आज
खूप दिवसांनी असं वेगळंच वाटतंय…
मळभ आलेल्या गडद आभाळात सूर्याने डोके वर काढलंय…
आधीच जमलेल्या दवाचे जणू मोत्यात रुपांतर होवू लागलंय…
आज खूप दिवसांनी असं वेगळंच वाटतंय…
घनदाट अभयारण्यात जिथे मी सांबर अन हरणाचा नाद सोडलाय
अशा त्या निबिड अरण्यात खुद्द वाघाच्या पावलाचे ठसे व्याघ्रदर्शनाचे संकेत देतायेत…
आज खूप दिवसांनी असं वेगळंच वाटतंय…
पुलं च्या बंद झालेल्या लेखणीला आज शाईची ओल जाणवतीये…
कदाचित 'अपूर्वाई' 'पूर्वरंग' नंतर 'जावे कांगारूंच्या देशा' असं काहीतरी शब्दबद्ध करण्याचा तो आरंभच वाटतोय…
आज खूप दिवसांनी असं वेगळंच वाटतंय…
'तानाजी' नेटाने लढत होता तोवर जीवात होता…
आज 'तो' नसला तरी दोर कापून मावळ्यांना लढण्याची स्फूर्ती देणारा 'सूर्याजी' डोळ्यासमोर येत होता…
आज खूप दिवसांनी असं वेगळंच वाटतंय…
इतके दिवस लाल शाईने भरलेली उत्तरपत्रिका आज 'मॉडेल आन्सर पेपर' म्हणून मिरवतीये…
प्रिलीम तर केव्हाच सर झाली…आता 'पहिला' नंबर साद घालतोय…
आज खूप दिवसांनी असं वेगळंच वाटतंय…
एखाद्या हिमालयातील ग्लेशियरवर मॅगी मिळाल्याचा आनंद होतोय…
सह्याद्रीच्या रखरखीत उन्हात सावलीला बसून थंड पाणी पिण्याचा भास होतोय…
आज खूप दिवसांनी असं वेगळंच वाटतंय…
काळरात्र होता होता उष:काल झाल्यासारखा वाटतंय…
'जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी' या वाक्याचे कुतूहल आज कुठेतरी लोप पावल्यासारखं वाटतंय…
आज खूप दिवसांनी असं वेगळंच वाटतंय…
'१०' नंबर ची निळी जर्सी मैदानात नसूनही
'१००' कोटींचा भारत आज करंडकाचे स्वप्न बघतोय…
आज खूप दिवसांनी असं वेगळंच वाटतंय…
यंदाचा मार्च एंड थोडा वेगळाच वाटतोय...
ससा आणि कासवाची शर्यत आज खर्या अर्थाने कासव जिंकतंय…
आज खूप दिवसांनी खरंच वेगळं वाटतंय…

हृषिकेश पांडकर
२३.०३.२०१५
२३.०३.२०१५