रामाच्या डोळ्यादेखत सीतेला उचलून नेण्याचे सामर्थ्य ज्याच्याजवळ होते तो धाडसी तर असणारच...इतिहास सांगतो त्यानुसार लंकेतून परतताना सीता पवित्रच होती त्यामुळे त्याने मर्यादाही पाळलीच असावी.आता सीता जिवंत होती हा जर रामाचा पराक्रम धरला तरी सीता पवित्र होती हा रावणाचा सय्यम समजायला काय हरकत आहे ? रावण जेव्हा शेवटचा श्वास घेत होता तेव्हा 'रावणाकडून अर्थशास्त्र शिकून घे' असा सल्ला रामानेच लक्ष्मणाला दिला असा उल्लेख आहे.त्यामुळे हि व्यक्ती अर्थशास्त्रात निपुण आहे असं मानायला हरकत नाही.रावण हा थोर शिवभक्त होता हे तर सर्वश्रुत आहेच.बरं आणि या व्यतिरिक्त काही वाईट गोष्टींमुळे जर रामाने रावणाशी युद्ध केले असेल तर त्याची मला कल्पना नाही.पण दर वर्षी त्याची हि दहा तोंड जाळून हा इव्हेन्ट सेलिब्रेट करण्याइतका तो वाईट होता का ? का फक्त रामाचा opponent होता या एका बेसिसवर आपण आनंद घेतोय ? 'The heroism of the hero is proportional to the greatness of the villain ' या लॉजिक नुसार विचार करता व्हिलनही तेवढ्याच तोडीचा होता हा निष्कर्ष काढायला हवा .. बरं रावण दहनाच्या कार्यक्रमाला समोर उभ्या असलेल्या हजारो लोकांमध्ये किमान वानरसेनेतील वानरांइतके तरी सामर्थ्य किव्वा योग्यता असेल का हा प्रश्न तितकाच अनुत्तरित आहेच कि..त्यामुळे दसरा साजरा करताना केवळ फुकट फॉरवर्ड करता येतात म्हणून रावण दहनाचे GIF किव्वा फोटोज पुढे पाठवण्यापेक्षा जरा वेगळा विचार करून बघावा असं वाटले म्हणून आपलं उगाच हे लिहिण्याचा खटाटोप..बाकी 'रम्य हि स्वर्गहुन लंका आणि कौसल्येचा राम बाई' या गोष्टी आहेतच ..प्रश्न फक्त हा उरतो कि 'मन से रावन जो निकाले राम उसके मन मे है' हे विधान तितकेसे समर्पक राहिलय का ?
काही काही वेळेस मला असं वाटत कि " Every story will glorify the hunter until lion learns how to write "
- शुभ दसरा (belated)