दर वर्षी शाळेचे स्नेहसंमेलन होते.या मागे काहीतरी हेतू अधोरेखित
असतो.एखादा event किव्वा एखादे function आयोजित करण्यामागे काहीतरी हेतू हा
असतोच.आणि तो हेतू पूर्णत्वाला नेणे हेच उद्दिष्ट ठेऊन
त्याची आखणी करणे क्रमप्राप्त असते.तर असेच काहीसे होते आमच्या Annual
Meet चे.सलग तीन वर्ष
ज्या हेतूने आम्ही हा वार्षिक समारंभ आयोजित करीत होतो त्या
उद्देशाला थोडा तडा देऊन या वर्षी आम्ही आमचा मार्ग बदलला होता.गेली
तीन वर्षे आम्ही वर्षभर काय केले हे तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करीत
होतो.पण या वर्षी आम्ही काय केले या बरोबरच कार्यक्रमाच्या दिवशी देखील
समाजोपयोगी सत्कार्य करून दाखवणे हे आमचे उद्दिष्ट होते.आणि याच बरोबर आमच्या
वेबसाईट चे उद्घाटन हा देखील महत्वाचा टप्पा आम्हाला या कार्यक्रमात
गाठायचा होता.
तर साधारण विचारांती असा निर्णय झाला होता कि हि यंदाची Annual
Meet हि
दुधारी तलवार असणार आहे.ज्याची एक बाजू समाजातील घटकाला
वापरली जाईल आणि दुसरी बाजू आमच्या वेबसाईटचे उद्घाटन म्हणून वापरली
जाईल.तलवारीचे चित्र स्पष्ट झाले होते.आता वेळ होती ती पाती बनवायची.
काय करायचे याची निश्चित कल्पना सर्वांना होती.कागदवर
विलक्षण सोपे वाटणारे दोन मुद्दे स्टेज वरील दोन तासात पूर्णत्वाला
नेण्यासाठी कॅलेंडरच्या दोन महिन्याची तयारी लागेल यावर विश्वास बसला
नाही.पण मी अनुभवलंय.
दोन अतिशय
साध्या गोष्टी होत्या, एक म्हणजे वेबसाईटचे उद्घाटन आणि दुसरे
म्हणजे एखादा तासभराचा कार्यक्रम ठेवायचा आणि या संपूर्ण
कार्यक्रमाच्या तिकिटातून आलेला निधी सत्कारणी लावायचा.
तर सुरुवात अशी झाली..आता वेळ होती तयारी सुरु करायची,तिकीट काउंटरला ४/५ तिकिटे घेऊन बालगंधर्व मध्ये हजार वेळा बुकिंग केले,
पण ऑफिसच्या दारातून आत जाऊन संपूर्ण बालगंधर्व बुक करायच्या वेळा फार
कमी येतात.त्यातील हि एक .तारखांचे खेळ,तयारीचे दिवस,परीक्षांचे वेळापत्रक या
गोष्टी एकत्र बांधून दिवसाचा मुहूर्त निघाला आणि शिखर
निश्चित करून base camp वरील तंबू हलले.
'गाण्याचा कार्यक्रम ठेऊ,पब्लिक Response जास्त असतो, या अतिशय 'Obvious' वाक्याने चर्चेला सुरुवात झाली,
आणि कलाकार ठरवेपर्यंत आम्ही
येऊन पोहोचलो. कलाकार ठरले आणि आता वेळ होती त्यांच्या
परवानगीची आणि आमच्या बजेटची.म्हणजे कार्यक्रम ठेवायचा त्या कलाकारांना
पैसे द्यायचे आणि तिकिटातून जमलेले पैसे पुढे मदतनिधी म्हणून द्यायचे.पण
कलाकारचे मानधन जर आमच्या बजेटच्या बाहेर असेल तर 'Fund
Raising' चे काय ??..आणि याच स्पीडब्रेकरवर गाडी थोडी अडखळली,
पण स्पीडब्रेकरवर अडखळून चालणार
नव्हते पुढे तर संपूर्ण घाट होता..बर गाण्याचा नाही तर
मुलाखतीचा कार्यक्रम ठेउयात यावर एकमत झाले.मुलाखत कोणी घ्यावी यावर फार चर्चा
नव्हती पण मुलाखत कोणाची घ्यावी या वर मात्र अपेक्षेपेक्षा जास्त वेळ
गेला.कारण त्यांची 'Availability',त्यांचे मानधन या गोष्टींची सांगड घालणे थोडे अवघड
जाणे साहजिक होते.मात्र तयारीचा उत्साह तसूभर देखील कमी
झाला नव्हता.प्रमुख पाहुणे कोण हे ठरल्याशिवाय निमंत्रण पत्रिका,स्टेज डेकोरेशन आणि इतर
प्रिंटींग किव्वा मार्केटिंग यापैकी एकही गोष्ट पुढे जाणे
शक्य नव्हते. आणि पुढच्याच आठवड्यात मुलाखतकार आणि मान्यवर या दोघांची नावे पक्की
झाली.लेखी 'Confirmation' मिळाले आणि तयारीला खर्या अर्थाने वेग आला. फंड
उभा करायचा म्हणजे तिकिटांची विक्री होणे अपरिहार्य होते
आणि त्यासाठी तिकिट्स छापून घेणे हे सर्वात अग्रक्रमांकाचे काम होते.
Free passes,gift
passes किव्वा कुठल्याही
मार्गाने येणारे पासेस आपण एकदा बघून खिशात घालतो
त्याचे डिझाईन किती अवघड आहे त्यावर प्रिंट झालेल्या किमती
योग्य आहेत का ? तारीख छापलेली निट दिसते आहे का?
या गोष्टी इतक्या लक्ष देऊन पहायची वेळच
आली नव्हती.तिकीट आहे न मग बास या समाधानावर अनेक
कार्यक्रम पाहून झाले, पण तिकीट दिसायला कसे आहे हे पहायची हि
पहिलीच वेळ होती.तिकिटाचे डिझाईन
पूर्ण झाल्यावर त्याच्या 'Seating
Arrangments' नुसार ८००
प्रिंट्स काढल्या होत्या आणि छापून आल्यावर समजले कि एक छोटीशी चूक झाली.
त्यामुळे सर्व तिकिट्स पुन्हा प्रिंट काढण्यावाचून पर्याय नव्हता,
मानसिक आणि आर्थिक असे
दोन्ही फटके व्यवस्थित बसले होते.'अक्कलखाती' या account ला credit टाकून पुढचा हिशोब सुरु केला होता.नवीन आलेली तिकिट्स नंबर टाकून
वाटण्याचे काम सुरु झाले होते.'मला १० तिकिट्स हवी आहेत' असे सांगून दोन दिवसांनी 'नको ४ पुरेशी आहेत' असे म्हणून ६ तिकिट्स परत देणारे पण होते आणि 'मला १० च हवी आहेत' असे सांगून दोन दिवसांनी 'मला अजून १० लागणार आहेत' असे म्हणणारे देखील खूप भेटले.पण कुठेही हिशोबाचा गोंधळ नव्हता.आणि
शेवटपर्यंत कधीच झाला नाही.
एवढा
मोठा कार्यक्रम त्यामुळे स्टेज डेकोरेशन हि प्रचंड मोठी जबाबदारी
होती, आणि ती यशस्वीपणे पेलली गेली,आमच्या चार वर्षातील activitiesचे फोटो एकत्र करून २५ *१२ चा Backdrop बनवला होता.त्याचे प्रिंटींग कसे केले असेल
याची मला कल्पना नाही पण ज्या तर्हेचा तो झाला होता त्याला
तोड नव्हती.संपूर्ण स्टेज व्यापले जाईल याची पुरेपूर दखल घेतली गेलेली
होती.प्रत्यक्ष त्या दिवशीच्या स्टेज वरील प्रत्येक
हालचालीची नोंद आधीच झालेली होती, म्हणजे पाहुणे येणार कधी बसणार कधी परत खाली कधी येणार,
ते आल्यावर काय म्हणायचे जाताना काय म्हणायचे इथपर्यंत
व्यवस्थित planned होते.त्यानंतरचा मोठा प्रश्न होता वेबसाईटचे उद्घाटन,
कारण ७०० लोकांसमोर पाहुण्यांनी क्लिक केल्यावर 'Webpage
Can not be Displayed' असा error
आला तर कुठल्या तोंडाने प्रेक्षकांकडे बघायचे किव्वा आयत्या
वेळी वायर पाहुण्यांच्या टेबल पर्यंत पोहोचलीच नाही तर ?
वायरलेस माउसची रेंज तेवढी
नसेल तर ? अशा एक न अनेक प्रश्नांनी कार्यक्रमाचा seriousness
वरच्या पट्टीत गेला होता.आणि त्यावर उपाय म्हणून बालगंधर्व मध्ये
रात्री ११ वाजता कॅन्टीन च्या मागच्या दराने आत जाऊन थेट स्टेजवर जाऊन
घेतलेली connectivity
test मी आयुष्यभर विसरू शकणार
नाही.
मुलाखतीसाठी एकाच प्रकारचे ३ सोफासेट मिळवणे हि कमालीची
मजेदार गोष्ट होती, कारण एका सेट मध्ये २ पेक्षा जास्त खुर्च्या नसतात,पण ते शोधून योग्य वेळी तिथे पोहोचवणे यात आलेले यश खरच अभिनंदनीय होते.आपण
कोणालातरी दुसर्याला देण्यासाठी Certificates छापणे हि वेळ कधी येईल असे वाटले नव्हते
पण ते करण्याचा अनुभव देखील मिळाला.छापलेली certificates
रात्री घरी नेताना एकमेकांना चिकटली आणि त्यामुळे एका certificate
वर डाग आला..त्याचा नैराश्य लपवणं कधीच जमला नाही.वास्तविक अतिशय छोटासा डाग
होता आणि तसेही ते दुसर्यालाच मिळणार होते, पण जेव्हा सगळे मिळून काम करत असतात तेव्हा
आपले काम कुठेच कमी पडू नये असे जेव्हा
वाटते तेव्हाच ते काम perfect होते या विचारला पुन्हा दुजोरा मिळाला.
सर्व तिकिटे विकली गेली,सगळी कामा व्यवस्थित पूर्ण झाली अशी कल्पना
आदल्या दिवशी आली होती पण तरी देखील यशाची खात्री देण्याची
हिम्मत नव्हती.विश्वासावर nerveousness भारी पडत होता.आणि नंतर याच nervousness
मुले यशाची रुंदी अजून वाढवली.आदल्या रात्री backdrop
व्यवस्थित लाकडावर ठोकण्याचे काम बाकी होते ते बालगंधर्वाच्या मागच्या जागेत
पूर्ण झाले होते.मात्र तो रात्री आत मध्ये ठेवण्याची आम्ही वाट पाहत
होतो पण
काही कारणमुळे त्याला उशीर झाला, तेव्हा माझा मित्र तिथे रात्री उशिरा झोपेतून
उठून ते आत ठेवला आहे कि नाही हे पाहायला गेला.dedication
आणि responsibility या दोन्ही शब्दांच्या व्याख्या माझ्या तिथेच पाठ झाल्या.
प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी अर्थातच ठरवलेल्या वेळेच्या आधी जग येणे
स्वाभाविक होते.Excitement हे एकमेव कारण आहे याला,तशी ठरवलेल्या वेळेच्या
आधी जग हि फक्त ट्रीपच्या दिवशीच.सकाळी बालगंधर्व च्या
आवारात पोहोचलो, आमच्या डेकोरेशन टीम मधले सगळे तिथे माझ्या आधी हजर होते.काळ रात्री
असलेल्या कार्यक्रमाची रांगोळी आधी स्वच्छ करून त्यावर नवीन
रांगोळी काढण्याचे काम चालू होते.मजा कशी असते बघा,
एखादा कार्यक्रम apan जेव्हा प्रेक्षक म्हणून पाहायला जातो तेव्हा तेथील रांगोळी 'वा छान मस्त आहे' असे म्हणून किवा फार तर एखादा फोटो काढून आपण तिथून पुढे जातो
पण कार्यक्रमाच्या वेळेपेक्षा ती रांगोळी काढायला लागणारा वेळ जास्त असतो हे
समजते तेव्हा त्या कष्टाची जाणीव करून घेण्याखेरीज पर्याय
नसतो.
प्रेक्षकात बसून स्टेज वरील कृतींवर comment
करत कार्यक्रम बघणे आणि
प्रत्यक्ष स्टेज वरून किव्वा विंगेतून जीव मुठीत धरून
कार्यक्रम पाहणे यातील खूप मोठा फरक खूप जवळून अनुभवता आला.राष्ट्रगीताच्या
वेळी व्हीडीओ लागला नाही आणि काळजाचा ठोका चुकला होता पण जागेवरून हलता
आले नाही.अर्थात याची प्रेक्षकांना काडीमात्र कल्पना नव्हती.
रेणुताई
गावस्कर आणि विकास आमटे यांची सुधीर गाडगीळांनी घेतलेली मुलाखत छान झाली.दोन दिग्गजांच्या एकत्रित बैठकीमुळे मुलाखतीला वेळ थोडा अपुराच पडला..याचीच थोडीशी सल..बाकी संपूर्ण जमा झालेला निधी सत्कारणीच अर्थात लहान मुलांच्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी आणि खेळघर या संस्थेकडे लहान मुलांच्या आरोग्य तपासणी साठी सुपूर्द करण्यात आला..देण्याचा आनंद खर्या अर्थाने अनुभवला....
आपण काहीतरी करू शकतो याची संपूर्णपणे
जाणीव होते जेव्हा कार्यक्रमाच्या यशस्वी सांगतेनंतर प्रेक्षक लोक पाठीवर थाप
मारतात
.केलेल्या कमचे चीज होते
आणि समाधान अभिमान दोन्ही भावना हजेरी लावतात.अश्या वेळी खरच समजते कि एखादी जबाबदारी
पूर्ण करणे किती विलक्षण आनंद देणारी गोष्ट आहे.Team
Work,Dedication,Sincere Efforts या शब्दांचे अर्थ कार्यक्रम झाल्यानंतर बालगंधर्व च्या बाहेरील passage
मध्ये समजत होते...लोकांनी दिलेल्या कौतुकाच्या थापेमधून केलेल्या
कामाचा तसूभर देखील थकवा जाणवत नव्हता.पाहुणे क्रमाक्रमाने बाहेर पडले,
प्रेक्षकवर्ग मार्गस्थ
झाला संपूर्ण रंगमंदिर रिकामे होते.फक्त स्टेज वर असलेला backdrop
आणि डावीकडे असलेले podium....दोन महिन्याचा धावपळीचा शेवट गोड झाला होता.आठवणी
आणि अनुभव घेऊन बाहेर पडलो...
....आज काढलेला ग्रुप फोटो
खर्या अर्थाने ग्रुप फोटोच होता....
हृषिकेश
पांडकर
११.०७.२०१२