fish-eating bird of prey from South East Asia. It is a large stocky raptor with adults having dark brown upper body, grey head and lighter underbelly and white legs. Juveniles are paler with darker streaking.
 




Sirkeer malkoha ( लाल चोचीचा मुगश्या )


        कोकीळेच्याच रांगेतला हा पक्षी.पाणवठ्यावर सावलीला थांबलो होतो.पाणवठा म्हणलं की चट्टे पट्टे शोधणारी नजर बरेचदा पक्षांकडे दुर्लक्ष करेल की काय अशी भीती वाटते.दगडांशी एकरूप झालेला पक्षी चोचीच्या  वैविध्यपूर्ण रंगावरून नजरेस पडला.बराचसा धीट स्वभावाचा असल्याने मनसोक्त फोटो काढू दिले.आत्तापर्यंतच्या जंगल प्रवासात याचे दर्शन पहिलेच.

* The sirkeer malkoha or sirkeer cuckoo (Phaenicophaeus leschenaultii), is a member of the cuckoo order of birds, the Cuculiformes, which also includes the roadrunners, the anis, and the hoatzin. It is a resident bird in the Indian subcontinent.





White-eyed buzzard  ( बाझ )


        गरुडापेक्षा लहान पण रंग रुपात बरीच साम्यता बाळगणारा हा शिकारी पक्षी.डोळ्याभोवती बटनाप्रमाणे पांढरे वर्तुळ असल्याने  'white-eyed buzzard' असे नाव मिळाले आहे.सर्वसाधारणपणे बेडूक ,पाली,सरडे,नाकतोडे अशा जीवांवर उदरनिर्वाह करणारा.जेमतेम सूर्यास्तानंतर कुठलीशी शिकार मिळाल्याची चाहूल लागल्यावर लक्ष विचलित न होऊ देता जमिनीवर असलेल्या शिकारीचे निरीक्षण करत असताना  टिपलेला हा  फोटो.तीक्ष्ण नजर आणि अणकुचीदार चोच शिकारी पक्षी  असल्याची साक्ष देते.

* The white-eyed buzzard (Butastur teesa) is a medium-sized hawk, distinct from the true buzzards in the genus Buteo, found in South Asia. Adults have a rufous tail, a distinctive white iris, and a white throat bearing a dark mesial stripe bordered. The head is brown and the median coverts of the upper wing are pale.  




Indian Scops Owl  ( डुडूळ )


        एखाद्या खेडेगावातून जात असताना गावातल्या लहान मुली जसं दारात येउन कुतूहलाने पण लाजत बघत असतात अगदी त्याप्रमाणे आपल्या ढोलीमधून बाहेर डोकावणारे हे घुबडाचे कुटुंब.डोळे उघडे आहेत की नाही याचा देखील थांगपत्ता लागत नाही.निरागसतेने वाकून पाहणारे घुबड पाहणे मजेशीर प्रकार आहे.कारण झाडावर बसलेले घुबड दिसणेच हा थोडा अवघड प्रकार असतो.खोडाचा रंग आणि घुबडाचा रंग यातील फरक  ओळखणे प्रचंड जिकीरीचे काम असते.कित्येक वेळा स्तब्ध असलेले घुबड झाडाचाच एक भाग म्हणून दुर्लक्षिले जाते.

* The Indian scops owl (Otus bakkamoena) is a resident species of owl found in the southern regions of Asia from eastern Arabia through the Indian Subcontinent, except the far north, east across much of Southeast Asia to Indonesia. The Indian scops owl is a common resident bird in forests and other well-wooded areas. It nests in a hole in a tree, laying 3–5 eggs.


 

Crested serpent Eagle  ( सर्पगरुड )

        दुपारी चारच्या सुमारास तापलेल्या नागझिरा मधून जात असताना पाण्याच्या शेजारी असलेल्या उंच झाडावर मोठा पक्षी येउन बसलेला सर्वांनीच पहिला.पण बराच वेळ फांदीच्या मागे लपला गेल्यामुळे ओळखणे अवघड होते.आम्ही बाजूला थांबलो.सुमारे ७-८ मिनिटे शांत राहून आम्ही त्याच्या हालचाली न्याहाळत होतो.कडक ऊन असल्याने पाण्यावर नक्की उतरणार हा विश्वास होता.आणि त्यानेदेखील निराश केले नाही.क्षणार्धात पाण्यावर झेपावला.पुन्हा एकदा गरुडच होता मात्र या वेळी वेगळ्या जातीचा.डोक्यावर तुरा नसूनही 'Crested serpent Eagle' हे नाव धारण करणारा हा पक्षी मनसोक्त पाणी प्यायला आणि आल्या वाटेन निघून गेला.साधारण 2.5 फुट उंची असावी आणि पंखांचा भव्य विस्तार या मुळे उडत असताना ओळखणे तसे अवघड जात नाही मात्र हे पक्षी सहसा कमी उंचीवरून उडत नाहीत.

* The crested serpent eagle (Spilornis cheela) is a medium-sized bird of prey that is found in forested habitats across tropical Asia. The crested serpent eagle, as its English name suggests, is a specialist reptile eater which hunts over forests, often close to wet grassland, for snakes and lizards.








 Indian Roller  ( नीलपंख )


        शहरात देखील सहज आढळणारा हा पक्षी थांबून पाहावा इतका दुर्मिळ नक्कीच वाटत नव्हता.पण कमालीचे जवळ जाऊन देखील याने काहीही हालचाल केली नाही.तेव्हा सर्वप्रथम याला इतके जवळून पाहता आले.निळाशार रंग आणि सुबक चोच यामुळे याने कॅमेर्याला आणि पर्यायाने आम्हाला चांगलेच गुंतवून ठेवले.हा पक्षी उडत असताना जास्त सुंदर दिसतो.आणि याची प्रचीती देखील आम्हाला लगेचच आली.या पक्षाच्या पंखाच्या खालचा भाग पसरल्यावर BMW कंपनीच्या लोगोसारखा दिसतो ते दृश्य नक्कीच प्रेक्षणीय आहे.संधी मिळाल्यास नक्की पहा.

* The Indian roller (Coracias benghalensis), is a member of the roller family of birds. They are found widely across tropical Asia stretching from Iraq eastward across the Indian Subcontinent to Indochina and are best known for the aerobatic displays of the male during the breeding season.






Indian Gaur  ( गवा )


        कोणाचीही फिकीर नसल्याप्रमाणे कायम चरत फिरणारा हा अवाढव्य प्राणी.गाडीची चाहूल लागून देखील मान वळवायची तसदी घेतली नाही.आपण बरे आणि आपले काम बरे या अविर्भावात रस्ता ओलांडून पलीकडे गेला.दुपारचे ऊन टाळून गेले होते आणि मावळत्या सूर्यावर ढगांनी आवरण घालायला सुरुवात केली होती परतीच्या  वाटेवर त्या निबिड अरण्यात एका वळणावर भेटलेला रानगवा.पायात मोजे घालावे त्याप्रमाणे गुडघ्या खालचे पाय वेगळ्या रंगाचे असतात.

* The gaur is a strong and massively built species with a high convex ridge on the forehead between the horns, which bends forward, causing a deep hollow in the profile of the upper part of the head. There is a prominent ridge on the back. The ears are very large; the tail only just reaches the hocks, and in old bulls the hair becomes very thin on the back.
  



Asian Paradise flycatcher ( स्वर्गीय नर्तक )

        नावात वर्णिल्या प्रमाणे स्वर्गीय आणि नर्तक या दोनही शब्दांना चोख जपणारा नाजूक पक्षी.अतिशय चंचल आणि लाजाळू.झुपकेदार शेपटीमुळे लांबूनच ओळखता येतो.पांढरा शुभ्र पक्षी आणि  त्याची नाजूक पण पल्लेदार शेपूट पाहूनच आम्ही स्तब्ध झालो.फोटो काढायच्या हेतूने थोडे पुढे गेलो.डाव्या फांदीवर अंग चोरून बसलेला आढळला.पण क्षणार्धात तिथून उडून बाजूला येउन बसला.प्रचंड चंचल असल्याने आपल्या सय्यमाचा अंत पाहणारा सुंदर पक्षी.

* The Asian paradise flycatcher (Terpsiphone paradisi), is a medium-sized passerine bird native to Asia that is widely distributed.Young males are rufous and have short tails. They acquire long tails in their second or third year. Adult males are either predominantly bright rufous above or predominantly white.





Barn Owl ( गव्हाणी घुबड )


        दुपारच्या कडक उन्हात जेवणानंतर शतपावली करायला बाहेर पडलो.भोवती घनदाट अरण्य होते.पण त्यातूनही उन्हाचे चटके जाणवत होते.चालत असताना रस्ता हरवलेले एक घुबड एका फांदीवर विसावलेले दिसले.सूर्यप्रकाशात निपचित असल्यामुळे अजिबातच हालचाल नव्हती.दिसायला अतिशय सुंदर आणि कॅमेर्यात पाहणारे घुबड म्हणल्यावर शांतपणे फोटो काढायला मिळाले.धोलीशिवाय घुबड बघायची माझी पहिलीच वेळ.पण दिसायला प्रचंड सुंदर पक्षी हे त्याच्या सम्पूर्ण आकारावरून आपल्याला नक्की वाटते.

*The barn owl (Tyto alba) is the most widely distributed species of owl, and one of the most widespread of all birds.The barn owl is nocturnal over most of its range, but in Britain and some Pacific islands, it also hunts by day.






 


Wild dogs ( ढोल )


        कपट,क्रूरता,हुशारी आणि गनिमीकावा या चार आयुधांवर आणि घोळक्याने हल्ला करून समोरच्याला संपवणे.कुत्र्याची जात  जरी असली तरी जंगलामध्ये यांचे वर्चस्व मोठ्या प्रमाणात असते.समूहाने शिकार केल्यास वाघ देखील शिकार होऊ शकतो.पाणवठ्या जवळून जात असताना काठावर पहुडलेले दिसले आणि सावकाश गाडी थांबवली.हा प्राणी शक्यतो एकट्याने कधीच फिरत नाही.आम्ही आलो तेव्हा २-३ जण पाण्यात होते आणि एक बाहेर झोपला होता.डावीकडच्या झाडांमधून अचानक बाकीचे साथीदार बाहेर आले.सुमारे १७-१८ कुत्र्यांचा तो कलप जंगलातील कुठल्याही प्राण्याला भारी पडेल यात शंका नव्हती.अर्थात फक्त हत्ती त्याला अपवाद आहे.अणकुचीदार दात आणि कटक देहयष्टी शिकार करण्यासाठी योग्य पद्धतीने वापरण्याचे कसब या छोट्या जनावराकडे आहे.

* The dhole (Cuon alpinus) is a canid native to Central, South and Southeast Asia.Dholes are more social than grey wolves, and have less of a dominance hierarchy, as seasonal scarcity of food is not a serious concern for them.



 Roux's Forest Calotes ( सरडा )



        शब्दशः रंग बदलणारा सरडा.स्वभावाचे माहित नाही पण पृष्ठ्भागानुसार रंग बदलणारा सरडा पहायला मिळाला.आधीच पानझडीमुळे दुतर्फा विखुरलेली पाने आणि त्यावर बारीकशी हालचाल करणारा सरडा दिसणेच अवघड काम.त्यातही आपल्या थोड्याश्या हालचालींनी तो दचकणार आणि जागा बदलणार यातही त्याने बदलले रंग मजेशीर वाटतात.

*Some chameleon species are able to change their skin coloration. Different chameleon species are able to vary their coloration and pattern through combinations of pink, blue, red, orange, green, black, brown, light blue, yellow, turquoise, and purple. Chameleon skin has a superficial layer which contains pigments, and under the layer are cells with guanine crystals. Chameleons change color by changing the space between the guanine crystals, which changes the wavelength of light reflected off the crystals which changes the color of the skin.




Wild Boar ( रानडुक्कर )


        पुढे काय होईल या कुतूहलापोटी आम्ही गाडी थांबवली.३ ढोल आणि एक वाईल्ड बोर आमच्या समोर होते.डुक्कर पाणी पीत होते आणि मागे तीन जंगली कुत्री उभी होती.शिकार होऊ शकते या कडे आम्ही डोळे लाऊन बसलो होतो.'Action shot' मिळणार या तयारीत कॅमेरे सरसावले.३ कुत्री आणि एक डुक्कर हे अतिशय माफक आव्हान होते खरे तर; पण अपेक्षा भंग झाला.डुक्कर पाणी पिवून निमुटपणे निघून गेले आणि नंतर कुत्र्यांनी येउन पाणी प्यायले आणि पाणवठा सोडला.म्हणूनच जंगल प्रत्येक वेळी वेगळी गोष्ट दाखवते हेच सत्य आहे याची पुन्हा एकदा प्रचीती आली.

*The wild boar (Sus scrofa), also known as the wild swine or Eurasian wild pig is a suid native to much of Eurasia, North Africa, and the Greater Sunda Islands.The wild boar is a bulky, massively built suid with short and relatively thin legs. The trunk is short and massive, while the hindquarters are comparatively underdeveloped.





Monitor lizard  ( घोरपड )


        तानाजीच्या कामी आलेली घोरपड.अतिशय मजबूत पकड आणि ९० अंशाच्या कोनात चढण्याची क्षमता.सकाळच्या उन्हात झाडावर उन्ह खात बसलेली मिळाली.मानेखेरीज कुठलाच भाग हलत नव्हता.सरड्यासारखी ठेवण असली तरी आकार आणि रंग वेगळा असतो.फोटोत असलेली घोरपड हि पूर्ण वाढ झालेली नाहीये.साधारण ३ मीटर पर्यंत हिची वाढ होऊ शकते.शरीराच्या मानाने शेपटीची लांबी जास्त आहे.आत्तापर्यंत जमिनीवर सरपटणारी घोरपड बरेचदा पहिली पण झाडावर चढणारी पाहण्याची पहिलीच वेळ.

*Monitor lizard is the common name of several large lizard species, comprising the genus Varanus. They are native to Africa, Asia and Oceania, but are now found also in the Americas as an invasive species. A total of 78 species are currently recognized.



  

Changeable hawk-eagle or crested hawk-eagle ( मोरघार )


        काहीसा रागीट दिसणारा आणि संतप्त नजरेने बघणारा हा  अजून एक गरुड.पाण्यावर येउन बसलेला हा शिकारी पाठीमागुनही तेवढाच सुंदर दिसतो.उभा असलेला तुरा त्याच्या रंगला शोभून दिसतोच पण अन्नसाखळीतील सर्वोच्च स्थान देखील अधोरेखित करतो.सावलीत बसल्यामुळे गडद रंग ओळखणे काहीसे अवघड जाते पण उंची आणि पंखाचा पसारा मोठा असल्याने पक्षाचा अंदाज लावणे सोपे आहे.अर्थात मानेच्या हालचाली वरून पक्षी बसलेली जागा ओळखणे तितकेसे अवघड जात नाही.

* The changeable hawk-eagle or crested hawk-eagle (Nisaetus cirrhatus) is a bird of prey species of the family Accipitridae. Changeable hawk-eagles eat mammals, birds, and reptiles. They keep a sharp lookout perched bolt upright on a bough amongst the canopy foliage of some high tree standing near a forest clearing.






       
         डोळ्यासमोर बसलेला वाघ पाहणे आणि लांब झुडुपातून चालत येणारा वाघ पाहणे यात कमालीची तफावत आहे.माकड ,हरणे यांनी दिलेले अलार्म कॉल ऐकत,त्यांचा पाठलाग करत सरतेशेवटी हे चट्टे पट्टेरी श्वापद पाहणे यासारखं सुख नाही.आपण वाघाला पाहतो हि क्षणिक घटिका असते पण जंगलातून फिरत असताना वाघ आपल्याला पावलोपावली पाहत असतो असे म्हणतात हे अगदी सत्य आहे.कारण पंधरा फुटावर झुडपातला वाघ  आपल्या डोळ्यांना दिसत सुद्धा नाही पण असल्याची जाणीव नक्की होते.आणि झुडुपातून बाहेर पडताना जेव्हा आपल्या दृष्टीस पडतो त्या क्षणाची तुलना आजतागायत मी कशाशीही करू शकलो नाही आणि होईल असे  देखील वाटत नाही.
  


        टायगर रिजर्व अशी मान्यता मिळून खूप दिवस झाले नसल्याने आणि मॉन्सून तोंडावर आल्याने भल्या पहाटे जंगलात जाणारी कदाचित आमची एकमेवच गाडी असावी.पहाटेच्या जंगलात अजून उन्ह देखील पोहोचली नव्हती.जेमतेम फोटो मिळावा इतका प्रकाश होता किंचित ढगांनी दाटी केली होती.पिल्लांना घेऊन फिरणारी वाघीण जितकी आक्रमक असते त्या पेक्षा आक्रमक प्राणी जंगलात कुठलाच नसावा.मगाशी झुडुपात दिसलेली वाघीण दहा मिनिटांनी बाहेर आली आणि डोळ्याच पारण फिटला.पिवळा धमक रंग.पिलांना जन्म दिल्यानंतर आलेला किंचितसा स्थूलपणा पण तितकाच कमनीय बंध आणि चेहऱ्यावरील रुबाब जंगलाचे सर्वेसर्वा असल्याची साक्ष देत होता.


* The Bengal tiger, also called the royal Bengal tiger (Panthera tigris), is the most numerous tiger subspecies. It is the national animal of both India and Bangladesh. The tiger is the largest cat species, most recognisable for their pattern of dark vertical stripes on reddish-orange fur with a lighter underside.


 

          मध्यभारतातील जंगले हि मुख्यत्वे पानझडीची आहेत.त्यामुळे मे महिन्याअखेर पानझडीमुळे निष्पर्ण झालेली आढळतात.या नंतर पावसाळा सुरु होऊन नवीन पालवी फुटते आणि पुन्हा हिवाळ्यासाठी जंगल सजते.वर्षातील १२ महिन्यात घडणारे हे तीन अमुलाग्र  बदल अनुभवण्याची मजा वेगळीच आहे.आता जून उजाडला पण हिवाळ्यातील जंगल बघण्यास नक्की जा.यापेक्षा गर्द झाडी आणि त्यामधून डोकावणारा सूर्यप्रकाश नवीन अनुभव घेऊन तयार असेल.
  

  
                                                                                                                 हृषिकेश पांडकर
                                                                          २१ .०६ .२०१६
 

22 comments:

  1. Hrishikesh Excellent informative blog. keep up the good work and its good that you started adding snaps in the blogs. It at least help people like me to understand wild life better.

    ReplyDelete
  2. Superb pandya....as usual...visual tour....Barn Owl तुझीच वाट बघत होतं वाटतं .....

    ReplyDelete
  3. Superb !!
    Loved the detailing !!
    Kshitij Patwardhan

    ReplyDelete
    Replies
    1. Dhanyavaad Mitra !
      Keep reading ..and keep posting your feedbacks :)

      Delete
  4. Pandya this is amazing....its superb....please keep sharing this type of wonderful creations....

    ReplyDelete
  5. Chan lihale aahes Rushi. Mast. I liked the small owlets. Beautiful click.Jungle is always soothing to our mind. Good article. Radhika Tipre

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you so Much Radhika kaku :)

      Indeed ..Jungle is always beautiful !

      Delete
  6. Waaa.... Apratim... Surekh varnan kelaes Hrishikesh...Vishal Thakar

    ReplyDelete
  7. अतिशय वेगळ्या धाटणीचा ब्लॉग लिहिलास ह्रिषी या वेळेस..
    उत्तम माहिती भाषेवरील पकड कायम ठेवून 'informative blog' म्हणजे काय दाखवून दिलेस..

    ReplyDelete
    Replies
    1. Dhanyavaad :)
      Yes..ya veli thoda vegla prayatna kela.Manje apan je kahi pahato te nakki kase asate he sanganyasathi ha photo blog lihaycha tharavla :)

      Delete
  8. First time ever i read PHOTO blog.. Thanks man for excellent photos and explanation.

    ReplyDelete
  9. प्राणी आणि पक्ष्यांचे केवढे हे वैभव

    ReplyDelete
  10. Dhanyavaad gayatri !

    Nakkicha ... We are fortunate enough to witness all this nature's beauty :)

    Keep reading !

    ReplyDelete