एखादी मांजर किव्वा अडगळीतला
एखादा उंदीर इतके मनोरंजन करू शकेल याची कल्पना सुद्धा केली नव्हती.किंबहुना उंदीर
आणि मांजर हि काल्पनिक पात्र पडद्यवर उमटवून लोकांचे मनोरंजन होऊ शकते याचेच अप्रूप
जास्त.१९४० साली अमेरिकन द्वयी विलियम आणि जोसेफ या जोडीने या उंदरा-मांजराची भांडणं
आपल्यासमोर मांडायला सुरुवात केली.या दोघांच्या भांडणातून आनंद घेणारा मी एकटाच नाहीये
तर जगातील करोडो लोक आनंदाने यांचे भांडण पाहतात हे गोड सत्य आहे.
वयाचे
बंधन न ठेवता कोणत्याही वयाच्या व्यक्तीने फक्त आनंद घ्यावा अशी हि कलाकृती.सगळं काल्पनिक
असूनही आणि ते काल्पनिक आहे हे माहित असताना सुद्धा इतकी भावनिक जवळीक निर्माण व्हावी
हि कदाचित माझ्या पाहण्यातली सर्वात वरची गोष्ट.मुख्य म्हणजे मालिका नसल्यामुळे कुठलाही
भाग कसाही पहिला तरी पात्रांची ओळख नव्याने करून द्यावी लागत नाही याचा आनंद जास्त.
एखाद्या
भागाचा आराखडा एकदम साधा आणि सरळ असतो.एका गोऱ्या साहेबाचा मोठा बांगला आहे.जो सर्व
सोयिनीं सुसज्ज आहे.घर भोवती बाग,नदी,लॉन आहे. चारही बाजूंनी नाजूक कुंपण आहे. जे काही
म्हणून लागेल त्या सगळ्या गोष्टी घरात आणि घराबाहेर उपलब्ध आहेत.इतके अद्ययावत घर असूनही
घरात अनेक बीळ करून एक छोटा उंदीर वास्तव्यास आहे.मी येथे 'वास्तव्यास' आहे असे म्हणतोय
कारण जितक्या तोऱ्यात त्या घराचा मालक-मालकीण वावरत नाही त्यापेक्षा कैक पटींनी हा
उंदीर इथे वावरतो.या उंदराच्या जोडीला बॉयकट केलेली एक पाळीव मांजर आहे.जी मालकाने
स्वखुशीने पाळलेली आहे जेणेकरून या उंदरांचा बंदोबस्त होऊ शकेल.आणि मालकाच्या छोट्या
बाळाकडे हि मांजर कदाचित लक्ष ठेवेल.असा भाबडा विश्वास त्या जोडप्याला आहे.
हि
झाली कथानकाची प्राथमिक मांडणी.मालक मालकीण दिवसभर घरात नसतातच.त्यामुळे सकाळ,दुपार
आणि संध्याकाळ या उंदरा-मांजराचा धुमाकूळ हाच या मनोरंजनाचा गाभा आहे.
मांजरीचे नाव 'जॅस्पर'
असे आहे पण तिला कायम 'टॉम' म्हणूनच संबोधले गेले आहे.जी मुळतः करड्या रंगाची असते
पण त्या दोघांच्या गोंधळात त्या रंगाचा अनेक वेळा बेरंग झालेला पहायला मिळतो.हि मांजर
घरात फक्त चैन करताना बघायला मिळते.फ्रिज मधील लोणी खाणे,टबबाथ मध्ये पाण्यात डुंबताना
टीव्ही पाहणे,आलिशान बेडवर मऊ चादर घेऊन पलंगावर झोपणे,काचेच्या ग्लास मध्ये किव्वा
थेट दुधाच्या बाटलीमध्ये मध्ये स्ट्रॉ टाकून आणि डोळ्याला गॉगल लावून दूध पिणे.या आणि
अशा सगळ्या आरामदायी गोष्टी करणे हा 'टॉम' चा स्वभाव आहे.हिच्याच सोबतीला एक छोटा उंदीर
आहे याचे नाव 'जिन्क्स' असे असते पण याला कायम 'जेरी' याच नावाने ओळखले गेले आहे.हा
बारक्या चोवीस तास त्या मांजरीच्या मागे पुढेच असतो.अतिशय धाडसी,खोडकर,हुशार आणि प्रेमळ
अशा सगळ्या स्वभावाचा 'जेरी' पाहणे मजेशीर वाटते.
प्रत्येक भागाचा शेवट
हा ऐंशी टक्के वेळा 'जेरी' च्या विजयानेच होतो.कारण मांजराची ताकद,वेग आणि आकारमान
यापेक्षाही उंदराचे चातुर्य,तल्लख बुद्धी आणि विविध क्लुप्त्या करण्याचा हुशारी या
गोष्टी कायम उजव्या ठरतात.मात्र काही भागात 'टॉम' चा विजय देखील पाहायला छान वाटते.याखेरीज
काही भागात दोघांच्या मैत्रीपूर्ण संबंधाने गोड शेवट होतो.त्याप्रमाणेच या दोघांचा
एक तिसराच शत्रू निर्माण होतो आणि मग याच्या विरुद्ध होणारी हातापायी आणि त्यातून होणार
दोघांचा विजय देखील पहायला मिळतो.या व्यतिरिक्त दोघांवर दिलेली जबाबदारी पार पाडताना
प्राणाची शर्थ लावून निभावलेली जबाबदारी पाहताना कलाकृती बनवताना लावलेल्या कल्पनाशक्तीला
दाद देण्यावाचून आपल्या हातात फारसे काही शिल्लक राहत नाही.
या कार्टून मध्ये 'स्लॅपस्टिक'
पद्धतीचा विनोद वापरलेला आढळून येतो.'स्लॅपस्टिक' चा साधारण अर्थ असा कि ज्यामध्ये
अतिशय वाढीव पद्धतीनं शारीरिक कृती करून त्यामधून विनोदनिर्मिती करणे.ज्यामध्ये भौतिक
अथवा रसायन या पैकी कुठल्याच शास्त्राचा मेळ आणि समतोल राखलेला नसतो इतकेच काय तर शास्त्राला
अनुसरून कुठलीच गोष्ट केलेली नसते.सामान्य भौतिक विनोदाच्या सगळ्या पातळ्या सोडून केलेली
विनोदनिर्मिती कितीही बाळबोध असली तरी मिळणाऱ्या आनंदाला तोड नाही हा माझा वैयक्तिक
अनुभव.
अतिशय हिसंक अशा प्रकारच्या
कृती यात दाखवल्या आहेत असे काही दर्शकांचे मत आहे.म्हणजे लहान मुलांनी पहायच्या कार्यक्रमात
इतक्या मोठ्या प्रमाणात मारामारी किव्वा हाल दाखवणे तितकेसे योग्य नाही.मात्र तरीही
पाहत असताना याची कुठे आठवणही होत नाही.अजून एक निरीक्षण असे कि 'टॉम' कडून 'जेरी'
किव्वा 'जेरी' कडून 'टॉम' अगदी उभा चिरला जरी गेला तरी रक्ताचा एक थेम्ब दाखवला गेला
नाहीये.इतकेच काय कुठल्याही अपघातामध्ये कोणाला कधीच मरण आलेले दाखवले नाहीये.एक दोन
भागात 'टॉम' मारतो असा प्रसंग आहे पण त्यातही तो स्वर्गातून गप्पा मारतोय असे दाखवून
पुढल्या भागात भूतलावर असणारा 'टॉम' पाहणे खूप जवळचे वाटते.
कल्पनाशक्तीला किती ताण
द्यावा याचे हे अत्त्युच उदाहरण आहे असे मला हे पाहताना कायम वाटते.म्हणजे मांजरीच्या
डोक्याला इस्त्री लागली तर चेहरा त्रिकोणी होणे,उंचीवरून पायऱ्यांवर पडल्यास संपूर्ण
शरीर काटकोनां दुमडले जाणे,पाईप मधून पळत गेल्यास त्याच दंडगोल आकाराचे शरीर बाहेर
येणे किव्वा फ्रिजमध्ये बाहेर येताना संपूर्ण शरीर बर्फाचे होऊन बाहेर येणे हे प्रसंग
पाहताना काही गोष्टी मनापासून पटतात.
मांजराच्या खोड्या काढून
त्यालाच मात देणारा उंदीर शेवटी हिरो वाटत राहतो.हातभर बिळात देखील पलंग,टीव्ही,फ्रिज
आणि खायचे पदार्थ व्यवस्थित मांडलेले पाहतानाच 'जेरी' हा एक समाधानी आणि सधन कुटुंबातील
उंदीर आहे याची खात्री पटते.
यात एक 'निबल' नावाचा
लहान उंदीरही आहे जो 'जेरी' चा मित्र असतो आणि काही क्षणी तो 'जेरी' ची मदत करतो तर
कधी 'जेरी' त्याची.अर्थात निबल प्रत्येक कथानकात नाहीये.त्याप्रमाणेच 'स्पाईक' हा अमेरिकन
बुलडॉग कुत्रा आहे जो भयंकर ताकदवान असून खुद्द 'टॉम' चे देखील यांच्यासमोर काही चालत
नसते.मात्र जेरी विषयी या 'स्पाईक' च्या मनात प्रेम असते.त्यामुळे 'टॉम' ला घाबरवण्यासाठी
'स्पाईकचा' वापर कसा करायचा यासाठी 'जेरी' कडे खूप क्लुप्त्या असतात,जेणेकरून तो 'टॉम'
ला त्रास देऊ शकेल.'बूच' हे अजून एक मांजरीचे पात्र आहे जे 'जेरी' ला पकडण्यात 'टॉम'
ची मदत करत असते.का कोण जाणे पण 'बूच' हि मांजर भयंकर श्रीमंत दाखवली आहे ज्यामुळे
'टॉम' ची प्रेयसी बऱ्याचवेळा ती संपत्ती पाहून 'बूच' च्या जवळ गेली आहे याचे दुःख
'टॉम' ला सर्वाधिक.असेच अजून एक म्हणजे 'क्वॅकर' नावाचे छोटे बदक देखील यात आहे. जे
'टॉम' चे कायमचे ठरलेले खाद्य असते मात्र अगदी 'टॉम' च्या घशातून परत काढण्यापर्यंत
'जेरी' ने 'क्वॅकर' ला मदत केली आहे.त्यामुळे 'जेरी' आणि 'क्वॅकर' यांची मैत्री पाहायला
अजून मजा येते.या व्यतिरिक्तही 'ममी टू शूज'
आणि 'टॉम' चे प्रेम 'टूडल्स गॅलोर' अशी पात्र काही ठराविक भागात पाहायला मजेशीर वाटतात.आणि
यातूनच या संपूर्ण कुटुंबाशी आपली जवळीक निर्माण होते.
खड्डा खणण्याची पद्धत,
धडकल्यावर होणारी अवस्था,उंचीवरून वस्तू डोक्यात पडल्यावर होणारी दशा,हवेत उंच फेकले
गेल्यावर येणारे अनुभव,एखाद्या टोकदार गोष्टीला अडकून फरफटत जाताना होणारी मजा,पाण्यात
बुडताना होणारी तारांबळ,केलेल्या चुकीचे परिणाम डोळ्यासमोर अचानक दिसल्यावर होणार गोंधळ, चटका बसल्यावर संपूर्ण
अंगातून येणार धूर,जोरात फटका बसल्यावर संपूर्ण बाहेर येणारे डोळे,रंगात बुडून ओले
झालेले पाय आणि त्यामुळे जमिनीवर उठलेले ठसे या आणि अशा अनंत गोष्टी ज्या कमालीची दाखवल्या
आहेत त्याचे शब्दात वर्णन करणे केवळ अशक्य आहे.
गतिमान,वस्तुमान,गुरुत्वाकर्षण
या आणि अशा सर्व भौतिक व्याव्ख्यांना बगल देऊन हे उंदीर-मांजर आपल्या डोळ्यादेखत फिरत
असतात.या वेळी वाजलेले संगीत घडलेल्या कृतीचा प्रभाव वाढवते.अर्थात 'टॉम' आणि 'जेरी'
या दोघांनाही अजिबात संवाद नाहीयेत पण काही क्वचित भागात इतर पात्रांच्या तोंडचे संवाद
काही वेळा लक्षात राहतात.कथानक जरी साधे सोपे सरळ असले तर प्रत्येक वेळा ते ज्या पद्धतीने
उलगडते ते पाहणे आनंददायी ठरते.
सध्या असलेल्या 'वेब'
सिरीज,'डेली सोप','रियालिटी शोज', या गोष्टींपेक्षा हे १० मिनिटांचे काल्पनिक भांडण
नक्कीच खूप सुसह्य आहे.किती साधी सोपी आणि सरळ गोष्ट दाखवलेली असते पण चेहेऱ्यावरचे
हावभाव,पात्रांच्या हालचाली आणि क्रियेनंतरचे पडसाद या गोष्टी नकळत चेहेऱ्यावर हसू
आणतात.प्रत्येक फ्रेम नंतर हे कसे सुचले असेल असा जर प्रश्न पडला नाही तरच नवल वाटावे
इतके ते वैविध्य.
अर्थात लोकांच्या आवडीचे
आखाडे आपल्या आवडीवरून बांधणे चुकीचेच आहे पण या बाबतीत बऱ्याच जणांची आवड मिळती-जुळती
असेल यात शंका नाही.'गणपतीचे वाहन' आणि 'वाघाची मावशी' यांच्या भांडणातून बनलेली कलाकृती
एकदा तरी नक्की पहाच.एकाच घरात नांदणारे हे एकमेकांचे वैरी आपले मनोरंजन केल्यावाचून
स्वस्थ बसत नाहीत. तुझं
माझं जमेना अन तुझ्यावाचून करमेना या म्हणीला चित्ररूप देणारी ही दहा मिनिटे कितीही
वेळा पहिली तरी कमीच.
इथली मांजर डोळे मिटून
दूधही पित नाही आणि इथल्या उंदरांपासून प्लेगही होत नाही या पेक्षा अजून समाधानाची
बाब ती कुठली.
हृषिकेश पांडकर
२८.०२.२०१८
२८.०२.२०१८
Brilliant!
ReplyDeleteI have not just been a strong fan of tom&jerry, but seen the episodes so much, that I trouble my daughter by telling which episode has what in it. :P
One more amazing part is, very rarely are there any dialogs in the complete episodes. And whatever dialogs are there, they too are brilliantly thought of.
As usual, you have penned down the heart and soul of every person who is still child at heart and glued to screen while watching "Tom&Jerry"!
Cheers!
Thank you so much :)
DeleteThis is actually a masterpiece !
Keep reading :)
Hrishi Amazing!
ReplyDeleteIt's one of the best memory of my childhood.. Marathit sangayache tar "sadodit nikhal hassya" je aajachya konatyach cartoon madhe nahi..
Keep it up!
Hey Nitu,
DeleteThank you so much.
Keep reading too :)
भन्नाट, ऑल टाइम favorite जोडगोळी!!!
ReplyDeleteTotally agree with you "तुझं माझं जमेना अन तुझ्यावाचून करमेना या म्हणीला चित्ररूप देणारी ही दहा मिनिटे कितीही वेळा पहिली तरी कमीच."
Thank yoy so so much :)
DeleteKeep reading ! :)
Farach chaan. Uttam lekh
ReplyDeleteDhanyavaad :)
DeleteVachat raha :)
Tom & Jerry बघताना जेवढा निखळ आनंद मिळतो तेवढाच हे वाचाताना देखील लाभला.
ReplyDeleteKhup dhanyavaad mitra :)
DeleteThanks for reading :) Keep doing so !!!
Khup chan.baghtana maja vatate tashich vachtanahi aali.
ReplyDeleteThank you so much :)
DeleteKeep reading !
Very nice. Feeling very light after reading this comics blog on Tom and Jerry.
ReplyDelete