Thursday, November 21, 2013

स्वप्नवत नाश्ता ...

सचिनचा शेवटचा सामना अपेक्षेनुसार तीन दिवसात संपला.उरलेले दोन दिवस प्रसिद्धीमाध्यमांनी आणि वृत्तपत्रांनी सचिनची कुंडली आपल्यासमोर व्यवस्थित मांडली.
एका पर्वाचा अंत झाला… 

त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे परवा मुंबई ला जाण्याचा योग आला.एक दिवसाचा मुक्काम असल्याने साहजिकच एक दिवस फिरण्यात घालविण्याची इच्छा होती.रविवार सकाळी लिओपोल्ड कॅफेत ब्रेकफास्टला जावे असे ठरले. मी अंधेरीला असल्यामुळे मी एकटा जाणार होतो आणि बाकीचे दोन मित्र चर्चगेट वरून डायरेक्ट येणार होते. 

     लोकलनी प्रवास म्हणजे पहाटेच निघावे या विचाराने मी लवकरच घराबाहेर पडलो. रविवार सकाळ असल्याने खूपच लवकर मी लिओपोल्डला पोहोचलो.मित्रांना यायला वेळ लागणार होता.मी शांतपणे कॅफेत जावून बसलो.

पुढे घडलेला प्रसंग माझ्या समोरील पाच लोकांच्या टेबल वर घडलेला असून त्याचा वास्तवाशी संबंध असू शकतो

इथून पुढे थेट लिओपोल्ड मधून…. 

( दादा डोक्यामागे हात ठेवून निवांत बसला आहे,डोळ्याला गॉगल आणि अंगात स्लीवलेस त्याच्या समोरच्या खुर्चीत VVS बसला आहे )
दादा : अरे कधी यायची ही लोकं ??…किती वेळ लावलाय. आणि या छोट्या हॉटेल मध्ये ए. सी. पण नाहीये.  
VVS : येतील येतील दादाएवढा पण पेशन्स नाहीये का तुझ्याकडेअत्ता कुठे सुटले आहेत एकदाचे,येतीलच इतक्यात.
(तेवढ्यात हातात कॅमेरा आणि दोन पुस्तक घेवून जंबो आत येताना दिसतो)
दादा : ये ये बसझाले मनासारखे फोटो काढून बस
जंबो : अरे बाकीचे दोघं कुठे आहेत ? आज पण उशीर केलाय का ?… आता कसली कामं आहेत यांना ?
VVS : अरे जंबो,तू तर असा वैतागला आहेस कि तुझ्या बोलिंग वर कोणी कॅच सोडलाय
( दादा आणि VVS जोरात टाळी देवून हसतात )
तेवढ्यात Jammy आणि SRT येतात
( Jammy टी शर्ट आणि जीन्स मधे, टी शर्ट व्यवस्थित खोचलेला आणि हातात मोबाईल,SRT थ्री फोर्थ आणि "I LOVE MUMBAI" असा लिहिलेला आणि गेट वे ऑफ इंडियाचा फोटो असलेला टी शर्ट.)
VVS : याआले आलेझाल एकदाच खेळून ?… आत्ता थांबतील मग थांबतील,पण नाहीच शेवटी थांबले एकदाचे.
दादा : जाऊदे VVS मोठी लोक आहेत.
Jammy :  अरे कसली मोठी लोक दादा, आपण एकत्रच सुरुवात केलीये खेळायलाअर्थात तू ९२ साली आला होतास त्यानंतर काही दिसला नाहीस टीम मध्ये हाहाहाहा….
SRT : हो खरयआणि तुम्ही लोक येईपर्यंत मी तसा जुनियर असल्यासारखाच होतो.
जंबो : बर ते जाऊदे रेअरे बाबांनो ते PF च्या पैशांचे विचारले का कोणी ? नंतर परत पेन्शन ची वगरे लफडी असतात.
VVS : हो ना यारमला तर फक्त टेस्टचाच PF आलाय.वनडे चा अजून मिळायचा आहे.  
दादा : अरे VVS तू वनडे पण खेळला आहेस का ? तुला बघितलच नाहीये रंगीत कपड्यात
Jammy : नाही नाही दादा असा नको म्हणूस ऑस्ट्रेलियाला वनडे सिरीजला तो एकटाच खेळलाय
SRT : तसही ऑस्ट्रेलिया मध्ये आपण टीम म्हणून फार कमी वेळा खेळलोयएखादाच प्लेयर खेळायचा आपला.
दादा : Jammy आणि SRT मुळे किमान तीन दिवस तरी टेस्ट चालायची.
SRT : अरे माझ्यापेक्षा पण VVS चांगला खेळायचाऑस्ट्रेलिया आणि तो हे समीकरण उगीच नव्हते.
जंबो : अरे पण तरी शेवटच्या सिरीज मध्ये आपण खर्या अर्थाने टीम म्हणून खेळलोच की . नाहीतर या आधीची सिरीज भांडण्यात घालवली.
Jammy : जाउद्याआता भज्जी आणि सायमंड सारख्या लोकांच्या नादी लागण्यात काहीच अर्थ नाहीये.एकतर भज्जी कसा आहे हे माहितीये तुम्हाला.तरी SRT मध्ये पडला म्हणून आटोक्यात आलं.
VVS : आपल्याकडे भांडायला लोक कमी नव्हतीकाय दादाहाहाहा
दादा : काय म्हणायचं काय तुलाअरे मी कायम टीमच्या हितासाठी भांडायचो.तुमच्यासारखा स्लीप मध्ये नखं खात बसलो नाही कधी.
जंबो : अरे मला तुम्ही तीस यार्डमध्ये उभं पण राहून दिलं नाही.
SRT : जंबो अरे तीस यार्डमध्ये चेंडू खूप जोरात येतो. उगीच लागला वगरे तर काय घ्यात्यात तू पळणार नाहीस.
Jammy : SRT पण जंबो लागलं असून देखील खेळायला आला होता.आठवतंय नालारा ची विकेट घेतली होती.
 VVS : हो ते मात्र मानलच पाहीजे.अगदी सरदार सारखी पगडी बांधून आला होता खेळायला.
दादा : नाही खरच कमिटेड प्लेयर होता आपल्यातलाइनिंग मध्ये दहा विकेट म्हणजे चेष्टा नाही.
जंबो : अरे त्या दहा विकेट मुळे आठवलंतीन निर्णय माझ्याबाजुने गले नसते तर ते कधीच शक्य नव्हतं.बिचारा सकलेननशीब रेत्यात श्रीनाथ नि मुद्दाम वाईड टाकून मदत केली ती वेगळीच…(सगळेच हसतात).  


SRT : अरे खोट आउट देणे या बद्दल तर मी न बोललेलंच बरअरे काय तो बकनर काय तो अलीम दारअरे अंगाला चेंडू लागला तर LBW आणि नाही लागला तर 'Caught Behind' देतात रेशेवटची सिरीज पण सोडली नाही यांनीतिथे काही प्रतिक्रिया दिली नाही पण डोक्याला शॉट होतो.  
दादा : खरयत्या पोंटिंग नि तर एक टप्पा कॅच घेतल्याचा अपील केला होता रे
VVS : …अरे अम्पायरलाच आउट द्यायला सांगणारे हे लोकआणि म्हणे 'Gentelmens Game'.
Jammy : अरे  'Gentelmens Game''Gentelmens Game' म्हणून मी दोनदा आउट नसताना परत आलोय.आता बोल
VVS : अरे त्या कोलकाता टेस्ट मध्ये मी आणि Jammy दिवसभर खेळलो खरे,पण पोंटिंगचा एका चेंडूवर 'LBW ' वाचलो होतो.बर झाल दिला नाही.पोंटिंगनी बोलिंग करण्याची वेळ यावी यासारखे दुर्दैव नाही ऑस्ट्रेलियाचंआणि त्याला विकेट द्यावी यासारखा पाहुणचार नाहीहाहाहाहा   
जंबो : अरे एका 'LBW'च काय घेवून बसलायमाझ्या फ्लिपरवर असंख्य 'LBW' दिले नाहीयेत,त्याचा काहीच नाहीये तुम्हाला
VVS : हाहाअरे जंबो फ्लिपर पेक्षा पेस आणि सरळ चेंडूनवरच जास्त विकेट्स मिळाल्या आहेत तुलातूच आमचा खरा 'Pace Attack' होतास.( सगळे मोठ्याने हसतात जंबोसहीत)
जंबो : अरे काही का असेनापण बोलर होतो,आणि बोलर असून देखील लॉर्डस वर टेस्ट शतक आहेतुझी देखील असेल कदाचित…( जीभ चावत )किमान इंग्लंड बरोबर एकतरी
( सगळे परत हसतात …VVS इकडे तिकडे बघतो.)
SRT : जाऊदेलॉर्डस आणि शतक याचा विषय नको रे
दादा  : ( गालातल्या गालात हसतो )
जंबो : बर जाऊदे खायला मागवातसही लंच टाईम झालाय
Jammy : संपूर्ण कारकिर्दीत दिवसाची हि वेळ मी मैदानावरच काढलीये…'Batting' असो किव्वा 'Bowling'. त्यामुळे या वेळेची किंमत जास्त आहे मला.सांगूयात काहीतरी खायला.
दादा : अरे निम्मे चेंडू तर तू सोडूनच दिले आहेत तुझ्या करियर मध्ये…( SRT ला डोळा मारत)
SRT : जाऊदे दादातू पण 'Short Balls' सोडू शकला असतास.
(SRT आणि Jammy टाळ्या देतात.)
VVS : Jammy जाऊदे तू जॅम आणि ब्रेड सांग तुला खरच भूक लागलीये
Jammy : मग त्या हिशोबानी दादाला चावनप्राश खावे लागेलम्हणजे पोट फक्त माझा आणि SRT च भरेलतू आणि जम्बो तर अगदीच उपाशी राहणारहाहाहाहाहाहा
दादा : हाहाहा दरवेळी 'कांगारू करी' खावून याचा आयुष्यभराच पोट भरलंय.
(SRT खायची ऑर्डर देतो.)



जंबो : अरे मग त्याच कांगारूनबरोबर २००३च्या फायनल का नीट 'Batting' केली असती तर आम्ही पण WC च्या 'Winning Team' मध्ये आलो असतोआणि आता VVS ला बोलतोय तू.
Jammy :  तेव्हा विरु सोडला तर कोणीच खेळले नाही.अरे आपण ३६० रन्स दिले यावरच माझा विश्वास बसत नाही. 
दादा : अरे काय करणारतो ZK बघ ना. पहिल्या ओवर पासून खुन्नस देतोयते पण गिलख्रिस्ट आणि हेडनला.अरे आपला पेस काय,आपण करतोय काय ? तरी मी त्याला तीन वेळा सांगितला पण नाहीच.
SRT : जाऊदेआता खेळ आहे .या गोष्टी व्हायच्याच
जंबो : अरे तुझा ठीक आहे रेतुझ काम झालय २०११ ला.त्यामुळे तू समाधानी आहेस.आमच्या कारकिर्दीत आम्हाला तो आनंद नाही मिळाला ना. तुझ्यावेळी तुझा कर्णधार खेळला…'Captains Knock'…हाहाहा
दादा : जंबो अरे आता तू कर्णधारावर काय घसरतोयअरे त्या दिवशी माझा खेळ चांगला नाही झाला.पण आदल्याच सामन्यात केनिया विरुद्ध माझे शतक आहे.   
VVS : कुठली टीम ??….हाहाहाहाजाऊदे ताट सरकवा इकडे…( सगळे हसतात)
SRT : हो जंबो तेवढा खरयअरे ती एकच सल राहिली असती पण पोरांनी करून दाखवल.नाहीतर तेव्हाही आपला विरु लवकरच आला होता आतमध्ये आणि ते पण 'रेफरल' वाया घालवूनमी पण काही विशेष केलं नाही पण माही आणि गौती नि करून दाखवलं.
Jammy : आईला WC म्हणलं  कि मला नकोच वाटत२००७ ला काय दिवे लावले आपण.अरे बांगलादेश कडून हरलोय.
दादा : नाहीतर कायकाय एक T-20 WC जिंकला तर सगळेच हवेत
जम्बो : चालायचंच दादा नवीन कर्णधाराचा पहिलाच WC होताआता आपले रथी महारथी वनडे WC ला नाही खेळले तर कसा जिंकणार WC …हरलेते हि बांगलादेश कडून ? हाहाहाहा
दादा : अरे तुम्ही सारखा 'Captain Captain' काय लावलाय ? ( बाकी सगळे हसतात)लोकांनी Captaincy स्वताहून सोडलीये हाहाहाहा
SRT : आईला
Jammy : अरे मला तर कधी मिळाली आणि कधी गेली समजलच नाहीहाहाहा
VVS : अरे स्लीप ला उभे राहणे आणि Ball ला शाईन करणे यापलीकडे मी काहीही केले नाहीये त्यामुळे captaincy तर माझ्यासाठी खूप दूरची गोष्ट. 
जंबो : अरे शाईन करायचा काम सुद्धा निट केल नाही तू.निम्म्या वेळा मलाच करावी लागायची.
SRT : अरे उरलेल्या निम्म्या वेळात मी केलीयेकवर्स मध्ये उभा राहून
Jammy : अरे SRT नि शाईन केलीये सुद्धा आणि घालवलीये सुद्धा आणि एकदा तर म्हणे सीम सुद्धा कुरतडलीये…( बाकीचे हसतात ) 
दादा : अरे पण तेव्हा ते तिथेच क्लियर झाला कि त्याने कुरतडली नसून त्यावरचे गवत काढले आहेखोटा आरोप होता तो च्यायला तेवढ्यासाठी आफ्रिकेतून परत यायला लागला
VVS : हममतेच म्हणणार होतो मी…SRT वर आरोप करणे योग्य नव्हते
SRT : आईला नुसतं सीम वरचं गवत काढला तर एवढी बोंब लोक हल्ली प्रातर्विधी पीचवर उरकतात हे चालता यांनाहाहाहाआणि म्हणे आम्ही क्रिकेटचे जनक
जंबो : आधी एखादा विश्वकरंडक तरी जिंकाआणि म्हणे जनकहाहाहा
Jammy : अरे जनक वरून आठवण झालीतो शोएब अख्तर चा 'बाप बाप होता है' वाला किस्सा खरा आहे का रे SRT ?
SRT : हाहाहाअरे विरु खरच म्हणाला का ते मला माहित नाही पण ती सिक्स मारलेली माझ्या लक्षात आहे.खर तर त्याला सिक्स मारणं सोप आहेहाहाहा
 VVS : हाहाहा मिडिया समोर उगीच खोटं सांगाव लागत…'Talented Player' वगरे
दादा : हाहाहाकाय गचाळ प्लेयर आहेतो काय तो मोहम्मद युसुफ कायत्याला तर मी भर मैदानावर झाडलाय
VVS  : हो ना दादाअरे तू कोणाला सोडला आहेस तेवढा सांगअरे तू 'Steve Waugh' ला पण नाही सोडलास ते हि ऑस्ट्रेलिया मध्ये त्यांच्या देशात 
Jammy : अरे आत्ताची पोर बघातो कोहली,धवनत्या 'Watson'च भर मैदानात माकड बनवलबिचारा काही बोलू पण शकला नाही.
SRT : आता त्याच जोशात खेळतायेत म्हणून प्रश्न नाहीपण शिस्त हवीच.
दादा : हा तू तेवढा शिस्तीचा सांग सगळ्यांनाइतके दिवस शांत होतो आपण म्हणून ते ऑस्ट्रेलियन बोलत होतेत्यांना तसेच दिले पाहिजे रे
जंबो :  हो आता बरोबर आहेदादाची Bat ऑस्ट्रेलिया समोर तळपली नाहीपण वागण्यातून तू व्यवस्थित समज दिलीस हाहाहा
दादा : तळपली नाही कायजेवढे फोटो तू ब्रिस्बेन मध्ये काढले नसतील तेवढ्या रन्स आहे माझ्या 'Gabba'वर 
VVS : दादा तू कुठे लगेच अशा गोष्टींवर चिडतोखावून घे
SRT : अरे खावून घ्या रेगार होतंय ते
Jammy : होवूदे रे गारआता काय घाई आहे तुलासगळ्यातून बाहेर पडला आहेस आता तूशिवाय 'Commentry' पण करशील अस वाटत नाही आता.आम्हाला ते तरी काम आहे किमान.  
SRT : हो ना रावआता खरच काम नाहीयेतुमचं तरी बरंय बडबडीच काम मिळालय.
VVS : हाहाहा आता खर्या अर्थाने दादाला 'Job Satisfaction' मिळेल.
Jammy : बिचारा जंबो IPL मधून लगेचच बाहेर पडला.
दादा : होअरे डाइव्ह मारताना दहा वेळा विचार केला कि असाच होणारहाहाहा
जम्बो : दादातुला देखील फार काही जमलय अशातला भाग नाहीयेशेवटी कोणीच घेतला नाही तुला हाहाहा   


Jammy : अरे तुम्ही आपापसात भांडू नका रेतुम्हीच असा म्हणालात तर VVS  कोणाकडे पाहणार ? तो तर कसाबसा IPL खेळू शकला आहे. हाहाहा
SRT : अरेजंबो पण एकाच सिझन खेळला आहे.त्यामुळे IPL हा मुद्दा वादाचा होवू शकतो.( सगळेच मोठ्ठ्याने हसतात)
जंबो : चला निघावं
दादा : अरे थांब रेआता तुला काय घाई आहे ? इथे मुंबईत कसले फोटो काढणार आहे भर दुपारी ? आणि आम्ही 'Batting' करत असताना तसही भरपूर फोटो काढलेले आहेत.
VVS : अरे चल मी पण निघतोआता वेस्टइंडीजच्या वनडे सुरु व्हायच्या आधी घरी जावून यायच आहेपरत कॉमेंट्री आहेच.  
Jammy : खरच रेचला,एकतर या SRT च्या शेवटच्या सामन्यामुळे अशक्य दगदग झालीये.
SRT : अरे दगदग कसली ? मस्त AC खोलीत बसून गप्पा तर मारत होता तुम्ही.त्यात निम्म्यापेक्षा जास्त वेळ हर्षाच बोलत असतो.
दादा : अरे त्या बाबतीत तुझा अनुभव कमी आहेतुझा अजून त्या क्षेत्रात 'Debut' व्हायचय.हाहाहा
जंबो  :  अरे चलाअजून तिकीट काढायचंय विमानाचं. आता BCCI काढत नाही. हाहाहा
SRT : अरे रेल्वे विमानाची तिकीट कसली काढतामाझ्याकडे बघा भारतभर विमानप्रवास फुकट हाहाहा
Jammy : हाहाहाहाभारतरत्न SRT
VVS : अरे खरच किएवढी बक्षीस मिळाली पण याची मज काही वेगळीच असेल.
जंबो : त्या कार्यक्रमाला फोटो काढायला बोलाव मला तसाही काहीच करत नाही मी सध्या
दादा : अरे आफ्रिकेत टेस्ट क्रिकेटची कॉमेंट्री मला जर भीती वाटतीये.'Short Ball' हा शब्द उच्चारायला सुद्धा नको वाटतंयचला निघूया.
Jammy : अरे भेटत जा असेचतेवढ्याच जरा जुन्या आठवणी.
VVS : मी तर म्हणतो एखादी टेस्ट सिरीज एकत्र बघुयात.कळेल कशी खेळतात हि पोरं.
SRT : अरे नक्कीच चांगली खेळणारआपण एकत्रच बघुयात.
जंबो : मला तर वाटतंय कि २०१५  चा WC आपलाच असणार आहे.काय टीम आहे आपली मस्तच
Jammy : चांगली टीम झालीये आणि लिडर पण चांगला मिळालाय   
दादा : ए अरे आपल्या वेळेला लिडर चांगला नव्हता अस म्हणायचं का तुम्हाला
( पुन्हा एकदा सगळेच मोट्ठ्याने हसतात)
( सगळे निघतात SRT पैसे भरतो,Jammy TIP देतो,जंबो ग्रुप फोटो घेतोदादा गॉगल लावून बाहेर पडतो,VVS बडीशेप घेण्यासाठी काउंटर वर जातो  सगळे निरोप घेतात आणि मार्गस्थ होतात )  

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

माझे मित्र येवून गेले बहुतेक पण आज मी वेगळ्याच लोकांबरोबर नाश्ता केलामी पण बाहेर पडलो

                                                                                                हृषिकेश पांडकर
                                                                                                २१/११/२०१३

2 comments:

  1. हाहाहा … नक्की असंच घडलं असणार … पूर्ण खात्री आहे मला. तुझी लेखणी वाहतेय मस्त … खमंग फोडणीचा सुवास आला मला इथे … कडक लेख… (चर्चा तर होणारच). ही पाचही जण भारतीय क्रिकेटची पंचरत्न … सगळ्यांचे स्वभावविशेष खूबीने टिपले आहेत तू. आणि विशेष म्हणजे त्या त्या matches आठवल्या लगेच. प्रभावी आणि प्रवाही लिखाण. आवडलं.

    ReplyDelete
  2. Excellent, sundar warnan ani imagination. But you could have easily avoided the line 'Watson cha makad kela'.. and other Australia references. You should have used only Pak...in fact Watson had hit 49 of 22 on that day.. Shikhar was pathetic..

    ReplyDelete