आचरेकर सरांच्या शाळेतील सर्वात हुशार विद्यार्थी …
तमाम क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवत …
चोवीस वर्ष स्वप्नवत समाधान देणारा जादुगार फक्त तूच होतास ….
निम्मे आयुष्य आणि संपूर्ण बालपण …
आम्हाला दत्तक घेऊन मनमुराद आनंद देणारा फक्त तूच होतास ….
नव्वदच्या दशकात क्रिकेट जगताच्या तोफखान्यासमोर…
अखंड भारताची 'Batting Order' तूच होतास ….
टी.व्ही च्या दुकानासमोरील गर्दीचा… जेवणाच्या ताटामधील घासाचा…
रस्त्यावरील शुकशुकाटाचा धनी तूच होतास….
धावा,शतकं,सामने आणि असे अनेक ….
विश्वविक्रमांच्या यादीचा श्रीगणेशा तूच होतास ….
आजी आजोबांचा लाडका आधार …आई बाबांचा सुपर हिरो…
आणि आम्हा सर्वांसाठी सदैव तारणहार साक्षात तूच होतास…
प्रतिस्पर्ध्याच्या विजयातील अडसर …आपल्या विजयाचा शिल्पकार …
सामना पाहण्याचे आणि न पाहण्याचे कारण फक्त तूच होता…
चोवीस वर्ष झाली…दोन पिढ्या खेळल्या …शेकडो आले…
शेकडो गेले…
निळ्या कपड्यातील नंबर 'एक'…शुभ्र कपड्यातील नंबर 'चार'
कायम तूच होतास….
'Bradman'ची प्रतिमा…'Shane
Warne' चे भयस्वप्न….
'Lara' चा हिरो
…
आणि…क्रिकेटचा मानदंडही तूच होतास….
'MacGrath' चे टार्गेट…'Akram' ची शिकार …'Donald'
चा गोल….आणि 'Murali'
चा Aim…
समोरच्या टीम मिटिंगचा 'Agenda' फक्त तूच होतास…
कसोटी हरल्यामुळे 'Man of
The Match' घ्यायला न येणारा…
रणजी सामना जिंकल्यावरही लहान मुलासारखा नाचणारा क्रिकेटवेडा
तूच होतास….
'कौतुक'
करणे असो…'बाजू'
घेणे असो…कि 'Defend'
करणे असो…
आमच्या चर्चेचा 'गाभा'
फक्त तूच होतास….
'Sharjah' चे वाळवंट असो कि 'Merlbourne' चे ग्रास …
'Old Trafford' ची थंडी असो कि 'नागपूर'
ची गरमी…
'Carebian' ड्रम्स चा गजर असो कि 'Premadasa' चा सागर
'Auckland' चे हिमपर्वत असो कि 'Johansburg' चे सौंदर्य…
सगळीकडे आपला ठसा उमटविणारा फक्त तूच होतास….
वडिलांच्या निरोपाला धैर्याने तोंड देवून…
पुढच्या क्षणाला देशासाठी धावणारा…आमच्या देशाचा खरा 'Family
Man' तूच होतास….
'Records' साठी आणि स्वतःसाठी खेळणारा … स्वार्थी
महत्वाच्या क्षणी…गरजेच्या वेळी धावा न करणारा …कुचकामी…
आणि तरी देखील ५०००० धावा काढणारा … एकमेवाद्वितीय…तूच होतास…
'Cover Drive' चे पहिले प्रेम…'Upper Cut' चा जन्मदाता…
'Paddle Sweep'चा कलाकार …'Straight
Drive'ची ओळख फक्त तूच होतास….
मुंबईचा 'तेंडल्या'…क्रिकेटप्रेमींचा 'God'…
भारताचा 'कोहिनूर'…आणि क्रिकेट जगताचा 'मास्टर'
२२ यार्डांचा सर्वेसर्वा फक्त तूच होतास ….
जगाच्या पाठीवर हा खेळ किती ओळखीचा असेल माहित नाही…पण…
आमच्यासाठी खेळाची ओळख फक्त तूच होतास….
तुझ्या 'Kit Bag' ची शपथ घेऊन सांगतो…
जिद्द,चिकाटी आणि मेहनत या 'Tripod' वरून क्लिक झालेला सर्वोत्तम फोटो तुझाच होता….
इथून पुढेही खेळ चालूच राहील…खेळाडू होतील…विक्रमही होतील…
पण तुझी सर त्याला कधीच येणार नाही…कारण तुझ्यासारखा फक्त तूच होतास…
हृषिकेश पांडकर
१०/१०/२०१३