Wednesday, July 12, 2017

Somewhere between

 Somewhere between

तेंडल्या खेळतोय ना ?..मग ठीके….and

Someone should stand and negotiate the new ball

We grow up !!

Somewhere between

हिंजेवाडीला मी जाणार नाही..किती लांब आहे ते पुण्याबाहेर.. ..and

हिंजेवाडीला मी जाणार नाही ..किती घाण ट्रॅफिक आहे..

We grow up !!

Somewhere between

आई आज क्लासला छत्री नको..भिजलो तरी चालेल उद्या तसही सुट्टी आहे…and

Hey Siri "What's the weather like today?", "Do I need an umbrella?

We grow up !!

Somewhere between

पोरांनो उद्या शेवटचा पेपर..रिक्षावाल्या काकांकडून सर्वांना वडापाव आणि बॉबी…and

आज शुक्रवार..वीकएंड.. किमान बार्बेक्यूला तरी जेवून घरी जाऊयात...

We grow up !!

Somewhere between

जा बरं शिक्षक कक्षातून २ खडू घेऊन ये…and

hey can you please pass on the white board markers ?

We grow up !!

Somewhere between

काहीही झालं तरी आपल्याला हवं तसंच होणार शेवटी…and

ठीके आता जे झालंय ते चांगलं मानून पुढे जाऊयात..

We grow up !!

Somewhere between

हि दोस्ती तुटायची नाय…and

'Nothing truly last forever' is the bottom-line

We grow up !!

Somewhere between

आठवी पासून शाळेत फुल्ल पॅन्ट घालायला मिळणार and

Can we wear three fourths on Friday atleast ?

We grow up !!

Somewhere between

बाबा सायकलच्या मागच्या चाकात हवा कमी आहे तर ती भरताना पुढच्या चाकात पण भरून टाकू का ?...and

गाडीची चारही चाक बदलून टाका तसही जुनी झालीयेत

We grow up !!

Somewhere between

दिवाळीच्या सुट्टीत ट्रिप ला जाऊयात का ?...and

या दिवाळीला तरी घरी जायला मिळायला पाहिजे यार..

We grow up !!

Somewhere between

काका पेरूवर अजून थोड तिखट टाका ना...and

दो चिली पनीर ड्राय..थोडा कम स्पायसी बनाना

We grow up !!

- हृषिकेश

 

Wednesday, July 5, 2017

संडास

 ...आणि हा संडास..का हो..नाही म्हणजे इथेही ऑटोमॅटिक होता कि कुंथावं लागतं ?"

अगदी हेच वाक्य माझ्या डोक्यात आला जेव्हा वॉशरूमचा दरवाजा उघडून हि गोष्ट पहिली.जितकी आमच्याकडे संपूर्ण घरात बटणं नसतात तितकी या कमोडला होती.बसावं तर शॉक लागेल कि काय अशी उगीचच भीती वाटत होती.पण 'पुढचे काही दिवस यावरच बसण्याशिवाय गत्यंतर नाहीये' या भीतीचा आधार घेऊन उसन्या धैर्याने त्यावर आरूढ झालो.आणि या गोष्टी पुढे अंगळवळणी पडल्या तो पुढचा भाग.


 

पुण्यात अखंड बालपण आणि निम्मे तारुण्य (मी निम्मे हा शब्द मुद्दाम लिहिला आहे कारण वाचकांना वयाचा अंदाज येऊ नये) घालवल्या मुळे पुलंनी उल्लेख केलेल्या दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींचा प्रत्यय आला होता.पण हा कमोड बघून पुलंचा शत्रुपक्ष प्रकर्षाने आठवला.संदर्भ नक्कीच वेगळा आहे पण भाईंच्या वर्णनाला चपखल बसणारे दृश्य पाहून एकाच वेळी पूर्वरंग आणि शत्रुपक्षाची आठवण झाली.या जपान्यांच्या घरात अशाच आणि इतक्या करामती केलेल्या होत्या कि पु.ल म्हणतात त्या प्रमाणे ते रहायचे घर आहे कि कौरवांची मोरू करायला बांधलेली मयसभा आहे याचा खरंच थांगपत्ता लागत नाही.पुढच्या चार पाच दिवसात पुन्हा एकदा 'मी आणि माझा शत्रुपक्ष' व 'पूर्वरंग' डोळ्याखालून घातले.घरापासून लांब राहूनही आपलेपणा वाटावा इतकं त्यात सामर्थ्य आहे याची पुन्हा एकदा जाणीव झाली.

आज हे लिहायचे कारण म्हणजे मित्रांनी वाढदिवसाला दिलेल्या या दोनही पुस्तकांच्या पहिल्या पानावर आजची तारीख आहे तेव्हाही बुधवारच होता.फक्त वर्ष तेवढे वेगळे होते,२०००.मी दहावीत होतो.सतरा वर्ष पूर्ण झाली.

खरंच,काही गोष्टी कितीही बदलल्या तरी काही गोष्टी तश्याच राहतात चिरकाल...निरंतर.

- हृषिकेश

 

Saturday, June 17, 2017

सोमवारचा इनबॉक्स

 कोण म्हणतंय सोमवार त्रासदायक असतो ? हा बघा माझा सोमवारचा इनबॉक्स.किती प्रोत्साहन ,किती समाधान,किती सकारात्मकता,किती प्रसिद्धी,किती लाभ सगळं किती प्रसन्न आणि आनंददायी आहे.कोण म्हणताय या जगात दुःख आहेत,काळजी आहे. सगळं झूठ.


 

अहो लोक मला फुकट परदेशवाऱ्या घडवतायेत.काय गरज आहे मला सांगा पैसे कमवायची.एवढं असूनही माझा क्रेडिट स्कोअर उत्तम आहे.माझी सगळी लोन मंजूर होतायेत.पण मी लोन काढतोच कशाला हे मला समजत नाहीये.मला ५०००० पौंडाची लॉटरी लागलीये.माझ्या पुढच्या पिढ्या तंगड्या वर करून जरी घरी बसल्या तरी सुखाने नांदतील इतके पैसे मला मिळतायेत.

कोण म्हणतंय आय.टी. मध्ये रिसेशन आलय ? कोणाचे जॉब जातायेत ? पुण्यात याक्षणाला माझ्यासाठी १९००० जॉब्स आहेत. म्हणजे मी रोज एक जॉब या हिशोबानी जरी नोकरी बदलली तरी इथून पुढे किमान ५० वर्ष मला काळजी नाहीये ते सुद्धा रविवार धरून.माझ्याकडे मोटोरोला मोबाईल असुआनही सॅमसंगवाले मला लॉटरी लागल्याचं सांगतायत या पेक्षा नशीबवान कुबेर तरी आहे का मला सांगा.

लग्नाची मागणी किती आहे बघा मला.मुली हात धुवून मागे लागल्यात.सरळ सरळ ईमेल करून सांगतायत कि मला तू आवडतोस वगरे.'हे प्रेम नाही तर काय आहे ? लोकं 'लग्नाचा आहेस का' वगरे उघड उघड विचारून मोकळी झालीयेत.

हि लोकं मला लंडन,स्वीझर्लंड या सारख्या ट्रिपा फुकट घडवायचं म्हणतायेत आणि मी इथे कोकण आणि ताम्हिणी फिरत बसलोय तेही पदरचे पैसे खर्च करून. हे वाचूनच माझा सभोवताल सुगंधी झालाय आणि त्यातही हि लोक मला सुगंधी अत्तर,डियोडरन्ट,रूमफ्रेशनर यासारख्या गोष्टी फुकट देतायेत.किती..किती ते कौतुक माझं.श्रीमंती श्रीमंती म्हणतात ती हीच का.किव्वा वैभव वैभव म्हणतात ते हेच का ?

अशा गोष्टी मला बऱ्याच वेळा सकाळी ऑफिसला धावपळीत आल्यावर मेलबॉक्स उघडल्या कि बघायला मिळतात.काय नशीब काढलय मी.मला माझाच हेवा वाटतो.असा मेलबॉक्स पहिला कि पडणारी स्वप्न सुद्धा यापुढे फिकी वाटायला लागतात.स्वप्नात तरी एखादीच गोष्ट येते इथे तर सगळ्याच बाजूंनी लक्ष्मी आणि सरस्वती पाणी भारतायेत.

असाच सुजलाम सुफलाम मेलबॉक्स मी तितक्याच शिताफीने नेहमीच रिकामा करतो आणि या सर्व सुखांवर पाणी सोडून पुन्हा ‘सगळ्याचा त्याग करून अलिप्त राहणाऱ्या’ साधू संतांप्रमाणे माझ्या नेहमीच्या कामाला सुरुवात करतो कारण शेवटी कसंय... इदम् न मम्..

कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा ।

बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् ।

करोमि यद्यत्सकलं परस्मै ।

नारायणयेति समर्पयामि ॥

- हृषिकेश